Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८९

भोग आणि ईश्वर  ५८९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 

एखाद्याच्या मनातील लहरींचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या मनावर व्हायला, आपणही तसेच संवेदनशील असावं लागतं. याचीच दुसरी बाजू म्हणजे, असा एखाद्या लहरींचा परिणाम व्हायला त्या लहरिंमधे तशी शक्ती व ऊर्जा असावी लागते. त्याला आपण प्रेरक ऊर्जा वा शक्ती म्हणू शकतो. अशी शक्ती आणि ऊर्जा लहरिंमध्ये प्रकट व्हायला,मुळात त्या व्यक्तीमध्ये तसे गुण तीव्र स्वरूपात असणं गरजेचं आहे. 

अश्या व्यक्तित्वाच्या व्यक्ती दिसताच आपला छाप वा प्रभाव पाडून समोरच्या व्यक्तीला प्रभावित व प्रेरित करतात. अर्थात अश्या व्यक्तींमधे सकारात्मक वा नकारात्मक विचार वा विचारांचा पाया तीव्रतेने भरलेला असतात. मनाच्या जडण घडणीत असे तीव्र स्वरूपाचे विचार निर्माण होण्याचा योग, कर्मात, संचितात असतो. 

यामधे मध्यम विचारांची, वर्तणुकीची लोक दोन्ही प्रकारच्या व्यक्ती विषेषाने प्रभावित होतात वा भारली जातात. त्यांना, ज्या प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येईल, त्या प्रकारच्या व्यक्ती भावतात. म्हणूनच अश्या व्यक्ती सात्विक ते तामसी अश्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींकडे आकर्षिल्या जातात. आता इतका विचार यावर केल्यावर, साहजिक मनात प्रश्न येईल की, असे वेगवेगळे व्यक्ती विशेष तयार होण्याचं कारण काय. 

याचं उत्तर साहजिकच पुन्हा कर्म घडल्यानंतर  त्याचं फल  भोगण्याची वेळ वा काळ आला किंवा जसा हा काळ येणार असेल, त्याप्रमाणे तामसी वा सात्विक विचार मनात येऊन, जे फल प्राप्त होणार असेल  त्यानुसार कर्म घडून येतं. म्हणून बरेचदा एखाद्या प्रसंगात वा क्षणी आपल्या हातून, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध सुद्धा आपण वर्तन वा कर्म करतो. खूपदा आपण नंतर विचार पण करतो की, मी असा कसा वागलो. 

अश्या प्रकारचा कृत्रिम प्रभाव संमोहन विद्येच्या सहाय्याने पाडता येतो वा पाडला जातो. पण असा प्रभाव तात्पुरता असतो. अर्थातच कर्माच्या फलस्वरुपात घडणारी घटना ही देखील आपल्याच गतकाळातील कर्माची मोहिनी, आपल्या मनावर पडते. त्याद्वारे, जे घडणे अशक्य वाटते, तेदेखील घडू शकते. हा निसर्ग नियमात घडलेला संमोहन प्रकार. म्हणूनच आपल्या कर्मफल कायद्याने घडलेल्या घटना या बऱ्याच प्रमाणात आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. 

मग जर सर्वच कर्म ही निसर्ग नियमाने बद्ध असतात, तर माणसाच्या हातात काय आहे किंवा माणूस काय करू शकतो, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...