Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६८

भोग आणि ईश्वर  ४६८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

खरतर कुंडलिनी जागृती हा एक महामार्ग आहे, ज्ञान आणि जाणीवा जागृत होऊन, मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे जाण्याचा. प्रत्यक्षात कुंडलिनी ही, प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयासाने जागृत होतेच. पण ती अन्य अनेक मार्गांनी जागृत होते. महत्वाचं असतं, ते त्या मूलाधार चक्रावर आघात होणं. हा आघात, योगामार्गाने झाल्यास, ती शक्ती, तिच्या सहा चक्रातून अंतिम फिरत, सातव्या सहस्त्रार चक्रात स्थिर होते. 

ही साधकाची अंतिम प्राप्ती आहे. कारण या नन्तर काही प्राप्त करण्यासारखं रहात नाही. याची दोन कारणं आहेत एक म्हणजे अंतिम ज्ञान ज्याला प्राप्त झालं आहे, त्याला अजून काही मिळवायची आवश्यकता व जाणीव उरत नाही. दुसरं कारण म्हणजे निर्विकार व वृत्तीविराहित मनात काही माया, वासना व मोह यांच्या लहरी शिल्लक रहात नाहीत. त्यामुळे काही मागणं वा मिळवणं हे ज्ञानच किंवा ही जाणीवच शिल्लक रहात नाही 

याचं महत्वाचं कारण म्हणजे, त्या आत्मज्ञानाच्या प्रज्वलनाने, आत्मज्योत तेजस्वी होते आणि त्यामध्ये सर्व मोह, माया, बंधनं षड्रिपु यांचा विनाश झालेला असतो. म्हणून एकाच परमपावन ध्येयासाठी ध्येयासक्त झालेला जागृत जीव असतो तो. पण या योग मार्गाव्यतिरिक्त, अपघाताने वा आघाताने किंवा शक्ती पाताने, ज्ञानप्राप्तीने सद्गुरुकृपेने आणि ईश्वरचरणी सर्वसमर्पण भावाने मार्ग क्रमण करत राहिल्यास, हा आत्मप्रकाशाचा दीप नक्की हाती लागतो. 

प्रत्येक मार्गाने किंवा कोणत्याही मार्गाने सर्वथा ज्ञानप्राप्ती जाणिवांची जागृती आणि वृत्तीतून निवृत्ती, हा अंतिम टप्पा प्राप्त होतो.यामध्ये प्रत्येक मार्गाने भिन्न भिन्न काला वधी लागतो आणि  भिन्न प्रकारचे कष्ट आणि कर्म करावी लागतात. या सर्व मार्गां मध्ये सर्वसामान्य मानवाला मानवणारा, जमू शकणारा आणि सांसारिक त्रासातून व खडतरतेतून, पुढे नेणारा मार्ग म्हणजे ईश्वर स्मरण करत करत, नित्यकर्म करत राहून, आपल्या मनातील ईश्वराला सर्वसमर्पण भावातून स्मरत राहणं. 

यामध्ये सद्गुरुचरणावर दृढ भावाने माथा टेकून, आपल्या नामावर पूर्ण श्रद्धा ठेवून, मनापासून व मनातून त्या नामाच्या ईश्वराचे ध्यान व गुणगान करत गेल्यास, सद्गुरुकृपेने, आपली सेवा व भक्ती, नक्कीच इशचरणी रुजू होत राहते.यामध्ये खूप मोठा मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे, ईश्वर किंवा सद्गुरू हे फक्त आणि फक्त मनातील भाव जाणतात आणि त्यालाच पूर्ण महत्व देतात. 

कारण त्यांच्यापर्यंत पूर्ण शुद्ध भावातील लहरिच पोचतात किंवा पोचू शकतात. कारण देहात असलेले किंवा देहा तीत असलेले सद्गुरू, हे त्यांच्या तपसामर्थ्य भावाने, त्या पातळीवर पोचलेले असतात, जिथे फक्त शुद्ध भावातील, शुद्ध मनातील विचारच पोचतात. एक उदाहरण घेऊ. जसं आपण वातानुकूलित खोलीमध्ये असतो तेंव्हा आपल्याला खास तयार करवून घेतलेली हवा प्राप्त होते, ज्यामुळे हवेतील गर्मी किंवा उष्णता वा उष्मा आपल्यापर्यंत पोचतच नाही. 

म्हणजे हवेतील उष्णता निर्माण करून बाष्प वाढवणारे घटक, विशेष प्रक्रियेने काढून टाकले जातात. त्या प्रमाणेच शुद्ध व सात्विक पातळीवर पोचलेल्या व  चैतन्यावस्थेत असलेल्या देही वा विदेही पवित्र आत्म्या पर्यंत, फक्त शुद्ध असलेले भाव पोचू शकतात.  म्हणून शुद्ध मनाने, वृत्तीचा पसारा आवरण्याचा प्रयत्न करून, केलेली प्रार्थना किंवा ईश्वरस्मरण हेच अंतिमतः ब्रह्मांडात विहरत राहून, शेवटी इष्ट शक्तीप्रत पोचतं. 

यावर अजूनही चिंतन, उद्याच्या भागात करूया. पण पुण्याईने व सद्गुरुकृपेने प्राप्त नाम घेतच राहू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...