Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६

भोग आणि ईश्वर  ४६
  
काल आपण योगभ्रष्ट म्हणून जन्माला आलेल्या लोकां बद्दल चर्चा केली. अश्या प्रकारच्या व्यक्तींना आपण ओळखत होतो पण आपल्याला त्याची जाण नसल्यामुळे आपण कदाचित त्यांची टिंगल, हेटाळणी वा टीका तरी केली असेल. पण त्यामागचं कारण उमगल्यामुळे इथून पुढे नक्कीच आपण त्यांच्याबद्दल योग्य तो विचार करू. 

आज अजून एका वेगळ्या गोष्टीचा विचार करूया. आपण कधी विचार केला आहे का की अमुक एक व्यक्ती आपली नातेवाईक म्हणून का जन्माला आली, किंवा हेच आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, इतर आप्त स्वकीय, सगेसोयरे, ओळखीचे हेच का आहेत. एखादी लांबची व्यक्ती एखाद्या अनोळखी गावामध्ये जाते आणि तिथे एखाद्या व्यक्तीशी दृढ संबंध जुळून येतात, ती मैत्री असेल वा अगदी प्रेम पण असेल.

किंवा एखादी अनोळखी व्यक्ती  अनपेक्षितपणे आपल्याला काही संबंध नसताना मदत करते, अगदी निरपेक्ष भावनेने. कदाचित त्या व्यक्तीचा तो स्वभाव देखील नसेल, पण आपल्यासाठी ती व्यक्ती वाट वाकडी करून पदरमोड करून मदत करते. याचा कुठेतरी आपल्या गतजन्मातील ऋणाशी वा ऋणानुबंधाशी संबंध असतो. अन्यथा इतक्या आप्तपणे त्याला मदत करायची भावना होणार नाही. जर ती त्या व्यक्तीची नित्य वागणूक असेल तरीही इतक्या प्रचंड पसाऱ्यात आपण त्याच्या संपर्कात यावं, यात कुठेतरी काही धागा नक्कीच असतो. 

मला माझा स्वतःचा एक प्रसंग आठवतो. साधारण १९९५ ९६ मधली गोष्ट असावी. मी, आई बाबा, दोन काकू आणि चुलतभाऊ असे चुलतभावाच्या गाडीने अंबेजोगाईला चाललो होतो, बहुतेक उत्सव असेल. त्याचवेळी एक एस टी सुद्धा डोंबिवलीवरून निघणार होती. पण त्यामध्ये  जागा नव्हती म्हणून काकू व आई अश्या तीनही स्त्रिया आमच्याबरोबर येत होत्या, अन्यथा त्यांना बसमध्ये बसवून आम्ही तीन जण गाडीने जाणार होतो. 

बस आणि आम्ही साधारण एकाच वेळी, रात्री साडेआठ नऊला, निघालो. उत्सव असल्यामुळे बरेच ओळखीचे बसमध्ये होते, म्हणून एकत्र जाण्याचा बेत केला, तेवढीच साथसोबत. आम्ही बसच्या पुढे मुद्दाम होतो म्हणजे काही समस्या आलीच तर ते असतील मागे, म्हणून. 

माळशेज घाटात आमची कार नेमकी बंद पडली, वेळ साधारण रात्रीचे साडेबारा एक असतील. मागच्या बसने प्रसंग पाहून आई व दोन्ही काकू अश्या स्त्रियांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः आळे फाट्याला उतरून एखादा मेकॅनिक घेऊन येण्याचं ठरलं. म्हणून मी बसमध्ये बसून निघालो आणि आळेफाट्याला उतरलो. मागे सुनसान घाटात राहिले बाबा आणि चुलतभाऊ. त्यात महिना डिसेंबर जानेवारी होता आणि त्यावेळची थंडी. 

साधारण अडीच वाजले असतील. आळेफाट्याला फार नाही पण बऱ्यापैकी जाग होती. मी एका चहाच्या टपरिचा  आडोसा घेऊन बसलो. तिथे चहासाठी जरा वर्दळ होती. साधारण पहाटे साडेतीनच्या सुमारास, म्हणजे ब्रह्ममुहूर्ती माझ्या जवळ एक तरुण मुलगा आला. माझ्यापेक्षा काही वर्षे  लहान होता. 

चहा पिता पिता चौकशी करताना विषय निघाला, त्यावेळी तो म्हणाला सकाळी आठ साडेआठच्या आधी काही मिळणार नाही. पण मी तुम्हाला मेकॅनिक मिळवून देईन. मी वेळ जाण्यासाठी हो म्हटलं. हा पठ्ठ्या सोबत थांबला. त्याने त्याचं नाव सलीम सांगितलं. तो म्हणाला मीच आलो असतो, पण मला एका निकाहला जायचय.

साधारण सकाळी सात साडेसातला त्याचे काही जातभाई त्याला शोधत जीप घेऊन आले, बहुतेक तो त्याचा नेहमीचा परिसर असावा. ते त्या निकाहलाच जात होते आणि याला यायचा आग्रह करत होते. मी थोडा धास्तावलेलो होतो. हा त्यांना म्हणाला की, तुम्ही पुढे जा मी यांचं काम झालं की येतो नऊच्या आत. 

साधारण सव्वाआठला त्याचा तो मित्र आला. त्याने माझी ओळख करून दिली दोस्त आहे असं सांगून त्याला माझ्या सोबत घाटात जाऊन गाडी बघायला सांगितलं.मी त्याला धन्यवाद देऊन विचारलं की तुझ्या थांबण्याचं कारण काय. आपण तर ओळखत पण नव्हतो. त्यावेळी त्याने दिलेलं उत्तर मला अजूनही आठवतंय. ते उत्तर आजच्या विषयावर प्रकाश टाकेल. 

तो म्हणाला का ते का ते माहीत नाही, पण तुम्हाला पाहिलं आणि वाटलं की तुमची मदत करावी, बाकी काहीही कारण नाही. मी मात्र शेवटपर्यंत त्याच्या हेतू बद्दल शंका घेत धास्तीत होतो. आता या जन्मी ती पहिली आणि शेवटची भेट. पण तरीही त्याला वाटलं, याचं कारण कुठेतरी मागच्या एखाद्या जन्माचे ऋण फेडून गेला असाच निघतो. आपणसुद्धा अश्या प्रसंगातून गेला असाल तर आठवा आणि जुळवा संदर्भ सद्य जन्माशी. जर नाही जुळला संबंध वा नाही सापडला संदर्भ तर नक्क्की एखादा गत जन्मीचा ऋणी ऋण फेडून गेला असाच अर्थ निघू शकतो. 

यावर अजून प्रकाश टाकू पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...