Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४४

भोग आणि ईश्वर  ३४४

खरतर ही सर्व यंत्रणा निर्माण करून, या जगताचा हा खेळ पसारा व व्याप नित्य चालवत ठेवताना, त्यात खंड न पडता, हे सर्व स्वयंचलित व्यवस्थेप्रमाणे सुरूच राहील, असं नियोजन कौशल्य रचणारा परमयोगी किती विलक्षण असेल, याची कल्पना करता येत नाही  वा येणारही नाही. वास्तविक काल वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेत मांडताना, त्यामागील अद्भुत, अलौकिक लीला, मायेचा अदृश्य हात हे कुठेही जाणवत नाही. आज त्याचा अभ्यास करूया. 

त्या सृष्टीकर्त्याने रचना अशी विलक्षण चक्रात्मक, गतिशील, कृतिशील, कर्माधिष्टीत, आत्मप्रेरक, आत्मा आणि मन हेच मुख्य प्रवर्तक घटक राहतील याची काळजी घेत, भावभावनांना गुंफत, त्रिगुणयुक्त केली आहे की, एकूण रंगमंच सजलेला राहणार,एक गेल्यावर दुसरा येऊन खेळ पुढे नेणार, कोणावाचूनही कोणाचं काहीही न अडणार, आपल्याच कर्मांच्या फेऱ्यात प्रत्येक जीव गुंतत जाऊन, मुक्ती, मोक्ष, जन्ममृत्यूची सांगता या कशाचाही अंदाज कोणालाही येऊ न देण्याची चोख व्यवस्था केली आहे. 

उत्पत्ती, स्थिती व लय या त्रिसूत्रीवर आधारित, हे जग रचलं आहे. ज्यात लयास जाणं म्हटलं तर सत्ययुग ते कल्पांत यातील काळाचं अंतर बघता, देहबुद्धी, त्याचा वास्तविक विचारसुद्धा करू शकणार नाही. कारण प्रत्येक जन्मात देहबुद्धी, फक्त त्या त्या सद्यस्थितीचाच विचार करणार. पण मनाची व्याप्ती एवढी मोठी दिली की, ती कित्येक महायुगांचा विचार व समीकरण सहज करू शकेल. पण त्या स्थितीला मनाला यायला, मनाची प्रगल्भता,व्यास हा अणू ते ब्रह्मांड इतका होण्याची गरज मनाला जाणवली पाहिजे. 

मनाला हे जाणवलं तरीही, मन त्या जाणिवेत नित्य स्थिर झालं पाहिजे. बर ही स्थिरता अत्युच्च पातळीवरील असावी आणि त्यात थोडीफार चूक झाली तरी, मनुष्य पुन्हा तितक्याच मेहनतीने पुन्हा त्या स्थितीला जायला हवा. त्यासाठी तितकी निष्ठा, संयम, यमनियम इत्यादींची बंधनं, माया षड्रिपु यांचा नित्य पहारा, त्यातून सुटलो तरी त्या बेड्या मनाचा, देहाचा व बुद्धीचा ठाव घेऊन, कधी घात करतील, हे ईश्वरही न जाणे. 

देहाला बुद्धीने, बुद्धीला मनाने, मनाला माया मोह, मद मत्सर, अहंकार, अभिमान, गर्व व भावभावना इत्यादी सूत्रांनी जखडून आणि या सर्व वेष्टनात आत्म्याला बांधून, प्रत्येकाला परावलंबित्व प्रदान केलं. नुसता आत्मा काही करू शकत नाही. तो नष्ट होणार नाही,पण कर्मही करू शकत नाही. कर्मासाठी आत्म्याला देहाची गरज आहे, देहाला आत्म्याची अर्थात चैतन्य शक्तीची जोड असलीच पाहिजे. 

आत्मा व देह आल्यावर, त्यात बुद्धी व मन अपरिहार्य आहे. मन आल्यावर, त्यात मनाचे सर्व व्याप व पसारे आलेच. मन बुद्धी देह यांना एकत्र करून, त्यांचा योग साधत पुढे जावं, तर देहाला काळाच्या व कर्मफलाच्या मर्यादा घातलेल्या, म्हणजे सर्व योग जुळून येणार, त्यात मध्ये कर्मफल भोग उपभोग, यातून जीवन जाणार. म्हणजे मन भरकटणार, कारण त्याला प्रलोभनाचा व भावनांचा ओढा घालून दिलेला आणि प्राप्त देहाला मृत्यूच्या मर्यादा. 

हा विस्तार अजून खोलात जाऊन अभ्यासणं जरुरी आहे, तरच पूर्ण गुंता लक्षात येईल. तो विस्तार पुढील भागात पाहू. पण या सर्व अभ्यासासाठी आत्मबल नामसाधने तूनच प्राप्त होईल, म्हणून नाम सुरूच ठेवूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...