Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४२

भोग आणि ईश्वर  ३४२

या विश्वात आलेल्या आणि देही किंवा विदेही असलेल्या प्रत्येक आत्म्याचा उद्धार व्हावा, ही सद्गुरू आणि ईश्वर यांची आंतरिक तळमळ असते. संसाराच्या सागरात अडकलेल्या आणि मूळ उद्देशापासून,प्रचंड दूर गेलेल्या जीवांबद्दल,करुणा आणि दया असणं, हा ईश्वराचा व त्याचाच अंश असलेल्या सद्गुरूंना अपार संवेदना आणि करुणा वाटते. 

खरतर एकाच आईच्या लेकरांच्या प्रारब्धात, त्यांच्या त्यांच्या कर्मांनी, त्यानीच लिहून ठेवलेल्या व काळाच्या ओघात व प्रत्येक जन्मात, आयुष्याच्या वाटेवर, त्याची फळं भोगणाऱ्या आणि उपभोगात मश्गुल राहून, पुढील प्रारब्धाची जाणीव नसलेल्या, प्रत्येक जीवाला, अश्या प्रकारे तडफडताना पाहून, परम ईश्वराला होणाऱ्या यातना एक आईच समजू शकते. 

तरीही यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी, आईचा जीव तीळ तीळ तुटतो. पण ज्या जीवासाठी हा कळवळा आईला असतो, त्या मुलाला त्याची काही चिंता नसेल तर, आईला असह्य यातना होतात. ईश्वर तर विश्वाची आई, जगतजननी आहे. त्यामुळे यातून प्रत्येक जडजीव बाहेर यावा यासाठी, ईश्वर अनेक रुपात, अनेक पर्यायात अनेक मार्ग, अनेक दिशा, निर्माण करून, त्याआधारे, या जीवांना,काही दिशा,मार्गदर्शन व मार्ग योजतो. अष्टांग योग, नवविधा भक्तीमार्ग, निष्काम साधना, ज्ञानप्राप्ती यातील एक सुलभ पर्याय निवडून,त्याचा अवलंब करून, या जन्ममरण चक्रातून, बाहेर पडण्याचा निदान प्रयत्न जरी करतील तरी त्याला ईश्वर अनंत कृपेची द्वारं उघडून, नक्कीच मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाईल. साधक, भक्त, ईश्वरमार्गी यांनी, टाकलेल्या एका पावलावर कृपेची बरसात करण्याच्या या गोष्टीला सद्गुरू व ईश्वरी कृपेचा सागर म्हणतात. 

दयाघन ईश्वर व सद्गुरू, या मार्गाकडे वळलेल्या भक्तांना, नित्य आपल्या कृपाछायेत ठेवून, त्यांना या मार्गावरून ढळण्यापासून वाचवतात व मार्गभ्रष्ट होण्यापूर्वी व होण्या पासून परावृत्त करतात. ही कृपा वा त्याची छाया एकदा, भक्तांवर पडली की भक्ताला वा साधकाला, फक्त आपलं कर्म, भक्ती यांना दृढ धरून राहणे आणि आपली नित्य साधना करत राहणे, इतकेच कर्तव्य उरते. 

इथे अर्जुनाचं उदाहरण घेता येईल. अंतिम महाभारत युद्धात, अर्जुनाला तू युद्ध कर्तव्य कर, बाकी फलाची आशा धरू नकोस, हे सांगताना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, जयद्रथ,कर्ण व दुर्योधन यांचा वध करण्यासाठी, कोणताही विचार न करता, सर्व कावेबाजी, धुर्तपणा व कपटनीती,यांचा,वापर करून, या महत्वपूर्ण शत्रूंना संपवून, युद्धातील विजयाचं श्रेय मात्र, पांडवांना देऊन मोकळा झाला. हा ईश्वरी कृपेचा परिणाम आहे. 

ईश्वरी कृपेवर अजूनही चिंतन करता येईल, ते पुढील भागात करूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...