Skip to main content

भोग आणि ईश्वर ५९२

भोग आणि ईश्वर  ५९२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 

आपलं जीवन हे युगानुयुगे स्थित्यंतरे होत असताना सुद्धा एका ठराविक साच्यातून जात आलंय आणि जात राहील, हे खरच असच अपेक्षित आहे का आपल्याकडून, हे विधाता जाणे. पण वेद, पुराणं, धर्मग्रंथ, संत महंत यांचे व्यक्तिगत अनुभव आणि जीवनचरित्र नीट बारकाईने अभ्यासल तर लक्षात येईल की, ज्यांनी ज्यांनी ही सांसारिक चाकोरी सोडून, आत्मतत्वाला जाणून, या देहाच्या पलीकडे पाहून, जन्म मृत्यूच्या चौकटी पलीकडे पाहिलं, त्यांना या जगण्याचा खरा अर्थ सापडला. 

त्यांनी त्यातून आपलं खरं उद्दिष्ट जाणून, या देहाचा सदुपयोग करून घेतला. त्यांना ते एकाच जन्मात साधलं, याचा खोलात जाऊन विचार केला तर, लक्षात येई की, यातील बहुतेकांना खूप लहानपणीच जगण्याचं प्रयोजन लक्षात आलं होतं. त्यांच्या पारमार्थिक जाणीवा, अत्यंत लहान वयात किंवा योग्य वयात, प्रगल्भ झाल्या होत्या. 

परिणामी, ज्या गोष्टी आपण सांसारिक मानव उच्च दर्जाच्या मानतो, त्या गोष्टी, त्यांनी त्याज्य मानल्या. भले भले आपल्या इच्छा, आकांक्षा, लालसा, मोह, माया, लोभ, क्रोध, काम इत्यादींवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. पण या सर्व गोष्टी त्यांनी लीलया टाळल्या. किंबहुना, अध्यात्मिक जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी त्यांची विशाल दृष्टी, आपल्याला नक्कीच थक्क करणारी आहे.

त्यांना, जीवनातील अनेक मोह लोभ इत्यादी टाळातांना व त्यात न अडकता पुढे जाताना, त्यांना करावा लागलेला त्याग हा नाईलाजास्तव केलेला नसून, त्यामागे त्यांचा त्याग आणि वैराग्य नक्कीच अनुकरणीय आहे. सद्यस्थितीत आपल्याला ग्रासणारे मोहाचे अनेक छोटे छोटे क्षण टाळताना आपल्याला त्यांच्या अनुभवातून नक्कीच, सहाय्य मिळेल. 

अनेक त्याग करत, वैराग्य करताना, त्याचा कुठेही, गर्व किंवा अहंकार त्यांना स्पर्शत नाही किंबहुना मानवी जीवनातील अनेक अवगुण, त्यांच्या ठायी, कुठेही आढळणार नाहीत. अश्या प्रकारचं प्रेरणादायी व आदर्श जीवन जगण्याची त्यांची जिद्द, कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटांनी दुःखानी, कमी झाली नाही. कदाचित जे ज्ञान,  आत्मबोध त्यांना झाला असेल, त्याच्या समोर, आता येणारी संकटं ही अत्यंत शुल्लक वाटतं असतील.  

कारण जो आनंद त्याग, वैराग्य अंगिकारून प्राप्त होतो, तो आनंद अनुभवानेच मिळवता येतो. म्हणूनच प्राप्त ज्ञानाने, त्यांच्या मनातील जाणीवा अत्यंत जागृत झालेल्या असल्या मुळे, सूक्ष्मातील सूक्ष्म संकेत, संवाद,त्यांना जाणवत असती. त्यातून, त्यांना, विधाता वा विश्व नियंत्रक, काय करत आहे, जगताच्या मार्गातील, कोणता टप्पा सुरू आहे, काळाच्या या परिघावर, विधात्यचा काय संदेश आहे, आपण काय करणं विधात्यास अपेक्षित  आहे, काय केल्याने जगताच्या जीवना तील या काळात आपण योग्य पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकू. 

या सर्व दृष्टीने संत महंत, अजून काय काय विचार करतात आणि आपल्या अल्प मतीने आपण त्यातून काय शिकू शकतो, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...