Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२

भोग आणि ईश्वर  ६२

एकात्म भाव.

श्रद्धा, भक्तीचा भाव ज्यावेळी एकाच ठिकाणी स्थिर होतो. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी त्याला स्थिर होण्याची गरज उरत नाही, त्यावेळी त्या स्वरूपाला, स्थितीला, एकात्म भाव म्हणतात. मग ती मूर्ती असेल, देव ही न पाहिलेली पण जाणवणारी कल्पना असेल, किंवा गुरुतत्व असेल. तो एकात्म भाव जागृत झाला की, इतर कोणत्याही गोष्टीची, बाह्य वा अंतरातील कोणत्याही कृत्रिम प्रेरणेची गरज उरत नाही.

श्रद्धा त्या ठिकाणी स्थिर होते. त्यावेळी वा तद्नंतर मनाला, जाणिवांना, नामाला स्थिरता येते. म्हणून एक स्थान, एक नाम, एक श्रद्धेचं मानक जरुरी असतं. त्याठिकाणी मन स्थिर करून मनातील सर्व शंका कुशंका दूर करून, श्रद्धेला, भक्तीच्या जाणिवेला स्थिरता द्यावी, जेणेकरून मनात उमटणाऱ्या भक्तीरुप नामतरंगांना शक्ती, चेतना व योग्य दिशा मिळेल. 

या एकात्म भावाचा परिणाम नामाच्या नादात, उच्चारात हरवून जाण्यात, त्या लहरींचा आनंद घेण्यात होतो. एकदा एकात्म भाव साधला की पुढे सर्व सुलभ होत जातं. त्यात एक प्रकारचा आनंद आहे. तो मिळवण्यासाठी हा एकात्म भाव साधा बुद्धी मन श्रद्धा एका ठिकाणी स्थिर करून नामाचा अलौकिक आनंद घ्या. हे करताना फक्त आणि फक्त नामासाठी नाम घ्या. 

याचं कारण असं की कोणताही इतर भाव वा हेतू मनात ठेवून  अथवा कोणत्याही कारणाने नाम घेतलं तर त्या नामाच्या तरंगांना मनाची पूर्ण शक्ती व इच्छेचं पूर्ण बळ मिळत नाही. त्यामुळे इच्छित हेतू साध्य न झाल्यामुळे मनात नामाविषयी साशंकता येऊ शकते, जे आपल्याच प्रगतीला घातक आहे. म्हणून हेतू, उद्देश वा शंका दोन्हीपैकी काहीही मनात  ठेवून नाम घेऊ नये. 

नामाची शक्ती अपूर्व आहे. नाम हे स्वयंसिद्ध आहे. परमेश्वराच्या मानवी देहातील अवतार समाप्ती नंतर किंवा सद्गुरुंचं मानवी देहातील अस्तित्व नाहीसं झाल्यानंतरसुद्धा आत्मरूपातील त्यांच्या शक्तीचं अस्तित्व नामरूपात शिल्लक आहे. म्हणून नाम हे आदि आणि अंत यांच्या पार आहे. त्याला कोणतीही गोष्ट अपवित्र करू शकत नाही. कारण देहरुप अस्तित्व संपल्यानंतर नाम हे निर्गुण आणि निराकार स्वरूप होतं. निर्गुण आणि निराकार असं हे नाम सर्व विकार, षड्रिपु, वास, स्वाद, गंध, या सर्वांच्या पलीकडे जातं.

त्याच्या तेजाला कसलाही मानवनिर्मित वा पंचमहाभूतरुप वस्तू अशुद्धता आणू शकत नाही. त्या सर्वांच्या पलीकडे नाम आणि नामाची शक्ती आहे. म्हणून नामाच्या त्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच नामासाठी नाम घ्या. हेतूरहीत, शुद्ध भावाने मन शून्यात नेऊन नाम घ्या. मन शून्यात नेणं म्हणजे एकात्म भावाने, फक्त नाम मनात योजून नाम घ्या.  

नामामागे नामाची देवता आणि सद्गुरू यांचं पाठबळ असतं.
सदुगुरूंना सर्वात प्रिय काय असेल तर साधकांनी, भक्तांनी नाम घेणं. म्हणून सद्गुरू आनंद लक्षात आणून नाम घ्या. 

सद्गुरू प्रेरणादायी आहेत. त्यांना आनंद देणारे साधक सर्वश्रेष्ठ असतात आणि सदुगुरूंना नाम प्रिय असतं.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३१/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...