Skip to main content

मृदुलकरांनी छेडीत तारा ३

मृदुलकरांनी छेडीत तारा ३

मृदुलकरांनी छेडीत तारा
स्मरते रुप हरीचे मीरा

कमलदलापरी मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरी
हर्षभराने तनुलतिकेवरी
पडती अमृतधारा

कालिंदीच्या नीलजलापरी
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तीरी
फुलवी प्रीत फुलोरा

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभूचरणाची
मिटल्या  नयनी धुंद मनाची
रंगवी हसरी मथुरा

गीत : रमेश अणावकर
संगीत : दशरथ पुजारी
गायिका : सुमन कल्याणपूर

मीरेची आठवण आली की आठवतं तीच स्वच्छ पांढऱ्या साडीतील रूप आणि हातातील एकतारा. मुळात मीरा ही राजघराण्यातील ज्यामुळे तीचे हात पाय हे राजघराण्याला
साजेसे नाजूक असणार. अश्या या नाजूक राजघराण्यातील मुलीने घरदार यांचा त्याग करून, श्रीकृष्णाला संपूर्ण जीवन अर्पण करत वना वनात श्रीकृष्ण शोधार्थ भटकणं श्रेष्ठ समजलं.

अश्या मृदुल अर्थात नाजूक बोट एकतारीवर फिरवत त्याच्या तारा छेडत फक्त आणि फक्त श्रीकृष्ण स्मरण करत जीव जगवला. अश्याच तिच्या श्रीकृष्णार्त स्थितीचं वर्णन गीतात मांडलंय. ही आर्तता, ही लीनता, ही एकाग्रता अनुभवल्या शिवाय अस गाणं येऊ शकत नाही , हे अनुभवाने नक्की सांगू शकतो मी. 

राजघराण्यातील असल्यामुळे राजघराण्यात लहानाची मोठी झालेली मीरा. तिच्या नाजूक पण बंद असताना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे  दिसणाऱ्या ओठातून मनोहारी आणि अवीट गोडीचं श्रीहरिच आपल्या लाडक्या श्रीकृष्णांच नाव जेंव्हा जेंव्हा येत असे, तेंव्हा तेंव्हा त्या नामाच्या नादाने मीरा प्रत्येक वेळी हर्षभराने, अत्यानंदाने आणि आपण आपल्या लाडक्या आराध्यांचे नाव घेतोय या भावाने जडदेहाच्या आणि जडतत्वाच्या पार झालेली मीरा नामाच्या अमृतधारेत न्हाऊन निघायची.

या भासमान जगाच्या पलीकडे असलेल्या आणि फक्त भाव जाणणाऱ्या आणि भावात्मक उत्कटतेचा अनुभव देणाऱ्या  व निर्गुण निराकार जगात किंबहुना भावाच्या अनुभूतीत, जगणाऱ्या मीरेसारख्या भगवतभक्तांना फक्त आपल्या आराध्याचे नाम हेच एकमेव अंतिम ध्येय असतं. ते नाम आपण घेत आहोत, घेऊ शकतो आहोत, घेतोय या भावनेने अक्षरशः रोमांचित व्हायला होतं. त्या भावनेने अंग प्रत्यंग जणू शहारत आणि हा उत्कट अनुभव घेत असताना त्या आनंदात न्हायला होतं. जणू अमृतधारेत बरसून निघाल्याचा आनंद आणि समाधान तृप्त करून जातं. हा अनुभव घेऊन बघितला तरच समजेल अन्यथा शब्दांचा खेळ फक्त. 

© लेखन : प्रसन्न आठवले
२२/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...