Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०५

भोग आणि ईश्वर  ४०५

शुद्ध अंतःकरणाबद्दल जाणतांना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ती माणसं, सौम्य व शांत असली तरी, विचाराने ठाम आणि अविचल असतात. म्हणजेच, कोणत्याही बाह्य शक्तींचा, विचारांचा व वादळांचा परिणाम त्यांच्या विचारां वर, बोलण्यावर व वागण्यावर होत नाही. किंबहुना त्यांची ठाम मानसिकता, या गोष्टींचा कोणताही विपरीत परिणाम यांच्या मनावर , विचारांवर, बुद्धीवर व कृतीवर होत नाही. 

कारण शुद्ध अंतःकरण असलेल्या व्यक्ती बुद्धी, विचार व कृती यांनी प्रगल्भ असतात. म्हणजेच शुद्ध अंतःकरण व्यक्तीच्या चारित्र्यात, विचारात, वागण्यात अशी सर्वत्रच शुद्धता आणतं. अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, ही शुद्ध अंतःकरणाकडे वाटचाल एका रात्रीत होत नाही. किंवा सहजपणे होत नाही. पण त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची शांतता अर्थातच मनाची खोली वाढवणं आवश्यक असतं. मनाची खोली अर्थातच विचारांचा गुंता कमी करून,मनाला शांतपणे विचार करायला शिकवणं, महत्वाचं आहे. 

त्यातून विवेक वाढीला लागतो. विवेक जागृत होऊन , तो वाढीला लागला की, आपोआप विचारांना प्रगल्भता येते. मनातून सर्व प्रकारची किल्मिष, गोंधळ, गडबड सर्वकाही शांत होऊन विचारांना एक निश्चित दिशा, मार्ग मिळालेला असतो. आता हे सर्व सध्या होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे मन शांत करणे. 

मन शांत करण्याचे अनेक उपाय आहेत. पण त्यातील सर्वात उत्तम उपाय कमी श्रमात आणि दीर्घकाळ व  उत्तम परिणाम।देणारा हवा. यामध्ये सर्वात प्रथम मनाचा ठाम निश्चय महत्वाचा आहे. मनाला शांत करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे, सुरवातीला दिवसातून काही वेळ, ठरवून, काही न करता, शांत बसण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये देहाला, देहासह बुद्धीला आणि देह बुद्धी यांसह मनाला शांत बसण्याचा अनुभव व अनुभूतीचा आनंद घेता येईल. 

मनाची शांतता हा अंतःकरण शुद्धीचा पहिला टप्पा झाला. यानंतर विचारांनादेखील शांत करण्याचा प्रयत्न करणं हा दुसरा टप्पा आहे. यामध्ये विचारांना शांत करताना विवेकसुद्धा जोपासणं गरजेचं आहे. कारण त्यामुळेच विचार करता करताच चुकीचे विचार व योग्य विचार असा भेद ओळखता येईल. नकारात्मक विचारांना येता येता बांध घालता येईल आणि सकारात्मक विचारांनी मन भरून टाकता येईल 

या दोन टप्प्यात मनाची शांतता आणि योग्य विचारांची मार्गक्रमणा या दोन टप्प्यातून गेल्यावर, तिसऱ्या टप्प्यात विवेकाने विचारांना योग्य ती दिशा आणि आलेल्या सर्व विचारांतून योग्य विचारांना निवडता येणं आणि नको असलेल्या विचारांना कोणताही आतातयीपणा न करता बाजूला सारणं किंवा कोणतीही जोरजबरदस्ती न करता, त्यांना मनात येण्यापासून थांबवता येणं हे जमलं पाहिजे. 

यावर अधिक विस्ताराने उद्या बोलू पण नामाचं रोजचं कार्य सुरू ठेवूनच. 

भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...