Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८१

भोग आणि ईश्वर  ५८१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
 कर्म आणि फल याची संगती, या विषयावर आपण काळ बोलत होतो. अशी संगती काही बाबतीत लावता येते आणि कर्मफळ सिद्धांत काही बाबतीत आपण सिध्द करू शकतो. म्हणजे काही बाबतीत असा सिद्धांत पटतो किंवा पटू शकतो. पण काही घटना, प्रसंग वा परिणाम याबाबत अशी सगती लावता येत नसल्यामुळे, काही गोष्टी, प्रसंग,घटना वा परिणाम याबाबत ते आपण नाकारत नसलो तरी भ्रमित नक्कीच होतो. 

हे भ्रमित होणं, किंवा अशी संगती लावता न आल्यामुळे, कर्मफल सिद्धांत, नाकारतो किंवा एकूणच देव वा त्याच्या अस्तित्वाबद्दल आपण साशंकित होतो. काहीजण अनेक उदाहरणं देऊन, असा काही सिद्धांत नाहीच असं ठामपणे सांगतात. तर काहीजण एकूणच देव वा दैव आणि ईश्वर यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभं करतात. याबद्दल, आपण काही चिंतन अवश्य करू शकतो. 

मुळात अश्या विचारांच्या व्यक्ती काही व्यक्तिगत उदाहरणं सांगून वा मांडून. देवाचं अस्तित्व पूर्ण नाकारून, तश्याप्रकारे इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करतात. अश्या प्रकारच्या मुद्द्यातून, त्या व्यक्तींचा दृष्टिकोन असा असतो की, जे मला पटलं, ते या जगात सर्वांना पटावं. म्हणजे जास्तीतजास्त लोकांनी माझ्या बोलण्या वर विश्वास ठेवावा. नव्हे ठेवलाच पाहिजे. परंतु प्रत्येकाने, आपापल्या चिंतनातून या गोष्टींवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

मुळातच श्रद्धा, भक्ती व विश्वास या गोष्टी, कोणत्याही प्रकारे सगुण स्वरूपात दाखवता येत नाही. या गोष्टीचा संबंध जाणीवांशी असतो. म्हणजे या निर्गुण गोष्टींचा संबंध जाणीव या निर्गुण गोष्टीशी आहे. वसंगती पूर्ण कर्मांचा फलांशी संबंध जोडता n आल्यामुळे, एखाद्या इश्वरासारख्या जगताच्या उत्पत्तीच्या कारकास नाकरणं, म्हणजे मला दिसत नसेल तर जगाचं अस्तित्व नाकारण्यासारखं आहे. 

अर्थात यात अजून एक मुद्दा असा आहे की, माझ्या जन्माआधी आणि माझ्या पश्चात, जर जगाचं अस्तित्व आहे आणि अगदी जगातील सर्व सर्व सजीवांच्या अस्तित्वापलीकडे, या ब्रम्हांडाचं, अस्तित्व, आहे. मग माझ्या जन्माआधी आणि माझ्या मृत्युनंतर जर हे जगत अस्तित्वात आहे आणि राहणार, तर नक्कीच अशी कोणती तरी शक्ती या जगताचं कारण आहे. या जगतातील आपल्या अल्पश्या सहभागाने आपण कित्येक अश्या गोष्टी करतो, ज्या आपला वृथा अहं आणि गर्व वृथा वाढवून अनेक चुकीची कर्म करवून घेतात. 

पण त्याचा दोष आत्म्याच्या आणि देहाच्या खात्यात मोजला जातो. त्याचे परिणाम देखील वेगवेगळ्या जन्मातील देह भोगतात. पण आपल्या या जन्मातील व पुढल्या अनेक जन्मातील देह, आत्म्याच्या सहकार्याने नित्य कर्म करतात आणि आपल्या प्रत्येक पुढील जन्मात न केलेल्या प्रत्येक कर्माशी विसंगत फल भोगतात. 

आता या चक्राचा भेद कसा करायचा यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...