Skip to main content

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ४

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ४

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय

विज्ञान, हे या जगताच्या खरतर अणूरेणुत सामावलेलं आहे आणि सर्व चराचर या विज्ञानाचाच भाग आहे. विज्ञान नाही तर हे जगत अस्तित्वात आलंच नसतं. कारण प्रत्येक कणामागे शास्त्र, ज्ञान आणि विज्ञान भरलेलं आहे. किंबहुना विज्ञानाच्या अधिष्ठानावरच या ब्रह्मांडाचं अस्तित्व आहे.

जिथे आपलं अस्तित्वच विज्ञानमय आहे तिथे, आता आपण पाश्चात्यांमुळे विज्ञानाची ओळख करत आहोत, असा एक सार्वत्रिक समज आहे. मुळात इथे हे लक्षात घ्या की, या जगतातील चराचरात वसलेलं विज्ञान जाणायला आता त्यांनी सुरवात केली. आपण हे सर्व पुराणकाळात जाणलं ओळखलं आणि अभ्यासून कागदोपत्री बद्ध करून, गणित, शास्त्र, यांची मांडणी, एका सूत्रबद्ध पद्धतीने आधीच नोंदवली होती.

पुराणकाळात सहजी अस्तित्वात असलेल्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य आपल्यासमोर मांडत आहेत, यात त्यांच्या बुद्धीला कमी लेखण्याचा प्रयत्न नक्कीच नाही. पण आपण ते गमावून, आता नव्याने त्याबद्दल आश्चर्यचकित होतो, कारण या सर्वांच्या कारणांचा शोध मागोवा लिपीबद्ध करून मंत्रांच्या रुपात तो आपण ठेवला होताच, तो आपण पूर्ण विसरलो.

वानगीदाखल, विमानाचा वापर आपल्याकडे पुराणकाळात सुदधा झाल्याचे दाखले, त्यासंबंधीची तपशीलवार शिल्प, हे सर्व आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचे पुरावेच आहेत. गणितातील अनेक प्रमेय, ही वेदात असल्याचं आता सिद्ध होऊ लागलं आहे. आज हेदेखील लक्षात येतंय की विश्वात आज शोधल्या गेलेल्या वा शोधल्या जात असलेल्या बऱ्याच गोष्टी इथे वापरल्या गेल्याचं वेद, पुराणात सापडत आहे.

आज मानव साधत असलेली प्रगतीची नवनवीन शिखरं हेच दर्शवतात की, कदाचित आपण त्याच वाटेकडे पुन्हा जात आहोत, जिथे कधीकाळी माणूस पोचला होता. पृथ्वीच्या पाठीवर हे सर्व या भरतभूमीत याआधी कित्येक शतकांपूर्वी अस्तित्वात होतच, पण त्याआधीही कित्येक युगे सहज वापरात होतं.

या सर्व वैज्ञानिक प्रगतीमागे प्रत्यक्ष कोण कार्यकारण आहे तर श्रीगणेश. किंबहुना सर्व ज्ञान, विज्ञान याचा कर्ता करविता श्रीगणेश आहे. सर्व जगत , ब्रह्मांड, यांसह ज्ञात अज्ञात विश्वातील सर्व ज्ञान व या अस्तित्वामागचं विज्ञान, त्या विज्ञानाचे सर्व घटक हे श्रीगणेशापासूनच सुरू होतात आणि श्रीगणेशातच त्यांचा अंत होतो. अर्थात आदी आणि अंत दोन्ही श्रीगणेश आहे.

म्हणजेच आपण साधत असलेल्या प्रगतीमागील विज्ञानाच्या सर्व समीकरणांचा सूत्रधार आणि सर्व सुत्रांचं उत्तर हे श्रीगणेशापाशीच येऊन थांबणार, असाच याचा अर्थ होतो. याचाच अर्थ, काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या, एका वैज्ञानिक प्रयोगातील तो देवकण हा कदाचित श्रीगणेश किंवा त्यांच्या एखाद्या सूत्राशी निगडित असू शकेल. खरतर या आपल्याकडील ज्ञानावर पाश्चात्य जगत आज संशोधन करत आहेत, ज्यांनी काही शतकांपूर्वी याच ज्ञानाला आणि ग्रंथांना कपोल कल्पित म्हणून संबोधून टवाळी केली होती.

आज त्यांनाच त्यातील ज्ञान, विज्ञान यांचा शोध घ्यावासा वाटतोय आणि ज्यांच्या हाती हा अनमोल ठेवा होता किंवा आहे, ते याबद्दल विचारही न करता पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात. हे आज जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष पेरलेलं, स्वधर्माच्या हेटाळणीचं बीज, आता पूर्ण फोफावू पहात आहे. अर्थात श्रीगणेश याबद्दल या भूमीतील लोकांना नक्की सद्बुद्धी देईल, हा विश्वास आहेच.

श्रीगणेशाच्या ब्रह्ममे स्वरूपाबद्दल उद्या विवेचन करूया.

जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏

©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०५/२०२१

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...