Skip to main content

श्रीकृष्ण नीति १

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्ण नीति १
युगांधर , युगपुरुष , युगप्रवर्तक, योगेश्वर , जगतोद्धारक , भक्तवत्सल , त्राता , तारणहार , अश्याच अगणित नामाभिधानाने या जगावर युगानुयुगे मोहिनी करून असलेल्या आणि आपल्या गुणवर्णन विशेषाहुन दशांगुळे उरलेला श्रीकृष्ण . कृष्णाच्या चरित्राचा वेध घेण म्हणजे महासागरात अणु सम एखादा कण शोधण्याइतकंच कठीण , किंबहुना अत्यंत दुरापास्त कर्म .त्यामुळे हा विषय विचारात येण्याची प्रेरणा प्रत्यक्ष त्यानेच दिली असणार हेच गृहीत धरून , काही भागात कृष्ण चरित्राचा विश्लेषणात्मक मागोवा घेण्याच ठरवून हा लेख प्रपंच करण्याच योजलं , अर्थात योगेश्वराच्या आधारावरच हे सम्पूर्णाकडे जाईल हे निश्चित .

या युगप्रवर्तक व्यक्तीच्या चरित्राचा विचार करण्याच कारण म्हणजे त्याच्या चरित्रातील विविधता . विश्व कवेत घेण्याची ताकद असणारा बालकृष्ण यशोदामातेला घाबरतो, तिच्या आज्ञेबाहेर नाही, पण तीच माता रागावल्यानन्तर तिचा रुसवा काढण्याची चलाखी, चातुर्य त्याच्याकड़े आहेच , पण त्याच बालरूपात पूतनासारख्या राक्षसीला मारण्याच अचाट आणि अफाट सामर्थ्य त्याच बाहूत आहे , हेही विशेष. राधेसह समस्त गोपिंच्या शब्दात बंदिवान होतो, सर्व गोपाळाना जमवून अनेक लीला करून देखील कुठेही न अडकण्याच कौशल्यसुद्धा त्याच्यामध्ये मध्ये आहे, कंसासह चाणूर , शिशुपाल आदिंचा वध करण्याच सामर्थ्य असलेला हा युगपुरुष , त्यांची शंभर पाप भरण्याची वाट पाहू शकतो. आणि तीच शंभरी भरल्यावर क्षणांचा देखिल विचार करत नाही .
हाच परममित्र आहे आणि सुदामाला अनेक वर्षानि भेटल्यावर राजा असून देखील सिंहासनावर मित्राला बसवून त्याचे पाय धुण्यापासुन पूर्ण आतिथ्य करण्याचा गृहस्थधर्म सुद्धा यांच्याकडे आहेच. त्याने न मागता सुद्धा युगानुयुगाचे दान मित्रकर्तव्य म्हणून फक्त काही पोह्यांच्या बदल्यात सहजी देण्यास तो विसरत नाही. किंबहुना काही मिळाल्यास तितकच व्याजाने देण्याची परमकर्तव्यता त्यांच्यात आहे. गृहस्थाश्रमी असताना रुक्मिणी , सत्यभामेसह आठ पट्टराण्याच्याही अधीन आहेच. सर्वशक्तिमान असून सुद्धा निःशस्त्र राहून अर्जनासह पांडवांकड़ून महाभारतातील महायुद्धात कौरवांसह समस्त दुष्टशक्तिंचा निःपात  करून घेण्याची ताकदसुद्धा त्यांच्यात आहे.

या ऐश्या सोळा विद्या चौसष्ठ कलांचा अधिष्ठाता असलेल्या आणि अनेक रुपात व रंगात विराजमान असून सुद्धा त्यात कुठेही न गुंतलेल्या भगवंताच्या चरित्राच आकर्षण कोणाला नसेल तरच आश्चर्य . पण हे करत असताना श्रीकृष्णाच्या चरित्रातील विशेष गुणांचा मागोवा घेण हे या लेख मालेच मुख्य वैशिष्ट्य असेल. एक मानव म्हणून त्याच असेलेल स्थान अधोरेखित करण हाच मुख्य उद्देश्य . श्रीकृष्ण  एक देव म्हणून नव्हे तर एक महामानव या अर्थी त्याच्या चरित्राचा वेध घेण हे उद्देश्य  ठेवून हे कथासार सुरु करत आहे

आज पुरत इथेच थांबुन पुढील भागापासून  कृष्णचरित्राची एक एक पाकळी आणि विशेष पैलु हळूवारपणे उलगडून बघुया. आणि पाहुया काय काय हाती लागतय.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले
१३/०९/२०१७
भाग प्रथम समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...