Skip to main content

श्रीरुक्मिणी स्वयंवर २

श्रीरुक्मिणी स्वयंवर २

llश्रीगणेशाय नमःll
    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll

द्वारकेत मदनराव शर्मा नावाचे एक विप्रवर भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाचा लाभ व्हावा या हेतूने प्रेरित होऊन तपश्चर्येला बसले होते. एक तप पूर्ण होऊन गेल. एके दिवशी माता रुक्मिणी प्रत्यक्ष मदनराव शर्मा स्वप्नात जाऊन , त्यांना दृष्टांत देती झाली. रुक्मिणीमातेने त्यांना सांगितलं, की आपण ज्या श्रीकृष्ण भगवंत यांच्या दर्शनाप्रित्यर्थ तप करीत आहात, ते स्वतः याकाळी द्वारकेत नाहीत.,"

मदनराव मातेला म्हणाले

"माते ते द्वारकेत नाहीत, मग कोठे आहेत ते. कारण त्यांच्या दर्शनाची आस धरून व तोच संकल्प मनी दृढ करून मी आज एक तप झालं, तपश्चर्या करत आहे. आता आपणच माझी माय होऊन मला मार्गदर्शन करावे."

इतकं बोलून मदनरावानी रुक्मिणी मातेच्या चरणांवर लोळण घातलं. आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. श्रीकृष्ण विरहाच अजून किती काळ दुःख भोगाव लागणार , या विचाराने , त्यांना अकल्पित दुःख  झालं. अर्थातच मातेने त्यांना हाताला धरून उठवलं आणि रुक्मिणी माता म्हणाली

" या समयी भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्र देशी पैठण प्रांती एक अवतारी पुण्यपुरुष आहेत , जनार्दन शिष्य श्रीएकनाथ , त्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रुपात, आज बारा वर्षे झाली , पाणी भरण्याच मुख्य कार्य करत आहेत.  तुला जर श्रीकृष्णांची भेट हवी असेल तर तू तेथे जा. कारण तिथे किती काळ राहण्याचा त्यांचा मानस आहे, हे तेच जाणतात. तद्वत आपण कृपा करून तिथे जा, श्रीकृष्ण नक्की भेटतील. "

" जशी आपली आज्ञा "

अस विप्रवराने म्हटलं आणि त्यांना जाग आली. उठून अंदाज घेतला, ब्राम्हमुहूर्त नुकताच सरत होता. अर्थात पहाट होतच होती. आचार्यांना अत्यानंद झाला. कारण पहाट समयीचे स्वप्न हे नेहमी सूचक असते असा शास्त्रार्थ त्यांना माहीत होताच, पण त्यांचा अभ्यास देखील तेवढा होता. शुचिर्भूत होऊन स्नानसंध्यादी कर्मे उरकून, आचार्य लवकरच ,

म्हणजे सूर्य उगवता उगवताच रुक्मिणी मातेची आज्ञा प्रमाण मानून व स्वप्नदृष्टांतावर श्रद्धा ठेवून पैठणचा मार्ग धुंडाळत धुंडाळत, पायी, कधी राजमार्ग, कधी कच्चा कच्चा मार्ग, तर कधी जंगल, काटेकुटे , विस्तीर्ण वनसंपदा , मानवी, दैवी आपत्ती, श्वापद, वाटमारे, लुटारू यांना चुकवत चुकवत पैठणच्या रोखाने निघाले.

कित्येक दिवसाच्या यात्रेनंतर विप्रवर पैठणच्या पवित्र भूमीत
पोहोचले. अर्थातच नाथांचं घर सापडायला अजिबात अवकाश लागला नाही. 

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...