Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४६

भोग आणि ईश्वर  ३४६

ईश्वराच्या या संपूर्ण खेळात प्रत्येक जीव हा म्हटलं तर परावलंबी आणि म्हटलं तर स्वावलंबी आहे. स्वावलंबी यासाठी की प्रत्येक जीव कर्मसिद्धांताप्रमाणे फक्त आणि फक्त स्वतःच्याच कर्मा साठी बद्ध होतो आणि असतो. म्हणजे यातून निघू शकणारा सर्वात पहिला निष्कर्ष हा की, त्याच्या आयुष्यात,प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे, घडणारी सुक्ष्मातील सूक्ष्म व मोठ्यातील मोठी कोणतीही गोष्ट, घटना वा प्रसंग, सुख व दुःख,भोग व उपभोग, रोग, आजार, उत्तम आरोग्य इत्यादी सर्व त्याच्याच पूर्वकर्मा तील फलानुसार घडतं आणि घडणार. 

हा खरतर वैश्विक सिद्धांत आहे आणि यात एका अणूचाही बदल विधाता किंवा ईश्वर करू शकत नाही आणि करत नाही. स्वतः ईश्वरसुद्धा याच नियमाने बद्ध असल्याने, सर्व लीलासुद्धा या नियमाला व सिद्धांताला धरूनच होतात वा घडतात. म्हणजे वालीच्या अकारण वधाचा आक्षेप, श्रीराम जन्मात अंगावर घेऊन, श्रीकृष्ण जन्म समाप्त करण्याचं कारण, ईश्वरालासुद्धा तयार करावं लागलं. 

त्याचप्रमाणे एका कथेनुसार कश्यप ऋषींची द्वितीय  पत्नी दिती यांनी, देवासुर संग्रामात असुरांना आश्रय दिल्याच्या प्रमादाची शिक्षा म्हणून दितीचं शीर श्रीविष्णूंनी धडावेगळे केल्यावर, त्या कर्माचा परिणाम म्हणून,  ऋषींच्या क्रोधातून मिळालेल्या शाप स्वरूपात, रामजन्म तर घडला,पण माता सीतेशी विरह मात्र,भगवंत असूनही, कर्मफल स्वरूपात स्वीकारावा लागला. 

म्हणजे हेच स्वावलंबित्व हे फक्त कर्म करण्याचं स्वातंत्र्य या स्वरूपात तार्किक दृष्टीने जरूर, प्रत्येक आत्म्याला, निदान मनुष्य जन्मात तरी मिळाल्याचं दिसत असलं तरी, कर्मफल शृंखला इतकी चक्रव्यूहात्मक आहे की, मनावर दुःख भोग व सुखाचे उपभोग, माया, इच्छा, आकांक्षा, लोभ मोह यांच्या प्रचंड प्रभावामुळे वास्तविक ते स्वातंत्र्य असून नसल्यासारखं आहे किंवा असतं. 

म्हणजे स्वातंत्र्यातील परावलंबित्व असा हा किचकट तिढा किंवा गुंता आहे. म्हणजे अनेकदा सोन्याचं ताट समोर येऊनही, त्यातून सुखाचा एकही घास न खाण्याचा योग किंवा दैवयोग भाग्यात वा प्रारब्धात येतो. अशी कित्येक उदाहरणं बघायला मिळतात, ज्यामध्ये दात आहेत तिथे चणे नाहीत आणि चणे आहेत तिथे दात नाहीत, हे दृश्य पहायला मिळतं. 

हाच योग सुखाच्या वा उपभोगाच्या बाबतीतही म्हणता येईल. माणूस आयुष्यभर खस्ता काढून, हालअपेष्टा सहन करून, काबाडकष्ट करून, एखादी नोकरी, व्यवसाय यामध्ये जम बसवून नाव कीर्ती पैसा मिळवतो.पण लौकिकार्थाने मिळालेल्या या पैशाच्या उपभोगाच्या काळात एकतर देह गलितगात्र झालेला असतो किंवा नष्ट होऊन, आपल्या पुढील मार्गावर निघून गेलेला असतो. 

म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या असलेलं, कर्माचं हे स्वातंत्र्य किंवा स्वावलंबित्व, वास्तविकपणे फोल किंवा निरर्थक ठरतं. त्यामुळे हे स्वावलंबित्व वास्तविकपणे परावलंबित्वच ठरतं. अजून एका अर्थाने हे परावलंबित्व विशेष अधोरेखित होतं. ते म्हणजे, श्रीमद्भगवद्गीतेतील नियमा नुसार कर्म करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य मानवाला जरूर आहे. पण त्याच्या फलावर त्याचा स्वतःचाच अधिकार नाही. 

कसं यावर उद्या विस्तृतपणे चर्चा करूया. पण तोपर्यंत आपल्या हातात असलेली आणि भगवंताला प्रिय असलेली एक गोष्ट म्हणजे नामस्मरण, ते तर नक्कीच आपण करू शकतो. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...