Skip to main content

भोग आणि ईश्वर ३५२

भोग आणि ईश्वर  ३५२ 

आत्मबुद्धी आणि आत्मनेत्र यावर विचार करताना, त्यांचा अर्थ समजावून घेणं महत्वाचं आहे. मनाकडून देहबुद्धीला काही गोष्टी ज्ञात होतात, ज्या सहसा भौतिक जगता बाबत असतात. त्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील सजीव व निर्जीव गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे शात्रीय वैज्ञानिक गोष्टी, अनेक गोष्टींचा तौलनिक अभ्यास, जगताचा पसारा, व्यक्ती व समाज याबद्दल आणि यांसह इतर सर्व गोष्टी, ज्या भौतिक वा बाह्य बुद्धीला जाणवतात किंवा ज्ञात होतात आणि मेंदूत साठवून ठेवता येतात, त्यांचा समावेश यात होतो. 

पण आत्मबुद्धी या संज्ञेचा अर्थ या जगतातील नव्हे तर पार लौकिक, पारमार्थिक गोष्टी, ज्याचं ज्ञान, होण्यासाठी व त्यांना जाणण्यासाठी देहबुद्धी उपयोगाची नाही, त्या गोष्टींचं  ज्ञान होणं. म्हणजेच काही ज्ञान अश्या श्रेणीत येतं, जे जाणण्यासाठी देहबुद्धीला मर्यादा असतात आणि त्यामुळे त्यांना जाणून, त्यांचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी काही अंतर्ज्ञान असणं जरुरी असतं. 

पण असं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वा होण्यासाठी, काही विशिष्ट घटकांची गरज असते. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अर्थातच पूर्वपुण्याई असणं व सद्गुरुकृपा किंवा ईश्वरीकृपा प्राप्त होणं आवश्यक आहे. कारण जे ज्ञान या जगतातील कोणत्याही गोष्टीबद्दलचं नसून, प्रत्यक्ष या जगताची निर्मिती करणाऱ्या ईश्वरी अंशाबद्दल, त्याच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, संचित, प्रारब्ध, आत्मज्ञान, आत्म प्रचिती यांसह अनेक पारलौकिक गोष्टींबद्दल असू शकेल. हे सर्व विषय वा या सर्व गोष्टी, सर्वसामान्य ज्ञानाच्या कक्षेबाहेर असतात. 

त्यामुळे त्यांना जाणून, त्यां ज्ञानातून आत्मउद्धाराची व आत्म उन्नत्तीची वाट ओळखून, त्यावर वाटचाल करण्या साठी मनाला, बुद्धीला व देहाला प्रवृत्त करणं गरजेचं आहे. हे सर्व ज्ञान व त्या  ज्ञानाने जागृत होणाऱ्या जाणीवा, हा मन व आत्मा यांच्यामधील विषय असल्या कारणाने, त्या समजण्यासाठी बुद्धी पलीकडील शक्तीची आवश्यकता आहे. यामध्ये दृश्य स्वरूपातील अनेक आडाखे, समीकरणं, गणितं काम करत नाहीत किंवा उपयोगात येत नाहीत. 

आत्मज्ञान हे स्व पासून।सुरू होऊन या जगताच्या नियंत्याला जाणण्यात परिवर्तित होणारं ज्ञान आहे. आत्मबोध, आत्म प्रचिती, आत्मप्रेरणा, यांसह अनेक मार्गानी विशिष्ट शक्ती प्राप्त होऊन, त्या नियंत्याला जाणून, त्याच्यापासून त्यांच्यापर्यंत पोचणारं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होय. जे प्राप्त करण्यासाठी कित्येक जन्मांची पुण्याई खर्च करावी लागते. 

त्यां ज्ञानाप्रत जाऊन ते ज्ञान मिळवण्याची  बुद्धी ही विशेष ईश्वरी कृपेनेच प्राप्त होऊ शकते. म्हणून त्यासाठी विशिष्ट शक्ती प्राप्त होण्याची गरज असते. अश्या प्रकारचं ज्ञान ज्याला आत्मज्ञान, ईश्वरी ज्ञान, गुह्य वा गूढ जगताचं ज्ञान अश्या अनेक संज्ञा आहेत, ते ज्ञान म्हणता येईल. पण सर्व साधारण सर्वांचा अर्थ एकच आहे. त्यांच्या प्राप्तीचे अनेक मार्ग, भगवंतांनी, वेदांपासून ते साधु संतांच्या चरित्रापर्यंत अनेक उदाहरणातून दाखवून दिलं आहे. 

या मार्गांबद्दल आणि आत्मनेत्र म्हणजे काय हे जाणण्या साठी उद्या चिंतन करूया. तोपर्यंत ईश्वराच्या मार्गात नामाच्या सिंचनाचा आपला परिपाठ चालूच ठेवूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...