Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७

भोग आणि ईश्वर  ४७
  
काल आपण एक प्रातिनिधिक अनुभव वाचला. प्रत्येकाला आयुष्यात असा अनुभव आला असेल वा असे अनुभव असतील. फक्त आपण त्यामागचं तत्व वा कारणमीमांसा फार विचारात घेत नाही. पण आज आपण त्याची दुसरी बाजू बघूया. 

एक विचार करा की त्या त्या प्रसंगात आपल्याला तीच व्यक्ती का भेटावी, एवढ्या अफाट जगव्यापातून. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या व्यक्तीचेसुद्धा काही ऋण शिल्लक असतात, जे त्याचं कर्मफल त्याच्याकडून योग्यवेळी फेडून घेत असतं. आता हे ऋण कोणाचंही असेल आणि कोणा कडूनही फेडून घेतलं जातं का ते बघूया.  

तर माझ्या मते तसं नसावं. कारण आपल्या बारीकसारीक कर्मांचा योग्य तो हिशोब आणि ताळेबंद ठेवणारा विधाता किंवा विधात्याची कर्मफलव्यवस्था नक्कीच याचासुद्धा अचूक हिशोब ठेवतच असणार. म्हणजेच जर ती व्यक्ती काही ऋण फेडण्यासाठी बद्ध असेल तर ज्या व्यक्तीचे हे ऋण आहेत, तीच व्यक्ती समोर येईपर्यंत त्याला हे ऋण फेडता येणं शक्य नाही.

आपणसुद्धा व्यवसायात वा नोकरीत हिशोब ठेवताना क्ष व्यक्तीचे वा कंपनीचे  ऋण वा येणं असेल तर ते त्यांच्या नावावरच मांडतो आणि त्यांच्याकडून ते येईपर्यंत ते येणं तसंच दाखवतो,  अनेक आर्थिक वर्षांपर्यंत, प्रत्येक ताळे बंदात.  जर, मानवनिर्मित हिशोबव्यवस्था इतकी शास्त्रशुद्ध आहे, तर ईश्वरनिर्मित व्यवस्थादेखील तितकीच चोख किंबहुना त्याहून चोख असली पाहिजेच. म्हणजेच तिचे काळवेळ याचे गणितदेखील अचूक असलेच पाहिजे. काळवेळ यावर नन्तर चर्चा करू. 

म्हणजेच जी व्यक्ती आपल्याला अश्या कठीण प्रसंगात मदत करते, त्या व्यक्तीचे व आपले, काहीतरी ऋण शिल्लक असतीलच वा असलेच पाहिजेत. फक्त त्या हिशोबाचं पान वा  वहीखातं आपल्याकडे नाही इतकंच. म्हणून अश्या प्रसंगात आपल्याला मदत करणारी व्यक्ती सहसा नन्तर भेटत नाही. कारण त्या व्यक्तीचं कर्म वा कर्मफलहिशोब पूर्ण झालेला असतो किंवा असणार. 

याच तत्वाला आता थोडं व्यापक स्वरूपात पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, कुठेनाकुठेतरी, आपल्या गतजन्मातील कर्माशी निगडित असते किंवा असलीच पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्रास, आनंद, दुःख, सकारात्मकता नकारात्मकता वा छोटे छोटे सर्व भावानुभव देणारी प्रत्येक व्यक्ती कुठंतरी तिचेही ऋण फेडत असणार. 

याचा अजून थोडा खोलात जाऊन विचार केला तर जाणवेल की आपल्या लांबच्या वा जवळात जवळच्या नातेसंबंध वा मित्रसंबंधातील व्यक्तीसुद्धा  दैवयोगाने न भेटता कुठेतरी आधीचे ऋण व ऋणानुबंध असल्याशिवाय भेटत नाहीत. म्हणजे आपले आई वडील, भाऊबहिण, पती वा पत्नी, मुलं मित्रसंबंध, अगदी शत्रूसुद्धा कुठेतरी आपल्याच गतजन्मातील संबंधातील असतात वा असूच शकतात, अन्यथा कुठेतरी कोणत्याही दूरच्या प्रदेशातील दोन जण पतीपत्नीच्या दृढ व कायमस्वरूपी नात्यात बांधले जात नाहीत. 

हा विषय खूप व्यापक आणि मोठा असल्यामुळे आणि याचे अनेक कंगोरे अजून बघायचे असल्यामुळे उद्यासुद्धा यावर अजून थोडं मोठं भिंग लावून खोलात शिरून चर्चा करूया. भेटूया उद्याच्या भागात.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...