Skip to main content

मृदुलकरांनी छेडीत तारा २

मृदुलकरांनी छेडीत तारा २

मृदुलकरांनी छेडीत तारा
स्मरते रुप हरीचे मीरा

कमलदलापरी मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरी
हर्षभराने तनुलतिकेवरी
पडती अमृतधारा

कालिंदीच्या नीलजलापरी
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तीरी
फुलवी प्रीत फुलोरा

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभूचरणाची
मिटल्या  नयनी धुंद मनाची
रंगवी हसरी मथुरा

गीत : रमेश अणावकर
संगीत : दशरथ पुजारी
गायिका : सुमन कल्याणपूर

रमेश अणावकर एक उत्तम गीतकार, शब्दांचे जादूगार. ज्यांनी मृदुल करांनी छेडित तारा गाणं लिहिलं , अर्थात तितकंच सार्थ त्याच सोनं केलं संगीतकार दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांनी. पण शब्द लाजवाब आहेत यात शंका नाही. ज्या गाण्याबद्दल मी लिहिणार आहे, म्हणजेच जे उलगडून दाखवणार आहे, त्या गीतकाराची वानगीदाखल काही निवडक गीतं पुढीलप्रमाणे

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट,असा मी काय गुन्हा केला, ते नयन बोलले काहितरी , नकळत सारे घडले
निरोप तुज देता ऊर्मिला मी, पत्र तुझे ते येतां अवचित
प्रभाती सूर नभी रंगती, बोले स्वर बासरिचा, मी एकला वेड्यापरी, मी मनात हसता प्रीत.

आता गाण्याकडे वळताना मुळात हे गाणं मीराबाईंने श्रीकृष्णासाठी म्हटलंय हे ध्रुवपदालाच समजत. मीरेबद्दल लिहिणं कठीण आहे. याच कारण मीरा  फक्त भक्तीनेच समजून येऊ शकते.  उत्कट भक्तीची परमावधी आणि श्रीकृष्णांच्या भक्तीत उच्च पदावर असलेली आणि राधेनंतर श्रीकृष्णांच्या प्रेमापेक्षा विरहाग्नित आपल्या भक्तीची क्षण क्षण परीक्षा देत देत, संपूर्ण आयुष्य स्व जाळून फक्त कृष्णनामात रंगून आत्मभक्तीची ज्योत तेवत ठेवणारी कृष्णमय झालेली एक अद्वितीय कृष्णभक्त होती. आजही त्यासम दुसरं उदाहरण नाही.

माझ्यामते राधेपेक्षा मीरेने विरह जास्त सहन केला. याच कारण म्हणजे, राधेला कृष्ण हा कृष्णाजन्मांत आणि राजा होण्याआधी नक्कीच प्रत्यक्ष भेटला, बोलला, श्रीकृष्ण काय आहे हे राधेने प्रत्यक्ष पाहिलं , जाणलं, अनुभवलं त्यातून तिची भक्ती फुलत गेली. परंतु मीरेचं तस नव्हतं. ती कलियुगात श्रीकृष्णांच्या श्रवण भक्तीत श्रीकृष्ण मय झाली. तिने कृष्णाला आधी वरलं नामरूपात आणि नन्तर दर्शन घेतलं. पण राधेने कान्हाला पाहून मग भक्त झाली.

मीरेची आठवण आली की आठवतं तीच स्वच्छ पांढऱ्या साडीतील रूप आणि हातातील एकतारा.

© लेखन : प्रसन्न आठवले
२१/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...