Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०४

भोग आणि ईश्वर  ४०४ 

अंतकरणाची शुद्धता ही व्यक्तीसापेक्ष नसते. तर तिचे काही निश्चित मापदंड आणि गुणधर्म आहेत, जे अश्या माणसाला, इतरांपासून वेगळं दर्शवतात. अश्या लोकांच्या हृदयात करुणा आणि मनात ममत्व असतं. यांच्या मनात आपपर भाव नसतो. शुद्धता ही सात्विकतेच्या जवळची असल्यामुळे, अश्या व्यक्ती सत्वगुणयुक्त असतात. 

त्यामुळे त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने वातावरणातील शुद्धता जाणवते. एक खूप महत्वाची खूण म्हणजे, अश्या माणसांच्या असण्याने तामसी माणसांना त्रास होतो. कारण त्यांच्यातील तामसी लहरींना छेद देणाऱ्या सात्विक लहरी, अश्या शुद्ध अंतःकरणाच्या माणसांपासून परावर्तित होतात. ही एक बाब किंवा अश्या काही व्यक्ती सोडल्या तर सात्विक व शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्ती नेहमी हव्याहव्याशा वाटतात. 

शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्तींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दृष्टी स्वच्छ असते आणि मन शांत असतं. प्रत्येक समस्येकडे पाहण्याची यांची दृष्टी निकोप असते. त्यामुळे त्यांना मुळात समस्या या समस्या वाटतच नाहीत. उलट अश्या व्यक्ती कोणत्याही समस्येत, विवंचनेत दिसणार नाहीत. अंतःकरणाच्या शुद्धतेमुळे, कोणत्याही समस्येकडे, समस्या म्हणून न पाहता, आव्हान आणि एका प्रश्नाची सोडवणूक म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना प्राप्त असते. 

अश्या व्यक्तींशी बोलून आपल्याला खूप हलकं वाटतं. म्हणजे प्रश्न सुटला नाही तरी तो सुटण्याबद्दलचा आत्मविश्वास जरूर जागा होतो. शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्ती अत्यंत निरलस व निर्लोभी असतात. अश्या व्यक्तींचा प्रत्येकाकडे, प्रत्येक घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन एकसमान असतो. एका समत्व दृष्टीने ते जगताला पहात असतात. त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केले तरी यांचं मन कोणाहीबाबत कलुषित होऊ शकत नाही. 

उलट आलेल्या प्रत्येकाला ते योग्य काय आणि अयोग्य काय, हे समजावून सांगतात. अश्या व्यक्ती वस्तुनिष्ठ असतात. प्रत्येक गोष्टीला त्या त्या भावाने जाणूनही, त्यातील फक्त शुद्ध भाव ठेवून बाकीचे भाव, सोडून देण्याचा त्यांचा स्वभाव असतो. म्हणूनच चांगला व वाईट असा भेद न करता, प्रत्येकाला योग्य संधी दिली पाहिजे, असा यांचा आग्रह असतो. 

याचे अजूनही काही पैलू, जे आपण उद्याच्या भागात पाहूया. आपलं नामस्मरण चालूच ठेवूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...