Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६०

भोग आणि ईश्वर  ४६०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

जल व वायू तत्वांच्या व्यक्तींनी, मनःशांती, मनोबल व ऊर्जा यासाठी काय करावं, हे आपण मागील दोन भागात पाहिलं. आज पृथ्वीतत्वाच्या स्थिर अचल आणि काही प्रमाणात rigid मतं व मन असलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे ते पाहू. मुळात हे static म्हणजे स्थिर मतांचे, मनाचे असल्यामुळे, सहसा यांच्या मतांमध्ये, विचारांमध्ये, आचारांमध्ये बदल संभवत नाही. म्हणजेच एक विचार, मत त्यांना एकदा पटलं की, त्यापासून ते सहसा परावृत्त होत नाहीत, ढळत नाहीत. 

वास्तविक ही एका अर्थाने फायद्याची गोष्ट वा वृत्ती आहे. पण जर हे योग्य विचारात वा दिशेकडे जात असतील तरच.अन्यथा अश्या व्यक्ती फांदी तुटो वा पारंबी, आपली भूमिका वा विचार आणि अर्थातच आचार म्हणजे कृती बदलत वा सोडत नाहीत. म्हणून या लोकांना चांगल्या विचारांकडे, इच्छाकडे वळवणं हेच एक महत्वाचं कार्य आहे. पुढे, अश्या व्यक्ती दृढतेने व स्थिरतेने त्याकडे वाटचाल करतात. 

म्हणून अश्या व्यक्तींनी स्थिर वा शांत बसण्याची सवय लावून घेण्यापेक्षा,सतत चांगल्या विचारांचं,शुद्ध सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या विचारांचं चिंतन मनन केलं पाहिजे. किंबहुना पृथ्वीतत्वाच्या स्थिर बैठकीमुळे यांना शांत वा स्थिर बसण्या साठी सराव करावा लागत नाही. तर ती त्यांची नैसर्गिक किंवा प्रारब्धप्राप्त बैठक वा मनस्थिती असते. म्हणून सतत व दीर्घ चिंतन हाच यांच्यासाठी योग्य अभ्यास आहे. 

अश्या अभ्यासातून, योग्य विचारांची पक्की बैठक वा आसन व्यवस्था, मनात निर्माण झाली की,पुढील साधन करणं, अश्या व्यक्तींना कठीण जात नाही. पण मनातील विचार योग्य दिशेने नेण्यासाठी चिंतनातून जाणं गरजेचं आहे.म्हणजे विचारांची व मनाची अयोग्य दिशेने असलेली स्थिरता,तिथून काढून, योग्य मार्गावर नेण्यासाठी, भूमिके तील आवश्यक बदल हाच खूप मोठा बदल, अश्या व्यक्तीं साठी, महत्प्रयास असतो. 

आता अग्नीतत्वाचा विचार करूया. अग्नीतत्वाने युक्त व्यक्ती अतिरागिट, पटकन क्रोधीत होणाऱ्या, शीघ्रकोपी स्वभावाच्या असतात. बरेचवेळा रागाच्या भरात, अति जलद कृती करून वा अविचारी व विखारी बोलून, माणसं दुखावणं व दुरावणं हे या व्यक्तींच्या प्रारब्धात जन्मतः लिहिलेलं असतं. यामध्ये काही प्रकार आढळतात. एक म्हणजे अग्नीतत्वा बरोबर,पृथ्वीतत्व सहाय्यक तत्व वा supportive element असेल तर, यांनी क्रोधाच्या भरात केलेल्या चुकीच्या, काया वाचा वा मन, या माध्यमा तील कर्माचं, समर्थन करणं, हा यांचा स्वभावदोष असतो. 

दुसऱ्या प्रकारात अग्नीतत्वाबरोबर, वायुतत्व सहाय्यक वा supportive असेल तर यांचा क्रोध व चुकीची भूमिका अधिक आक्रमक रूप धारण करू शकते. याऊलट जर अग्नीतत्वा बरोबर, जलतत्व सहाय्यक वा supportive असेल तर, अश्या व्यक्ती शीघ्रकोपी व तितक्याच शीघ्र शांत होणाऱ्या, असतात आणि आपली झालेली चूक या लोकांना नक्कीच पश्चात्तापदग्ध बनवून, खजील करते व जर व्यक्ती निर्मळ वा सरळ स्वभावाची असेल, तर आपली चूक कबूल करून मोकळेपणाने सांगायची हिम्मत यांच्यात असते. 

उद्याच्या भागात आपण अश्या अनेक प्रकारच्या अग्नी तत्वाने युक्त व्यक्तींना शांत करून, योग्य मार्गावर नेण्या साठी काय केलं पाहिजे ते पाहूया. पण या शेवटच्या प्रकारातून एक गोष्ट ध्यानात आली असेल की, मानवी मन हे एकाच तत्वाच्या भाराने युक्त असत नाही. ते अनेक तत्वाचं मिश्रण असतं. It means it is a bundle of mixed elements of nature.यातील कोणतं प्रभावी असेल हे, प्रारब्ध, वेळ व काळ, इच्छाशक्ती,मनः शक्ती या सर्वांच्या मिश्रणीय प्रभावातून ठरतं. 

पुढील भागात हाच विचार अजून पुढे नेऊ. पण तोपर्यंत आपलं नामचिंतन सुरूच ठेवू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...