Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८०

भोग आणि ईश्वर  ५८० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
खरंतर जन्म आणि मृत्यू, ही आपल्यासमोर घडणारी घटना आहे. म्हणजे आपला जन्म आणि मृत्यू हे आपण पहात नाही तरी, आपल्या आयुष्यात अनेक जन्म आणि अनेक मृत्यू आपण पाहतो. एका ठराविक क्षणी आपलं सुद्धा अस्तित्व या जगातून नष्ट होईल, हे वादातीत सत्य आहे. फरक इतकाच की, एका ठराविक क्षणानंतर या देहाला, मनाला, बुद्धीला, ते जाणवण्या साठी, ते तिन्ही घटक चैतन्यावस्थेत नसणार. नंतर सुरू होईल तो फक्त आत्म्याचा, कर्मसंचीत सोबत घेऊन, पुढील जन्माची, देह मिळण्याची प्रतीक्षा करत.

ही प्रतिक्षासुद्धा, किती काळ असणार, हे त्या कर्माचं संचित काय आहे,त्यातील भोग आणि उपभोग काळाच्या कोणत्या पटलावर सुयोग्य पद्धतीने, आत्म्याला देहाच्या माध्यमातून भोगायला योग्य आहे, त्यानुसार, अचूक त्याचं काळात हा जन्म होऊन, काळाचा साठ, सत्तर वा तत्सम काही काळ, त्या देहात राहून, कर्माच्या संचिताचा तितकाच भाग भोगून होईल, जितका त्या संचितात लिहिला आहे. कारण यांचं सुद्धा एक गणित नक्किच असणार. 

आता जो देह आता आपल्याला मिळाला आहे, त्यानें काय काय भोग भोगून झाले आणि काय काय भोग अजून भोगायचे शिल्लक आहेत, याचा वस्तुनिष्ठ विचार वा चिंतन आपण करायचं म्हटलं तर, आपल्याला मागील काही गोष्टींबाबत आणि सद्य स्थितीत घडत असलेल्या घटनांबद्दल काही सांगता येईल. पण त्याची संगती लावायला गेल्यास, काही भोग व उपभोग रूप काही कर्मांची संगती कदाचित लावता येईल. पण तेसुद्धा ज्या परिणामांना आपण सहजी ओळखून, कर्माच्या बंधाशी जोडू शकू. 

पण काही भोग आणि उपभोग नक्कीच कल्पनेच्या बाहेर असतील. कदाचित यातील मूळ कर्म हेसुद्धा आपल्याला आठवत असेल, तरीही ते मुळातच का घडलं, हे आपल्या स्वभाव, वागणूक व मानसिक स्थितीशी सुसंगत किंवा विसंगत असू शकतं. सुसंगत असेल तर संगती लगेच लागू शकते. म्हणजे गाडी चालवण्याची पद्धत बेदरकार, बेफिकीर वृत्तीची असेल, तर अपघात हे त्याचं कमी अधिक स्वरूपात फलरूप असूच शकत. 

पण जर माणूस काळजीपूर्वक गाडी चालवणारा असेल आणि तरीही अपघात झाला तर, ही कर्म व फल यांची विसंगती झाली. अशी विसंगती असताना प्राप्त फल हे नक्कीच पूर्वसंचिताशी निगडित आहे, हे लक्षात घ्यावं. आयुष्य हे अश्या कर्म, फल व त्यामागील सुसंगती व विसंगती या चक्राने प्राप्त कर्म गती व फल आहे. 

या विसंगतीचा शोध घेणं किंवा घेता येणं, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत इच्छित नाम घेत आपलं संचित लवकर फिटुदे, अशी प्रार्थना करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...