Skip to main content

भोग आणि ईश्वर ५७

भोग आणि ईश्वर  ५७
   
एखादं यंत्र हे कालबाह्य झालं की किंवा ते वापरण्याचं तंत्र अवगत नसेल तर, ते यंत्र चालवण्याची कला शिकणं वा इतर काही मार्ग आहेत का  ते बघणं महत्वाचं आहे. यासाठी असलेले अनेक मार्ग आज कालबाह्य नाही,  पण काळाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि परिस्थितीमुळे पूर्णपणे अंमलात आणणं कठीण आहे. म्हणून मग भगवंतापासून जगतात फिरणाऱ्या तरंगलहरी प्राप्त करण्यासाठीची तयारी,  आपल्याला जाणता वा समजता येणार नाहीत का. 

नक्की येईल. परंतु यासाठी थोडा काही गोष्टींचा विचार करूया. देह हे एक साधन मात्र आहे. त्याद्वारे भगवत प्राप्ती ही साध्य करायची आहे. त्यासाठी देवाने बुद्धी -मन-आत्मा ही त्रयी आपल्याला प्रदान केली आहे. या तिन्हीचा सुयोग्य संगम साधून, त्यांना एकतान करून, त्याद्वारे मनाला एका लयीत बांधून, ती एकतानता टिकवून, त्याचा सातत्याने, नियमित सराव करत गेल्यास, मन एक विशिष्ट लय साधण्यास सिद्ध होतं. 

ही सिद्धता टिकवून धरली की, त्याला विश्वातील येणाऱ्या अनेक लहरींशी संपर्क साधण्याची कला अवगत होऊ शकते.  ही सिद्धता झाल्यानंतर, नित्य त्या लहरींचा अभ्यास करता येऊ शकतो. कालांतराने त्यातून नाद , सुगंध व ज्ञान यासारख्या अनेक गुह्य गोष्टी ज्ञात होत जातात. या सर्व गोष्टी वास्तविक अणुसम असलेल्या आत्म्यात बद्ध आहेत. आपला आत्मा हा विश्वाचं ज्ञान आणि अनेक गुह्य गोष्टी जाणतो. 

परंतु देहाच्या आत बद्ध असताना, त्या देहाच्या मर्यादांच्या बंधनात राहून, जे शक्य आहे ते आत्मा करू शकतो, मनाच्या सहाय्याने व सामर्थ्याने. परंतु मनाची शक्ती अपार व अमर्यादित ठेवण्यामागे विधात्याचा निश्चित हेतू तोच आहे, की, या मनाच्या अमर्यादित सामर्थ्याच्या जोरावर, असाध्य ते साध्य करून, ईश्वरी कृपेला व लहरींना प्राप्त करू शकतो. याच अमर्यादित शक्तीच्या जोरावर युगानुयुगे अनेक ऋषीमुनी, साधू संत व अनेक सत्पुरुषांनी या देहासह मन व आत्मा शुद्ध करून ईश्वराला प्राप्त करून घेतलं. म्हणजेच देह , मन व आत्मा यांची शुद्धता ही महत्वाची पायरी आहे. 

मनाच्या माध्यमातून, या सूक्ष्म लहरी प्राप्त करून, ईश्वर सान्निध्याचा मार्ग शोधणं आणि त्यावर निरंतर, सातत्याने मार्गक्रमण करणं यालाच योग साधणं म्हणतात. हा योग साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. या सर्व अष्टांग योगाच्या सर्व साधनांचा हेतू मनाला त्या अवस्थेप्रत घेऊन जाणं आणि त्या चिरंतन शांततेचा अनुभव घेणं हाच आहे. म्हणजेच या सर्वात मन, मनाची एकाग्रता, मनाची शांतता ही अत्यंत महत्वाची आहे आणि सर्व मार्गांचा प्राण तोच आहे आणि मर्मसुद्धा. 

शुद्ध मन, शरीर व आत्मा यांना शुद्ध करून पुढच्या अनेक गोष्टींची पूर्वतयारी आहे. या सर्वात तिचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. 

याचाच खोलात जाऊन अभ्यास पुढील भागात आपण करूया.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...