Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७७

भोग आणि ईश्वर  ४७७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

सुखप्राप्तीची इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा ही माणसाला कर्मप्रवृत्त करते. कर्मी रत राहण्याची इच्छा जागृत राहण्यासाठी ही सुखप्राप्तीची इच्छा आणि त्या इच्छेतून निर्माण होणारी रुची मनाला त्या कर्माची प्रेरणा देऊन कार्यरत ठेवते. म्हणजेच मनातील ऊर्जा आणि शक्ती याना स्फूर्ती देतेअर्थात stimulate  करते. असा stimulation किंवा स्फूर्तीचा झरा बाह्य औषधं किंवा व्यसनाने सुद्धा प्राप्त होतो. पण तो तात्पुरता असतो. ती नशा किंवा त्या औषधाचा परिणाम उतरल्यावर पुन्हा माणूस आपल्या मूळ विश्वात परत येतो. 

असं कृत्रिम stimulation अर्थात स्फूर्ती प्राप्त करण्याची ओढ वा सवय फक्त व्यसनाधीन लोकांनाच असते हा सार्वत्रिक गैरसमज आहे. माणसाला दैनंदिन जीवनात अनेक मोह, माया, लोभ मद इत्यादी विकारांच्या प्रभावाची नशा माणसाला अनेक दुष्कर्मांना प्रवृत्त करते. ही चुकीच्या परिणामांची प्रलोभनांचं stimulation किंवा स्फूर्ती, शारीरिक नशेप्रमाणेच अंती किंवा कर्मफल स्वरूपात आत्मघाती किंवा जन्मजन्मांतरीच्या चक्रात नेऊन उभी करणारी आहे. 

म्हणजेच stimulation किंवा अपेक्षांच्या पुर्ततेची नशा ही सर्वसाधारणपणे मनाला बुद्धीला आणि देहाला कार्यरत ठेवतं. पण मानवी मन हे कधीही या सर्वाने तृप्त होत नाही. म्हणजे सतत कर्मरत राहण्यासाठी सतत अपेक्षांची नशा आणि अपेक्षा भंगाच्या दुःखातून पुन्हा नैराश्य, पण पुन्हा नवीन नशेच्या मागे लागून,पुन्हा पळणं. याच चक्रात कितीक जन्म फिरत राहण्याची नशा. 

सहा नशेचा अंमल जन्मोजन्मी मानवी मनावर अनेक रुपात अनेक प्रकारे गारुड घालतो. त्या नशेच्या मागे मानवी मन देह बुद्धी यांना सतत प्रवृत्त ठेवतं आणि कर्माचे ढीग अर्थात डोंगर उभे करून,पुन्हा त्यांच्या परिणामांनी खट्टू होतो. जर काही चांगलं समोर आलं तर माणूस आनंदी होऊन,पुन्हा नव्या जोमाने कर्ममग्न होतो. 

पण हेच अनिष्ट वा दुःखकारक समोर आलं की मग त्या मागची कारणं शोधतो. वास्तविक आपलंच हे अपेक्षांच्या मागे धावून कर्मरत राहून चालणं हेच अनेक कर्मांच्या फलांना जन्म देते. ते परिणाम अनेकवेळा कालांतराने येतात. पण माणूस नेहमी त्यांची संगत चुकीच्या कर्मांशी लावून अजून चुका करण्यास प्रवृत्त होतो. असा हा बेरीज वजाबाकीचा खेळ खेळत पूर्ण आयुष्य निघून जातं. 

याचा काही तोड इलाज किंवा उपाय नाही का, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया आणि तोपर्यंत नामाचा आनंद घेत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...