Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१६

भोग आणि ईश्वर ६१६ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड) 
  
कालच्या विषयाबाबत एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल. ती म्हणजे, अशी शक्ती अस्तित्वात आहे की हे भास असतात. मुळात अशी काही शक्ती आहे का. तर याचं उत्तर श्रीविष्णू सहस्त्रनामस्तोत्रम् यामधे सापडतं. महा विष्णूच्या नामावलीतील एक नावच, याचं खुलासा करतं. अठराव्या श्लोकात श्री विष्णूंचं एक नाम आहे अतींद्रियो. याचे अनेक अर्थ होतात. मुख्य दोन अर्थ म्हणजे, इंद्रियांना प्राप्त न होणारा किंवा इंद्रियांच्या अतीपार असणारा. 

पण दुसऱ्या अर्थाने इंद्रियातीत अशी शक्ती जी, या जगताच्या पार असणारं ज्ञान प्राप्त करून देते. म्हणजेच ज्या ज्यावेळी अश्या शक्तीला साद घातली जाईल, त्या त्यावेळी, ती शक्ती कार्यरत होऊन, साधकाला संकेत प्राप्त करून देईल आणि त्याला साधनेत प्रगती प्राप्त करून देईल. याचा दुसरा अर्थ असा होतो की, यामधे प्राप्त संकेत, त्या शक्तीच्या इच्छेनेच प्राप्त होतात, हे नक्कीच. पण असे संकेत वा संदेश विशिष्ट व्यक्तींना आणि विशिष्ट वेळीच प्राप्त होतात का.

याचं उत्तर हो असच देता येईल. विशिष्ट व्यक्ती जिला आपल्या साधनेत काही प्रमाणात गती प्राप्त झाली आहे, त्या व्यक्तीला, अश्या प्रकारे संकेत व संदेश प्राप्त होतात. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, मी मागे एका लेखात सांगितल्याप्रमाणे, मानवी देह, मन व बुद्धी, ही एक गुंता गुंतीची यंत्रणा आहे आणि त्याचा उद्देश विशिष्ट कार्या साठी आहे. त्यामुळे सर्वसाधारण यंत्रात असतात, त्याप्रमाणे, या यंत्रात देखील ऊर्जा शक्ति यांच्या वापराने, पुढील टप्पे प्राप्त करून, प्रगतीकडे जाण्याची सोय, ईश्वर नामक वैज्ञानिकांने केली आहे. प्रत्येक टप्पा म्हणजे पुढील उत्पादन प्रक्रियेत जाण्याची पायरी. 

मन ही गोष्ट जितकी चार्ज करू तितकी जास्त कार्यक्षम असते. मोरे energy and power creates more and more energya and further power. आता चार्ज करण म्हणजे काय. तर त्या मनाला सकारात्मक लहरी आणि कंपन यांनी जितकं तेजाळत ठेवू, तितकीच सकारात्मक ऊर्जा व शक्ती, त्या मनातून ब्रम्हांडातील शक्तिकडे परावर्तित होते. अर्थात नकारात्मक चार्जिंग मुळे, विश्वातील नकारात्मक शक्ती प्रवाहाशी संबंध येऊन, तशीच ऊर्जा आणि शक्ती प्राप्त होते, हे ओघानेच आल. 

या प्रक्रियेत, मन साधनेचे अनेक टप्पे पार करत जातं. आता अशी उदाहरणं आपण देऊ शकतो की, एखादा माणूस काहीही साधना करताना बाह्यंगी दिसत नाही. पण त्याला अशी काही अतींद्रिय शक्ती किंवा संकेत प्राप्त होतात. याचं उत्तर इतकं सोप्पं आहे की, साधना ही मुळातच मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया आहे. ती चिंतन, स्मरण शरण या मधून साधली जाते. त्यामुळे ही देहांतर्गत प्रक्रिया कळत किंवा नकळत घडते. 

एखाद्या व्यक्तीला कल्पनासुद्धा नसते की आपण जे चिंतन, विचार मनन करतो ती साधना आहे, एखाद्या साध्याकडे नेणारी. पण या गोष्टी कळत घडोत किंवा नकळत घडोत परिणाम सारखाच साधतात. ज्याप्रमाणे, एखाद्या जादूच्या दिव्याला चुकून घासलं किंवा मुद्दाम जाणीवपूर्वक घासलं तरी आतील जीन बाहेर येणारच. कारण तो घासलं जाण्याच्या प्रक्रियेचा गुलाम असतो. त्याचप्रमाणे साधना काहीही केली तरी इच्छित परिणाम साधते. कारण ती शक्ती, तिच्याकडे येणाऱ्या लहरी, संदेश, कंपन यांच्याशी बांधील असते. 

या विषयाला अजून खोलात जाऊन अभ्यासुया, पण उद्याच्या भागात. पण तोपर्यंत, मनाची ऊर्जा व शक्ती वाढवणारे नाम अविरत आणि न चुकता घेतच राहूया.

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...