Skip to main content

भोग आणि ईश्वर ५९३

भोग आणि ईश्वर  ५९३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 

खरतर मनाची विलक्षण शक्ती, या ब्रम्हांडातील अनेक रहस्ये जाणून घेऊन, त्यातून आत्मशक्ती वाढवून व आत्मवृद्धी करण्यासाठी आहे. मनाच्या या शक्तीचा उपयोग मानवाने करावा, यासाठीच विधात्याने, ती शक्ती मानव या एकाच प्राण्याला दिली. उद्देश हाच की, या अद्भुत शक्तीचा प्रत्यय येताच, त्या अनुभूतीने, मानवी मन, ब्रम्हांडातील विश्व शक्तीचा अनुभव घेऊन, त्या शक्तीपुढे नतमस्तक होईल. 

विश्वाच्या निर्मितीत नियंत्याने अनेक गुह्य गोष्टी निर्माण केल्यात, त्यातील अनेक गुह्य गोष्टींची ओळख, माणसाने पुरातन काळातच करून घेतली. सनातन धर्मियांनी, त्यांना धर्माच्या चौकटीत बसवून, मानवाला, इष्ट उद्देशा कडे नेण्यासाठी, अनेक मार्ग शोधून उपलब्ध करून दिले. या कार्यात, भगवंताने, मानवाला मदतच केली आहे. उदाहरणार्थ, या विश्वाचं, गुह्यतम ज्ञान सूर्याच्या मार्फत या जगतातील ज्ञानी लोकांना पोचवून, विश्वा बाहेरील रहस्याकडे मनाला नेऊन, त्यामार्फत आत्मतत्वाला ईश्वराकडे नेण्याचा प्रयत्न करावा. 

मूळ संकल्पना असलेलं मन, शांत करून, त्याला त्याच्या शक्तीची कल्पना त्याला देऊन, उद्देशाची जाणीव करून देऊन, हळूहळू त्या मनाला, त्या प्रक्रियेत नेण, ज्यासाठी ईश्वराने या मनाला त्याची शक्ती दिली आहे, हे होणं वा घडणं अत्यंत महत्वाचं आहे. ते घडण्याचे मार्ग वा पद्धती अनेक आहेत. त्यातील बरेचसे मार्ग वा पद्धती, आज काळाच्या ओघात मागे पडत आहेत. 

पण विश्व नियांत्याला अपेक्षित असलेला एक मार्ग काळाच्या, विश्वाच्या, युगांच्या आणि इतर कोणत्याही कसोटीवर टिकून आहे. ही खूप सहजसुलभ, सहज साध्य, साधी पद्धती आहे. या पद्धतीच्या मदतीने, मनाच्या अपरिमित व अमर्यादित शक्तीचा उपयोग होऊ शकतो. मन एकाग्र होऊ शकतं. मनातील अविचार, वाईट विचार, अप्रस्तुत विचार हळूहळू दूर जाऊन त्यांची जागा, सद्विचार, सद्वर्तन आणि सदाचार घेतात. आत्मचिंतन हा त्या व्यक्तीचा पाया होतो आणि विवेक आणि विचाराने कर्म हे नित्योपयोगी उपचार होतात. 

मुळात प्रत्येक जीवाला, कधीना कधी तरी, शिवाशी अर्थात मोक्षाशी भेट घ्यावीच लागणार असते. पण जर तेच कार्य सर्वात सोप्प्या पद्धतीने साधता आलं तर, नक्कीच ते प्रेरणादायी ठरेल आणि ईश्वरी चिंतनाचा आनंद आणि सांसारिक वा प्रापंचिक अनुभुती , साधता येऊ शकेल. त्या साध्या सोप्या पद्धतीविषयी आपण उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...