Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६१

भोग आणि ईश्वर  ४६१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल अग्नीतत्वासह इतर सहाय्यक तत्व अर्थात supportive element यावर विचार करत होतो. यामध्ये अग्नी या मुख्य तत्वसोबत पृथ्वी, वायू व जल यावर आपण विचार केला. आता अग्नीतत्वासह आकाश तत्व सहाय्यक तत्व असेल तर, अशी व्यक्ती क्रोधीत आणि अव्यक्त वा गंभीर किंवा क्रोधीत पण सखोल विचार करणारी किंवा क्रोधीत व बरसणारी असू शकते. 

म्हणजे राग अनावर झाला तरी तो मनातील आकाशात धुमसत राहून, कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो. किंवा असाच अव्यक्त पणे मनाच्या कृष्णविवरात राहून, अव्यक्तच देहासह मनातच विलीन होऊन, देहापश्चात मनोमय कोषातून आत्म्यासह पुढे जाऊ शकतो. पण हे मनातील supportive element असलेल्या आकाशाच्या स्वरूपावर आणि स्थिती किंवा श्रेणीवर अवलंबून आहे. 

कारण आकाश हे सर्वसमावेशक असू शकतं किंवा पावसाळ्या प्रमाणे सर्व बरसून टाकणारं असू शकतं. म्हणजेच सहाय्यक तत्वाच्या श्रेणीवरसुद्धा हा स्वभावाची वा मनाच्या अवस्थेची स्थिती असू शकते.वास्तविक ही पंचमहाभूतरुप देह बुद्धी व मन या त्रयीतसुद्धा कोणतं तत्व बलवान,कोणतं दुय्यम पण सहाय्यक आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. 

आणि या supportive element च्या देखील पातळ्या असूच शकतात. कारण बलवान अथवा मुख्य प्रभावी तत्व हे सर्वकाळ तसंच असेल, अशी शाश्वतीदेखील देता येत नाही. यामध्ये लहरी व बदलत्या स्वभावाच्या व्यक्ती त्याचप्रमाणे स्थिर किंवा static स्वभावाच्या व्यक्ती असे प्रकार करता येऊ शकतात. म्हणूनच एखाद्याच्या बाबत आपण त्या व्यक्तीचा काही भरवसा नाही वळलं तर सूत नाहीतर भूत आहे, असं जेंव्हा म्हणतो, त्यामागे मनाचा, हा बदलता भाव, कारणीभूत असतो. 

म्हणूनच सरसकटपणे सर्वच उपाय, सर्वांनाच, सारख्या प्रमाणात लागू पडतील असं नाही. याचसाठी आपण म्हणतो की, व्यक्ती तितक्या प्रकृती. यातील प्रकृती हे व्यापक अर्थाने देह बुद्धी व मन यांना वेगवेगळं किंवा संयुक्त समिकरणातून निर्माण होणाऱ्या एकत्र प्रकृतीला वा मिश्रणाला म्हणतात. म्हणून सर्वात प्रथम प्रत्येकाने आपली प्रकृती अर्थात देह बुद्धी व मन यातील संमिश्र भावातून प्रकट झालेली व काहीशी अप्रकट प्रकृती ओळखून, मनाला शांत व स्थिर करण्याची बैठक, तयार करण्याचा प्रयत्न करावा. 

म्हणूनच बलवान वा मुख्य आणि सहाय्यक वा supportive तत्वाचा अभ्यास करावा. त्यातून योग्य व हितकारक तत्वाला बळकटी व अयोग्य किंवा अहित कारक तत्वांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आधी करावा. जेणेकरून त्यातून निर्माण झालेली शांतता मनाला सहाय्यभूत ठरते. तद्नंतर मनातील ऊर्जा व बल यात योग्य प्रमाणात वाढ होते. ती माणसाला योग्य त्या मनःशांती कडे घेऊन जाते. यावर अजूनही सखोल चिंतन करून, व्यक्ती परत्वे प्रत्येकाला योग्य त्या मार्गावर नेऊन, पुढे साधनेच्या मार्गावर प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी काय करावं, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. नामाचा पौष्टिक शिधा मनाच्या अवकाशात सारत सारतच, हे साधण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...