Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका ४

जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ४ गीत ४

राजा जनकाच्या पुण्यनगरी विदेहात अर्थात मिथिलेत प्रवेश केल्यापासुन भ्राता लक्ष्मण अचंबित जहाला होताच. त्यामुळे त्याचे कौतुक , आश्चर्य याने भारलेले, प्रसन्न आणि प्रशांत मन, सतत प्रणिपात म्हणजेच नीत नमन करत होते. गुरु विश्वामित्राना , राजा जनकाला आणि या समृद्ध नगरितील प्रजाजनाना. त्याच विस्मयचकित आणि प्रफुल्लित अवस्थेत लक्ष्मणाच्या मुख़ातून अनायासे आणि कौतुके शब्द  निघाले .

राजा जनकांची ही नगरी बहु असे सजलेली
विश्वामित्रे गुरु जनानी जैसे त्या वर्णिली
समृद्धिही इथली अग्रणी जशी अयोध्येपरी
राजा जैसा तशी प्रजा अन तैसेची ही नगरी

मंगलदायक प्रसन्नकारक नटली वनवेलिनी
पशु , पक्षी, समृद्ध, तृप्त जणू स्वर्गसुख कांक्षिणी
गृहे गृहे सजलेली ऐसी भासे दीप  पर्वणी
सुख समृद्धि धान्य गोधने नांदे  पुण्येकरुनी

सनई चौघडा मंगल वादन अष्टौप्रहरे भासे
सुखी मानवा आणिक प्राण्यानी नगरी ही दिसे
उगीच नाही तुलन केले गुरुनी या स्वर्गिसे
इथून निघणे वाटेना मग राहु या नगरिते

बहु कौतुके बहु विशेषण जरी वर्णी विदिषे
कारण आहे इथले जन जन भासती विशेषे
करी  तुलना अयोध्येपरी नगरी जणू भासे
प्रफुल्लित मन शांत आत्मा याचे द्योतक असे

आता इतकं कौतुक करून झाल्यावर भ्राता लक्ष्मण ज्येष्ठ बंधु श्रीराम यांच्याकड़े प्रतिक्रियेसाठी पहाताना प्रभु मात्र शांत चित्ते लक्ष्मणांच गुणवर्णन एकण्यात मग्न होते. आता पुढे बघुया प्रभुंची काय प्रतिक्रिया आहे यावर.

कवन : प्रसन्न आठवले
०५/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...