Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३७

भोग आणि ईश्वर  ३३७ 

खरतर मायेचा, असुर शक्तीचा, पूर्वकर्मातील दोषांचा, वर्तमान कर्माच्या चुकांचा असा सामूहिक परिणाम म्हणजे आपले भोग आणि त्यातील चांगल्या व सकारा त्मक गोष्टी म्हणजे आपले उपभोग. हे आयुष्य असंच चालू राहून, चक्रव्यूहात्मक जन्ममरण गोलाकार फिरत राहिलं तरी काय हरकत आहे, हा एक विचार मनात येऊच शकतो. म्हणजे जे आहे जसं आहे तसं, जगत जायचं. त्यात आपण घातलेली कर्मांची भर वा घट, यातील काहीही लक्षात न घेता आणि कर्मशृंखला न मोजता, पुढे पुढे जात राहायचं, असा एक विचार येऊ शकतो. 

विचार यायला गैर काही नाही. पण मग आपण व प्राणी यात फरक काय राहिला. मानवाला बुद्धी, विचार यांची प्रेरणा व चैतन्यशक्तीची जाण, जाणीवा, जागृतता, वैचारिक प्रवृत्ती, वैखरी ते परा हे वाणींचे अद्वितीय वरदान, लौकिक व पारलौकिक पातळीवर जाण्याची, शक्ती, तयारी व कुवत इत्यादी सर्व भगवंताने दिलंच नसतं. किंबहुना हे कशासाठी दिलं आहे, हे जाणण्याची जाण अर्थात जाणीव सुद्धा त्या सृष्टीकर्त्याने दिली आहे. 

म्हणजे जे गहन, गूढ, गुह्य, असं पारलौकिक ज्ञान आहे ते, ग्रहण व आत्मसात करून ते पुढे नेण्याची कुवत, आत्मविश्वास व आत्मबल याचसाठी भगवंताने दिलं आहे की, जेणेकरून माणूस, यावर विचार करेल की, हे का, कसं आणि यावर उपाय काय. कारण तेच त्याच्या प्रगतीचं प्रतीक आहे व असेल. अनेक ऋषीमुनी, संत महंत,साधुपुरुष व सत्पुरुष यांनी हे जाणुन, ते ज्ञान विशिष्ट पद्धतीने सूत्रबद्ध करून,त्यांची विषयवार विभागणी करून, हे ज्ञान, मूळ स्वरूपात टिकवून ठेवलं आहे. 

हेच ज्ञान आधुनिक जगतात, सद्गुरूमय चैतन्यशक्तीने, आद्य काळापासून ते  सांप्रत काळापर्यंत उत्कृष्टरित्या, सतत टिकवून ठेवलं आहे. अगदी आधुनिक जगतात सुद्धा शास्त्रज्ञ, संशोधक, इत्यादींनी ते संशोधित करून, विज्ञानरुपात आपल्या समाजाच्या उपयोगासाठी विविध शोध, या रुपात ते मांडून, खरतर मानवी जीवन मूल्य समृद्ध करण्याचाच प्रयत्न केला आहे. 

पण प्रत्येक गोष्टीमागे व त्याच्या परिणामांमध्ये जश्या,  सुष्ट व दुष्ट, सज्जन व दुर्जन शक्ती या प्रभाव टाकतात. किंबहुना पुराण काळापासून या सुर व असुर स्वरूपातील शक्ती आपापल्या प्रभावानुसार प्रत्येक क्षण, प्रत्येक मन अंतर्मन व अंतरात्मा याद्वारे विचार  यांचा ठाव व ताबा घेऊन, आपलं बस्तान बसवून, विधात्याला सहाय्य अथवा विरोध करत असतात. मग ते व्यावहारिक पातळीवरील जगत असो किंवा वैचारिक, भावनिक व आधी आत्मिक पातळीवरील जगत असो. प्रत्येक क्षणी या शक्ती नित्य आपल्या शक्तीने मानवी मनात मंथन करत असतात. 

या मंथनाचा पौराणिक काळातील समुद्र मंथनाशी संबंध आहे का, असल्यास काय, हे पुढील भागात जाणून घेऊ. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...