Skip to main content

भोग आणि ईश्वर ४२०

भोग आणि ईश्वर  ४२० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)

चुकीच्या विचारांवर, खर्च होणारी ऊर्जा व शक्ती नियंत्रित करण्याचा नुसता विचार केल्यावर, लक्षात येईल की, आपण मन, बुद्धी व देह यांना अकारण त्रास देऊन निष्कारण ऊर्जा व शक्ती वाया घालवत होतो. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. आपण नेहमी एका मार्गाने कार्यालय किंवा भाजी आणायला किंवा काही नियमित कामासाठी जातो. तो मार्ग लांबचा, पण आपल्या माहितीचा असलेला एकच मार्ग आहे. 

एके दिवशी एक मित्र किंवा स्नेही आपल्याला वाटेत भेटतो आणि चौकशी करताना आपण सहज बोलून जातो की, अमक्या अमक्या ठिकाणी आपण रोज या मार्गाने कामा निमित्त जातो. त्यावर तो मित्र वा स्नेही, आश्चर्याने म्हणतो अरे एवढ्या लांबून का जातोस. तुझ्या घराजवळून एक मार्ग आहे, त्याने तुझा वेळ निम्म्याहून वाचेल आणि श्रमसुद्धा वाचतील. 

चल मी तुला दाखवतो तो जवळचा रस्ता. असं म्हणून तो मित्र आपल्याला जवळून जाणारा आणि माहीत नसलेला मार्ग दाखवून चक्रावून सोडतो. आपण विचार करतो की, उगाचच आपण, इतके दिवस, कष्ट आणि वेळ वाया घालवले. पण याबाबत कर्मसिद्धांत लक्षात ठेवावा,की त्याने काही ऋण फेडून आपल्याला हा नवा मार्ग सांगितला आणि आधीचे श्रम निष्कारण नव्हते, तर ते पूर्वीच्या संचिताची फेड होती.  निदान इथून पुढे तरी आपला फायदा होईल. हा विचार करून, मागील श्रम व वेळ यांचा विचार सोडून द्यायचा. 

या उदाहरणावरून एक लक्षात येईल की, अकारण व निष्कारण वाया जात असलेली, मन बुद्धी व देह यांची ऊर्जा व शक्ती, यांची महती लक्षात आल्यावर, आपली स्थिती वरील उदाहरणाप्रमाणेच होईल. आता प्रश्न आहे उरलेल्या पन्नास टक्क्यांचा. आता वाचलेली ऊर्जा व शक्ती अधिक सकारात्मक व उन्नतीकडे नेणाऱ्या कार्या साठी वापरता येईल. म्हणजे मन बुद्धी व देह यांना अकारण कष्ट देण्याचा प्रश्न सोडवून, आपण मनावरील कितीतरी भार हलका केला. 

कारण कोणतीही शक्ती व ऊर्जा एकदा खर्च झाली की ती, परत येत नाही. किंबहुना निष्कारण वाया गेलेली ऊर्जा व शक्ती, तितकीच ऊर्जा व शक्ती फलप्राप्तीच्या वेळी खर्च करवून घेते. आता मनाला जर हे पटलं असेल, तर अश्या नकारात्मक अहितकारक व त्याज्य चिंतना ऐवजी, नक्कीच काही सकारात्मक, दुप्पट उर्जाप्राप्त करून देणारे विचार, आपण मनात मुद्दाम व पद्धतशीर पणे आणून, ते विकसित करू शकतो. 

ज्याप्रमाणे नवीन रोपांची व झाडांची मशागत करून काळजी घेतो, त्याप्रमाणे या नवीन कार्यात लागणाऱ्या ऊर्जा व शक्ती यांचा सदुपयोग करून घेता येतो. त्यातून चिंतनाला व विचारांना योग्य दिशा आणि मार्ग देता येतो. यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण नाम करत करतच. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...