Skip to main content

हलकं फुलकं २

हलकं फुलकं २ 

सकाळी उठल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आवरून चहा बनवला. एक कप मगात घेतला.  नॉर्मली मी मग असेल तर खाली बशी न घेता, स्टीलची बाकदार डिश घेतो, उद्देश हा की बाय चान्स चहा सांडलाच, तर  डिश मध्येच सांडेल.

स्वतःवर ठाम विश्वास असल्यामुळे exact तसच घडलं. खुर्चीत बसताना, बेडवर डिश ठेवता ठेवता, थोडासा तोल गेला आणि चहा डिशमध्ये सांडला. कल्पनेनेच घाम फुटला की डिश नसती तर. कल्पनेतला घाम कल्पनेनेच पुसला (म्हणजे imagination) . तेवढ्यात आवाज आलाच

सांडून तर बघायचा माझ्या अंगावर चहा, नाही तुमची सकाळ, रंगीत झाली असती तर नाव चादर नसतं लावलं. 

चादरीने लगेच पिंक टाकलीच टोमण्याची. मी गप्पच बसलो. म्हणजे आपली चूक असेल तर गप्पच बसणं बेस्ट असतं. म्हणून तर मी पंचवीस वर्षे गप्पच असतो, ज्या ज्यावेळी आपली चूक असेल तेंव्हा. मला गप्प पाहून चादर कुत्सितपणे हसली. शेवटी ती पण 'ती' होती, काय करणार.

गरम गरम चहा आणि डिशमध्ये भिजलेली बिस्कीटं  माझी वाट बघत होती,  त्यांची बिचार्यांची काहीच चूक नव्हती. म्हणून भिजलेल्या बिस्किटांना तसंच फस्त केलं. भिजून हिरमुसल्यामुळे बिस्किटांनी, आवाज न करता मऊपणे,  उदरात प्रवेश केला. नंतर मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. कसं काय,  ते माहीत नाही पण, याची खबर पायाखालच्या लादीला लागलीच. 

ऑफ व्हाइट कलरची स्पारटेक्स टाईल व्हिलनच्या स्टाईलमध्ये म्हणालीच. 

माझ्यावर तर कित्येकवेळा अभिषेक घातलाय चहा, पाणी, आमटी, दही, लोणच्यातलं तेल, डोक्याला लावताना खोबरेल तेल  इत्यादींचा. मी कधी तक्रार केली नाही.

मी म्हटलं तू प्रत्यक्ष तक्रार केली नाहीस, पण तुझ्या रंगानी ते आपोआप पोचवलं आहेच, वेळोवेळी मालकिणीपर्यंत, त्याचं काय. 

मी जरा घुश्यातच म्हणालो.

त्यात माझी काय चूक, तुम्हीच आणलं निवडून, या कलरच्या स्टाईलला. 

मुकाट्याने उठलो आणि डिश आणि मग धुवून ठेवू म्हणत सिंकपाशी आलो आणि इतक्यात हातातला मग सिंकमध्ये पडला  आणि खळकन खट्याकचा आवाज झाला आणि गृहमंत्री प्रवेशले. 

पुढलं लिहायची गरज आहे का ? वाचक महिला आणि पुरुष दोघांनाही कल्पना आलीच असेल काय झालं।असेल त्याची आणि बॅकग्राऊंडला चादर आणि टाईल्स यांचं, कुत्सित आणि गब्बर स्टाईलमध्ये हसण्याचं म्युझिक होतंच. 

क्रमशः 

©® संकल्पना व लेखक : प्रसन्न आठवले
२५/०५/२०२१

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...