Skip to main content

भोग आणि ईश्वर १६८

भोग आणि ईश्वर  १६८

समाधान या शब्दाची व्याख्या आणि विवेचन आपण मागील दोन भागात पाहिलं. खऱ्या समाधानाचा क्षणिक सुद्धा अनुभव घेतलेले समजू शकतील की, खऱ्या अर्थाने धन आणि ऋण आयर्न किंवा भार अथवा लहरी व तरंग एका समान पातळीवर आणणाऱ्या या संतुलन क्रियेला समाधान का म्हणतात,

याचा सर्वात मोठा उपयोग हा की, यामुळे मनाला शांती मिळते. मनातील नकाराच्या लहरी नष्ट होऊन मन सकारात्मक विचार करायला लागतं.  या सकारात्मकतेचा लाभ शरीराला मिळून, योग्य ती रसनिष्पत्ती अर्थात हार्मोन्स पाझरून, शरीर एका विलक्षण संतुलनाचा लाभ घेतं. याचा पुढील परिणाम म्हणजे मन एकाग्रतेने पुढील कार्यात काम करायला सुरुवात करतं.

या सर्व गोष्टी ऐहिक जीवनातच उपयोगाच्या आहेत असं नाही. परंतु अध्यात्मिक जीवनात याहून जास्त उपयोगी समाधान ही मानसिक स्थिती आहे. समाधानी वृत्ती माणसाला कार्य करायला प्रवृत्त करते. समाधानी वृत्ती अंगी बाळगून माणूस नामाच्या पूर्ण लाभाचा आनंद घेऊ शकतो. म्हणजेच सहसा आनंदामागून येणारं समाधान, हे आनंद द्यायला सुरुवात करतं.

समाधानी वृत्ती कशी काय बाणवावी याबद्दल अनेक संत महंत याची उदाहरणं देता येतील. या सर्वांचं वैशिष्ट्य हे की, हे सर्व अध्यात्मिक बाबतीत समाधानी आणि सांसारिक बाबतीत उदासीन होते. म्हणून संसाराच्या कोणत्याही तापाचा त्यांच्या वृत्तीवर परिणाम होत नसे.  आपण यातील निदान समाधान तर नक्कीच अंगी बाणवू शकतो. 

म्हणजे आपण समाधानी वृत्तीने जर साधना केली तर, मनातील धन आणि ऋण भार एकसमान होऊन, साधना करताना येणारे अविचार, साधनेत व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी हे सर्व बाजूला पडेल आणि साधनेत एकाग्रता येईल.

या समाधानी वृत्तीने नाम घेण्याची पहिली पायरी म्हणजे आपण घेत असलेल्या नामवर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवावा. श्रद्धा असेल तर ती दृढ करावी. कारण दृढ श्रद्धेने केलेले कार्य व घेतलेले नाम, मनातून शंका कुशंका, किल्मिष यांची जळमटं साफ करून मनाला स्वच्छ करतं.

स्वच्छ मनाने घेतलेल्या नामाच्या मागून समाधान सहजपणे येतं. मुळात समाधान हे बाहेरून नव्हे तर आतून मिळवण्याची गोष्ट असल्यामुळे, त्याची सुरवात नेटाने, दृढतेने, शांत व संयमी वृत्तीने नाम घेतल्यास आतून समाधानाचा आनंद घेता येतो.

यासाठी छोट्या छोट्या पायरीने पुढे जाता येईल. जसं काही मिनिटं नाम घेण्याचा संकल्प करून तो साध्य करायचा. तो साध्य झाल्यानंतर, जो आनंद मिळेल तो समाधानाचा आनंद होय. अश्याच पद्धतीने पायरीपायरीने चढत जाऊन. समाधानाची छोटी छोटी मिळकत जमा करून, त्यांच्या मार्फत समाधानी राहून, साधन केल्याचा आनंद घ्यावा. याचा एक फायदा म्हणजे साधनेचा खरा आनंद मिळत जाईल आणि साधनेचा  मुख्य उद्देश निरिच्छत्व,हे साध्य होईल. 

म्हणजेच काहीतरी मिळवण्यासाठी नाम घेणे, मन आपोआप बंद करून, फक्त साधनेच्या समाधानासाठी व त्या समाधानाच्या आनंदासाठी नाम घेण्यातली गोडी अनुभवता येईल. नामसाधनेचा मुख्य उद्देश निर्गुणत्व, निरिच्छता, स्थितप्रज्ञा वृत्तिकडे वाटचाल, हे असून समाधानी वृत्तीने नाम घेणे ही त्यातील खूप मोठी सिद्धता आहे. याच समाधानाचा लाभ आपण दैनिक जीवनात सुद्धा अनुभवू शकतो. यातूनच मनाच्या शांततेचा, संयमी वृत्तीचा आणि योगसाधनेतून प्राप्त होणाऱ्या स्थिर वृत्तीचा अनुभव या एका समाधानी वृत्तीने नाम घेत गेल्याने शरीराला, मनाला आणि आत्म्याला मिळू शकतो.

म्हणूनच विचार करा आणि त्या समाधानाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच नामाचा खरा आनंद प्राप्त होईल.  म्हणून समाधानी राहण्यासाठी नाम घ्या आणि समाधानी राहून नाम घ्या. उद्या पुढील चर्चा करू. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...