Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८

भोग आणि ईश्वर  ५८
   
शुद्ध मन, शरीर व आत्मा यांना शुद्ध करून पुढच्या अनेक गोष्टींची पूर्वतयारी आहे. ही शुद्धता अत्यंत महत्वाची आहे, कारण त्या शुद्धतेने देह, मन आणि आत्मा यांची एकतानता साधण्यास मदत होते. किंबहुना त्यासाठीची ती प्रथम पायरी आहे. पण हे साधायचं कसं. 

वासना, विकार, मत्सर, द्वेष, लोभ, मोह, मद, अहंकार, दुराभिमान आणि क्रोध हे सर्व मनाला आणि त्याद्वारे शरीरालादेखील हानी पोचवतात. काही आजार हे अश्या विकारातून उत्पन्न होऊन शरीराला पोखरण्याचं अथवा जाळण्याचं काम करतात. म्हणून सर्वात प्रथम मन शुद्ध व साफ करणं गरजेचं आहे.

त्यासाठी कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना, राग, द्वेष, मत्सर, असूया इत्यादी काहीही, कोणाबद्दलही, असल्यास सर्वात प्रथम, मनातून काढुन, मन साफ केलं पाहिजे. क्रोध हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि श्रीमदभगवद्गीतेत म्हटल्या प्रमाणे क्रोधात भवती समोहात..... याप्रमाणे क्रोध हा सर्व प्रकारच्या अधोगतीची पहिली पायरी आहे. संतसज्जनांनी निरलस, निरामय आयुष्य जगलं आणि देह मन व आत्मा शुद्ध केला, त्यात क्रोधावर संयमाने नियंत्रण हे खूप मोठं कारण आहे.

याचप्रमाणे कामविकार हा देखील अनेक जन्मांचे भोग भोगायला लावतो. एकनिष्ठ आणि एकव्रती जीवन अशक्य नाही पण कठीण आहे. त्याचा सर्वात सोप्प उत्तर म्हणजे स्वस्त्री सोडून बाकी सर्व स्त्रिया माता अथवा भगिनीसमान मानून, मनाला त्या भावनेतून पूर्ण शुद्ध करणे हा दुसरा मोठा उपाय आहे. 

मत्सर व असूया हा असा असाध्य रोग आहे जो मनाचं स्वास्थ्य नष्ट करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, एखाद्याला मिळालेलं यश, कीर्ती, पैसा, धनदौलत मान मरातब हे सर्वस्वी त्याच्याच कर्माचा परिणाम आहे. 

यात आपण कोणताही नकारात्मक भाव धरल्यास, त्याचा नकारात्मक फलस्वरूपात परिणाम आपल्यापर्यंत आल्या शिवाय राहणार नाही. ही गोष्ट ध्यानात धरल्यास आपल्याला एखाद्याला मिळाल्याचं वाईट, मत्सर वा असूया वाटणार नाही. किंबहुना त्याद्वारे आपण आपल्याला मिळू शकणाऱ्या यश, धनदौलत इत्यादींना दूर लोटतो आणि ही बाब लक्षातसुद्धा येत नाही.

मद, उन्माद, माज मस्ती हे,  यश कमी कष्टात वा कुवत नसताना मिळाल्यास येऊ शकते. हा मनाच्या कमकुवत पणाचा परिणाम आहे.आपण खूपदा म्हणतो की, एखाद्याला यश डोक्यात गेलं किंवा यश पचवता  आलं नाही. अश्या व्यक्तीना  नेहमी मद वा उन्माद येतो. म्हणून यश मिळाल्यावर वा उन्नती वा प्रगती झाल्यावर, जरी ते आपल्या कष्टाचं फळ असेल, तरीही ते फळ मिळण्याची अचूकता ही विधात्याचा कृपेचा परिणाम आहे, हेदेखील ध्यानात ठेवावं. म्हणून मनाचा तोल साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. 

मोह हा एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा वा कल्पनेचा असू शकतो. काही मोह हे क्षणिक असतात, पण पूर्ण आयुष्य त्यापायी वाया जाण्याचा धोका असतो. मोह हा एखाद्या व्यसनाचा, व्यक्तिगत आकर्षणाचा, चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या पैश्याचा वा अन्य कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. मन त्या क्षणिक मोहात गुंतून, शरीराला कायमस्वरूपी त्यात अडकवून जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनात बांधून सर्व गणितं बिघडवू शकतं. 

अजून काही विकारांवर उद्या चर्चा करूया.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...