Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४०

भोग आणि ईश्वर  ३४० 

सद्गुरूकृपेची प्राप्ती आणि परिणाम हा एका जन्माचा किंवा एका जन्मातील साधना व कर्म यांचा परिणाम नाही. म्हणून जे जे साधक सद्गुरू मार्गात नित्य राहतात  त्यांना त्या कृपेचा ओघ प्राप्त होतोच, कधी व कोणत्या जन्मात, हे साधना व संचित हे दोन स ठरवतात. 

नित्य व अविरत सद्गुरू व नामस्मरण करणाऱ्या साधकांना त्यातून जीवनात अशी अमूल्य प्राप्ती होते की, अनेक जन्मांची पापं सहज परिमार्जित होतात. यामुळे होणारे लाभ मुख्यतः आत्मज्योति आत्मानंद व आत्म शांती प्राप्तिकडे नेतो. संसारात प्राप्त झालेले लाभ हे तुम्हाला आत्ममार्गात व नाममार्गात पुढे नेण्यासाठी व नेण्याइतकेच असतील, किंवा असावेत. 

खरतर भगवंतांनी, श्रीमद्भगवद्गीतेत जे सांगितलं आहे आणि त्याचं माउलींनी ज्ञानेश्वरीच्या अमृतवाणीतून, ते अलौकिक ईश्वरी शब्दात आणि अतिशय रसाळ भाषेत रूपांतरण करून, मूळ रूपापेक्षा, प्रतिमा अत्युत्तम व्हावी असा आत्मयोग साधून दिला की, त्याची गोडी आज आठशे ते नऊशे वर्ष झाली, कमी न होता अजून वाढत आहे. त्यांच्या सर्व सिद्धीचं, ज्ञानाचं सार, त्यांनी या अमृतवाणीत ओतून, साधक, आत्ममार्गी,  सर्व पतित यांना आत्मोद्धाराची वाट मोकळी करून दिली. 

युगानुयुगे जे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक होतं, त्यांना ते प्राप्त होणं आवश्यक होतं, पण प्राप्त झालं नाही,ते प्राप्त होण्या साठी नर जन्मांत येऊन,स्वतः श्रीकृष्णांना हा त्रास घ्यावा लागला. पण त्यांनी मांडलेल्या या ज्ञानयज्ञाची, अद्वैत तत्व ज्ञानाची सारांशरूपात मांडणी करायची झाल्यास, एका त्रयी मध्ये त्याला सामावता येईल. ती म्हणजे जाणीव, ज्ञान व इच्छा. या त्रयीचा अभ्यास करण्याची गरज आहे. 

त्यानंतर आपल्याला, ज्ञानेश्वरीचा, माऊलींचा,वैष्णवांचा अभ्यास आपोआप करता येईल. ही त्रयी खरतर माया, वासना, दुर्वर्तन त्याचप्रमाणे ईश्वरप्राप्ती, यांचा भाग आहे. कारण दोन्हीमध्ये हीच त्रयी कार्यरत असते आणि आपलं अहित, नाश वा हित साधून देते. मनुष्याच्या किंवा कोणत्याही जीवाच्या, जन्माबरोबर या तिन्ही गोष्टी वा ही त्रयी, आपलं कार्य सुरू करते. जन्म झाला की, जठराग्नि रूपात भुकेची जाणीव जागी होते. जाणीव म्हणजे एखादी गोष्ट लागणं किंवा मिळावी अशी वाटणं किंवा गरज व आवश्यकता निर्माण होणं. 

जन्माला येण्याआधी सर्व माया, वासना इत्यादींचा बोध, आत्म रूपाला असतो. कारण ती चैतन्यावस्था असते, शून्यत्व असतं, एकप्रकारे निर्वातता असते. त्यामध्ये सर्व जाणीवा अतृप्त स्वरूपात स्थित असतात आणि मनोमय कोषातून साठवलेला संचिताचा भारसुद्धा सोबत घेऊन, हा आत्मकोष कर्मांच्या पूर्तीसाठी, स्थान, उदर यांच्या शोधार्थ फिरत असतो.  तशी घटिका भरल्यानंतर, योग्यवेळी पंचमहाभूतरुप देहात प्रवेशते. 

हा देह प्राप्त होताच, सर्व जाणीवा या संचिताचा भार कमी करण्यासाठी देहाच्या माध्यमातून, आपली जाणीव वेगळ्या मार्गाकडे वळवतात. देहाच्या जंजाळात अडकलेला जीव , आत्मशोध, आत्मोन्नती या मूळ ध्येयाच्या जाणीवा पूर्ण विसरून, जडजीव होऊन, अपूर्णतेचा प्रवास सुरु करतो. अपूर्णता ही, अप्राप्त ते प्राप्त करण्याची ओढ, जी मुळातच या जडदेहाचं, माया व षड्रिपु यांच्यावर असलेलं अवलंबित्व, जे या अपूर्णते कडून परत परत अपूर्णतेकडेच घेऊन जातं. याचं सखोल विवेचन व चिंतन पुढील भागात पाहूया. परंतु आपला नामाचा नित्य प्रवास आपण करतच राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...