Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३९

भोग आणि ईश्वर  ३३९ 

ती त्रयी कोणती हे जाणण्याचा प्रयत्न करताना, काही गोष्टी आधीच समजून घेणं महत्वाचं आहे. अध्यात्मिक प्रगतीच्या वाटेवर, इष्ट स्थानकं येतील किंवा अनिष्ट . पण आपला पाय त्यात रुतू न देता,सर्व प्रगती साधावी लागते. विश्वनियंत्याने सर्व ज्ञानभांडार खुलं करून दिलं आहे. परंतु, त्यातून आपल्याला हवी असणारी वाट ओळखून पुढे पुढे जात राहण्यात भलाई आहे. 

याचसाठी आणि चुकणार तेंव्हा वाट दाखवायला सद्गुरू तत्व निर्माण करून, त्यावर साधकांना, मुमुक्षु, ज्ञानी यांना चालण्याची सोय करून ठेवली आहे. यावर जे साधक, भक्त व इच्छुक चालले व चालतात, त्यांना अनेक जन्मा तून पुढे नेण्याची जबाबदारी ही सद्गुरूच घेतात. त्याच प्रमाणे प्रत्येक जन्मात त्यात प्रगती होतच राहील यासाठी जरूर तेंव्हा आत्मबल जागृत करतात. आता इथे पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की, मग ज्यांनी सद्गुरू केले नाहीत, किंवा ज्यांना सद्गुरू लाभले नाहीत (हे म्हणणं योग्य आहे,कारण सद्गुरू लाभणं हा कर्मफल व दैवी योग आहे. 

हे म्हणजे काहीजण क्लास लावून, शिकतात आणि काहीजण स्वतः अभ्यास करून उत्तीर्ण होतात. मग जे क्लास न लावता शिकून उत्तीर्ण होतात ते नक्कीच, अव्वल आहेत. परंतु हा त्यांच्या इच्छाशक्ती, कर्मशक्ती व साधनेचा जोर व त्यासाठी आवश्यक ईश्वरी सहाय्य, याचं फल आहे. अश्या साधकांना व मुमुक्षुना, ईश्वर नक्कीच विलक्षण प्रकारे, सहाय्य करतो.  परंतु सर्वांनाच तसं जमेल याची शाश्वती नाही. याशिवाय, जे सद्गुरुशिवाय साधतात, त्यांच्यामागे, त्यांची आधारभूत ईश्वरी प्रेरणा नक्कीच उपयोगात येते. 

पण म्हणून ज्यांना तसा आत्मविश्वास व विशेषतः ज्याचं आत्मबल जागृत नसेल,  त्यांना, त्यासाठी,  नक्कीच सद्गुरु कृपा, प्रेरणा व बल यांचा आधार लागतो व लाभतो. म्हणूनच त्याचं कुशल व इष्ट कर्माची प्रेरणा व प्रत्यक्षात घडणं, हे त्याच प्रेरणेचा परिणाम आहे, हे नक्की. सद्गुरुकृपा नक्की काय करते आणि त्यायोगे आपली त्रयी कोणती व ती कशी साधायची हे पुढील भागात पाहूया. आज इथेच थांबू. कारण सकाळपासून ज्वर येईल असं वाटून, आता जरा उतार पडला होता. म्हणून, हा भाग लिहून घेतला. पण अशक्तपणामुळे पुढे लिहीता येत नाही. 

पण ही लेखमाला हा दैनंदिन संकल्प असल्याकारणाने आणि त्यात आजपर्यंत खंड न पडल्यामुळे, आता जमेल तितकं लिहून, पोस्ट करतोय. सद्गुरुकृपेने सकाळपासून अशक्तपणा होता, पण हे लिहिण्याचा विचार आला आणि बळ व उत्साह आला. पण आता थांबतो. सद्गुरुकृपेने ही मालिका अखंड अशीच सुरू  राहूदे, यासाठी प्रार्थना करूया. नाम हाच या भुधरेला आधार आहे आणि आपण विश्वाच्या माऊलीचं नित्याचं स्मरण करत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...