Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५७

भोग आणि ईश्वर  ४५७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कोणत्याही वृत्तीचा, प्रवृत्तीचा, स्वभावाचा वा तत्वाचा माणूस असो, चित्तशुद्धी व आत्मशुद्धीचा मार्ग, मनाला शांत करून, त्या मनाला, चिंतन आणि साधना यात गुंतवूनच पुढे जातो. म्हणजेच एका अर्थाने पाहिलं तर व्यक्तीच्या वृत्तीमुळे पुढे जाण्याचा मार्ग बदलत नाही. पण त्यामुळे, मनाला शांत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांना मात्र कमी अधिक वेळ लागू शकतो. 

जसं जलतत्वाच्या व्यक्ती, हे सहजी साध्य करून, त्या प्रवाहात पुढे जाऊ शकतात. पण पृथ्वीतत्वाच्या प्रभावा तील व्यक्तींना, महत्प्रयास लागतील, हे करावं की न करावं हे ठरवण्यासाठी. म्हणजे उद्देश ठरवण्यासाठी लागणारं चिंतन, त्यांच्याकडे नसल्यामुळे, त्यांना आधी मनाला, काही विचार स्वीकारायला लावून, ते आत्मसात करावे लागतील व काही विचारांचा त्याग करून, त्यासाठी पूर्वतयारी करावी लागणार. 

अग्नीतत्वाने युक्त व्यक्तींना अजून गहन समस्येला तोंड द्यायचं आहे. कारण मनाला शांत करून, अंतर्मुख होण्या साठी अग्नितत्वाचा प्रभाव कमी करून, आकाश तत्वाचा स्वीकार मनाला करावा लागणार. म्हणजे त्यांच्यासाठी संघर्ष मोठा आहे. कारण शीघ्रकोपी वृत्ती बाळगणाऱ्या अश्या व्यक्तींना पार कन्याकुमारी ते हिमाचल असा प्रवास करणं क्रमप्राप्त आहे. कारण आगीवर मात करून त्यातून शीतल जलनिर्मित शांतवृत्ती अंगिकारणं,  हा मार्ग कठीण जरूर आहे. 

अश्या व्यक्तींना सर्वात प्रथम, क्रोध येईल त्या त्या वेळेला, मनाला समजावण्याची सवय जडवून घ्यावी लागेल. या साठी त्यांना, विचारांच्या गतीवर आधी नियंत्रण आणावं लागेल. म्हणजे बोलण्याआधी एक क्षण थांबलं की आपो आप मन, मनात वा डोक्यात आलेल्या शीघ्र विचारांवर चिंतन करेल.  म्हणजे बोलण्याआधी।विचार करायची सवय लागेल. यासाठी सर्वात प्रथम मनाला एक प्रश्न करायची सवय जडवून घ्यायची, माझ्या मनात वा बुद्धीत जो विचार आला आहे, तो बोलून दाखवण्याची खरच गरज आहे का की जरा थांबून बघूया. 

यामुळे बोलण्याआधी, मनाला काही क्षण मिळतील, जेणे करून चिंतनाची सवय मनाला जडेल. असा प्रयत्न व स्वतःचा अभ्यास केल्यास, लक्षात येईल किंवा जाणवेल की, अनेक गोष्टी वा विचार हे न बोलता, टाळण्यासारखे असतात. कदाचित ते काळाच्या ओघात, समोरच्या व्यक्तीला समजतील वा स्वतःला सुद्धा जाणवेल की ते विचार अनावश्यक होते. म्हणजे न बोलून व शांत राहून आपण शहाणपणा केला वा करू शकतो. 

हा विचारांचा व चिंतनाचा धागा पकडून, मनाला शांत होण्याच्या वाटेकडे, अश्या व्यक्ती, मनाला नेऊ शकतात. किंबहुना फक्त अग्नीतत्व युक्त व्यक्तीच नाहीत तर, सर्वच प्रकारच्या व्यक्तींना, या सल्ल्यानुसार  वागून, आपली व समोरच्या व्यक्तीची मनः शांती राखता येईल. 

यावर अजूनही चिंतन आवश्यक।आहे, जे उद्या सुरू ठेवू. तो पर्यंत आपण नामाच्या माध्यमातून, मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...