Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२
 
त्या वाडीतल्या, चाळीतल्या आणि त्या चार चाळींच्या मधल्या मैदानात तासचे तास अनेक खेळ खेळणं हे नित्याच झालं  शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी अनेक खेळ खेळले जात होते. सर्व मिळून ३५ ते ४० वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अनेक खेळ खेळत एकत्र असायचो. अगदी संध्याकाळी अंधार होई पर्यंत खेळ चालायचे. अर्थात अंधार पडल्यानन्तर परवजा म्हणून मग गप्पा मारायला चाळीत जमायचो.

त्यात दिवसभर झालेल्या खेळातील घडलेल्या चुका वा भांडण  यावर चर्चा व्हायची, किंवा इतर गप्पा होत असत. वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अगदी गुण्यागोविंदानं खेळत खेळत वाढलो. भांडलोसुदधा पण ते खेळातल्या खेळात विसरून पण जायचो. कधीही कोणतही भांडण फार ताणल्याचं आठवत नाहीये.  कोणत्याही भांडणाच रूपांतर कधीही मतभेदांमध्ये झाल्याच आठवत नाही. कदाचित त्या वयाचा परिणाम असेल की मन पुरेसं लवचिक असल्यामुळे पटकन विसरुन लगेच पुढे जाणं हा एक सद्गुण त्यावेळी सर्वांच्यात होता. कदाचित ही एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकावी अस आज पण वाटतय. 

शाळेतल्या त्या जगात वाडी म्हणजे वेगळं जग होत, कसलीही चिंता, काळजी काहीही नसल्याने वा आमच्या पर्यन्त पोचत नसल्यामुळे असेल. खेळात काही ग्रुप्स असले तरी ते त्यावेळी समवयस्क असलेल्या मुलांचे त्या त्या वेळी पडलेले ग्रुप्स असतील. त्याचप्रमाणे टीम पण होत्या खेळानुसार आणि वेळेनुसार पडलेल्या.  

या जगात प्रत्येक गोष्टीला जस कुठल्या ना कुठल्या तरी वळणावर वेगळ्या वाटेवर जावंच लागतं.  तसच या गोग्रास वाडीतल्या दिवसांना दुसऱ्या वळणावर जावंच लागलं. साधारण जून जुलै १९८१ मध्ये वडिलांच्या आजारपणामुळे चाळीतली जागा सोडावी लागली. दहावीच्या वर्गात होतो. नवीन घेतलेली जागा जवळच होती गोग्रासवाडीतच. पण वडिलांच्या आजारपणामुळे आलेल्या परिस्थितीने अचानक कमी वयात मॅच्युरिटी आली. त्यामुळे खेळ, वाडीत जाण बंद झालं ते कायमचं. 

नन्तर आयुष्याने अनेक रंग दाखवले. शिक्षण, नोकरी लग्न , संसार यात गत काळातील सुवर्णक्षणांना मुकलो तो कायमचंच. पण या लेखमालेच्या निमित्ताने त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.  कदाचित माझ्या सारखेच गोग्रासवाडीत राहिलेले व राहत असलेले या सर्वांना एक पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असेल तर ह्यासारखा दुसरा आनंद नाही.  आज व्हाट्सअप्प वर त्याच सर्व मित्रांचा ग्रुप आहे. रोज भेटतो वर्चुअल जगात. काही क्षण छान वाटत.  पण ती शान, ती मजा, ती गोडी, ती जान कशातच नाही. कदाचित त्या व्हाट्सअप्प ग्रुपवरील माझ्या मित्राना हे गोग्रासवाडीवर लिहिलेले लेख वाचून मागे गेल्यासारख वाटलं असेल.

असो. लोभ आहेच तो असाच माझ्या लेखनावर राहावा, हीच विनंती

समाप्त

© लेखन : प्रसन्न आठवले
१०/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...