Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८७

भोग आणि ईश्वर  ५८७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 

मनाची शक्ती, व्याप्ती व ऊर्जा ही अतिप्रचंड आहे, यावर पुरेसं चिंतन आपण यालेखमालेत आधी अनेक लेखात, केलं आहे. पण मनाची खरी कार्यक्षमता ही आहे की, देह, बुद्धी व वाचा या तीनही कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवून, त्यांच्या कडून अपेक्षित, इच्छित कर्म करवून घेऊ शकते. म्हणजे यातच मनाच्या कार्मक्षमतेची विशालता वा व्याप्ती ध्यानात येईल. पण यात एक गुह्य दडलं आहे. ते म्हणजे, एकदा जर या मनावर नियंत्रण मिळविता आलं की, देह, बुद्धी इंद्रिय यांसह संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण मिळवता येईल. 

या गुह्याच्या प्राप्तीसाठीच अनेक मार्ग, अनेक साधनं, अनेक सिद्धी जन्माला आल्या. कारण एकदा मनातील या अद्भुत सामर्थ्याचा धागा सापडला की, त्या आधारे, मनात इच्छा उत्पन्न करून, मनाच्या सामर्थ्याच्या सहाय्याने, इच्छित कार्य पूर्ण करता येऊ शकतं. पण या सर्वाचा मुख्य गाभा मनाच्या अद्भुत शक्तीला साद घालून, त्याद्वारे सर्व व्यवस्था इच्छित कार्य पूर्ण क्षमतेने आणि कुशलतेने सिद्धीस नेण्यासाठी मनाच्या सामर्थ्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो.

यामधे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, मनाचं हे सामर्थ्य, सकारात्मक व नकारात्मक अश्या दोन्ही कार्यासाठी वापरता येऊ शकतं. याचं कारण म्हणजे, मन ही ऊर्जा व शक्ती रूप आहे. आणि शक्ती व ऊर्जा यांना चांगलं वाईट, हे समजत नाही. शक्तीचा वापर करण्यात आला की, त्याद्वारे शक्ती ज्या उद्देशासाठी व कार्यासाठी वापरली जाईल, ते कार्य करणं इतकंच शक्तीच काम आहे. 

यासाठी आपण आधुनिक हत्यार, क्षेपणास्त्र यांचा विध्वंसक व विधायक असे दोन्ही उपयोग जाणतो आणि पाहतो सुद्धा. ती अस्त्र, शस्त्र हे सुद्धा शक्ती आणि ऊर्जा यांचाच संगम आहे. म्हणजेच या उदाहरणातून एक गोष्ट लक्षात आली असेल की, मनाच्या शक्ती व ऊर्जा हे एकाग्र केल्यानंतर दोन्ही प्रकारे वापरता येऊ शकतात. अर्थातच मनाच्या या सामर्थ्याचा सदुपयोग आणि दुरुपयोग दोन्हीसाठी वापर करता येतो. 

आपण आपल्या इच्छा, आकांक्षा यांना कशाप्रकारे हाताळतो वा अंमलात आणतो किंवा आणू, यावर या सामर्थ्याचा वापर होतो की गैरवापर होतो, हे ठरू शकेल. पण त्यासाठी सर्वात प्रथम त्या शक्ती व ऊर्जेला एकत्र एकाग्र व एकरूप करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मनाचं हे सामर्थ्य एकाच लक्षावर एकावेळी कार्य करत असेल तर, ते सामर्थ्य वा शक्ती एकरुपतेने कार्य करू शकते अन्यथा तीच शक्ती अनेक लक्षांवर वा उद्देशावर विभागली जाऊ शकते. यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...