Skip to main content

भोग आणि ईश्वर ५९७

भोग आणि ईश्वर  ५९७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 
  
आत्मा हा देह, बुद्धी व मन याहून भिन्न आहे. त्याचं कार्य निश्चित आहे आणि ते साध्य करण्यासाठीच हा देह, हे कर्माचं बंधन हे सर्वकाही घडलं वा घडवलं गेलं. पण हे ज्ञानाने आणि योगानेच जाणता येतं की, मी या देहाहून, भिन्न आहे. जरी मी या देहात अभिन्न भासत असलो तरी, एका ठराविक काळानंतर, मला हा देह सोडून, बाहेर जायचं आहे. कुठे याचा शोधच घेण्यासाठी ईश्वराने, हा देह, बुद्धी आणि मनरुपी स्वतंत्र इंद्रिय किंवा एक स्वाप्रेरीत यंत्रणा दिली आहे. 

त्याच्या सहाय्याने, मानवाने, आपल्या संपूर्ण आयुष्यात, हा शोध घ्यावा की, माझा प्रवास कुठून कुठे आहे, मी कोण आहे. पण या देहात आल्यावर आत्म्याचा, पूर्व जन्मांचा, सर्वांचा विसर पडल्यामुळे, मानव, मूळ उद्देश विसरून, संसारात रममाण होतो. इतका रममाण की, ज्यासाठी हा सुसज्जित देह ईश्वराने प्रदान केला, तो कार्यभाग न पार पाडताच, माणूस एका देहातून, दुसऱ्या देहात, संचीताचे भोग भोगत वणवण फिरतो. 

यातून आपण काय साधलं, हा विचारदेखील, त्याच्या मनाला, बुद्धीला स्पर्शत नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे, आपण जे सर्वसामान्य आयुष्य जगतो आहोत, तोच धर्म, तेच कर्म आणि जगण्याचं तेच मर्म आहे, असा विचार, असे संस्कार, त्या देहावर लहानपणापासून केले जातात. आत्मा या देहात आहे व त्या चैतन्याने देह चालतो, हे सर्वसामान्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाही. 

जर तसं काही समजलं, किंवा क्वचित कधी प्रासंगिक बोध झाला तरी तो आत्मा हा या देहाला चालवण्यासाठी आहे, इतकाच समज करून, माणूस पुढे जातो. आलो जगलो वाढलो आणि मृत्युकारणाने, हे जग सोडून गेलो. इतकं उथळ ज्ञान, सामान्य माणसाला असतं. त्यामुळे आत्मजागृती, आत्म्याची अनुभूती, आत्म्याचे खरे उद्देश इत्यादी गोष्टी, खरच सामान्य माणसाच्या मनाला स्पर्शू पण शकणार नाहीत. 

अश्या लोकांची कीव येऊन, कणव वाटून, दया येऊन ईश्वर या कृपासागराने, त्यांच्यासाठी सर्वात सोप्पा आणि साधा उपाय सांगितला. स्मरण आणि शरण हा. पण तो उपाय करण्याचं स्मरण होत नाही. माणूस सर्व कामं, आपली चौकस, तल्लख आणि कुशाग्र बुद्धी वापरून करतो. पण एक ईश्वर स्मरण करण्यासाठी, वेळ नाही, स्मरण नाही, जमतं नाही इत्यादी अनेक कारणं सांगून, फक्त आणि फक्त टाळतो. कदाचित तो ईश्वर, ज्याने दयार्द बुद्धीने हा सर्वात सोप्पा उपाय सांगितला, तो देखील हसत असेल. 

असो, या उपायावर आणि त्याला स्मरणात आणण्यावर उद्याच्या भागात चर्चा करूया.  

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...