Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका १

प्रभुश्रीराम आणि देवी जानकी, यांच्या मिथिलानगरीतील प्रथम भेटीवर आधारित गीत मालिका :

राजकुमारी जानकी, भगिनी व सखींसह, मिथिला नगरीतील राज उद्यानात विहार करत असताना अचानक  राजकुमार श्रीराम बंधू लक्ष्मण यांच्यासह तिथे आलेले त्याना दिसतात. दोघांची नजरानजर होते. दोघानाही एकमेकांच्या तेजाचा परिचय होतो आणि अचानक झालेल्या या भेटीमुळे लज्जित आणि स्तंभित झालेली  जानकी सखी आणि भगिनी उर्मिला हिला म्हणते

सखे उर्मिले कोण कुंवर हा तेजस्वी दिसतो
ओळख नाही तरी अलौकिक क्षात्रतेजी भासतो
जणु कुणी हे तेज नभीचे अवनिवरी धाडले
सारे जणु तारांगण घेऊन  कुणी आला भासतो

मज हे कोड़े पडले की तुज ही दिसते तैसेची
त्या तेजाची उजळ पताका नभी जणु जाणवे
डोळे बघ ते सहस्रसूर्या  तेजासम तैसेंची
मन हे मजवर रुष्ट जहाले भुलले जणु जाणवे

वदे उर्मिला सखे जानकी तूच बोलसी सारे
म्हणसी, तूज कधी ना कोणी भुलवू ग पाहे
कोण्या क्षत्रिया वाचून मी कोणा ना  पाहिन
मग या क्षत्रिया पाहुनि ना हाती मन राहे

तुझ्या प्रश्नी या काय उत्तरे देऊ ना सुचते
कोड़े हे तू पिताश्री प्रति मांडावे वाटते
तेच तुला या कोडयातूनी सोडवीती भासते
श्रुतकीर्ति मांडवी यांस ही  तैसेची वाटते

खट्याळ तुम्ही आहा विषय हा चेष्टेचा करता
मज जे दिसते तेज भुवरी तुम्ही न का देखता
वदेन तुमच्या चेष्टा राज्ञा जाऊनी पहा आता
तरी सत्य हे कोड़े न कळे तेज अपौरुषेया

तुझा निश्चयो तूच विसरशी जानकी ग सखये
वदलीस मागे कधी न कोणा पुरुषा मी पाहिन
जा ग चहाटळे त्या उद्देश्ये नसे पाहिले मी
असती जरी हे प्रथम भेटले पराक्रमा वंदन

हीच प्रभुंची आणि देवी जानकी यांची रामायणातील पहिली दृष्टादृष्ट . यावर सखींच म्हणण पुढील भागात.

कवन : प्रसन्न आठवले
०२/०९/२०१७
०८:४६

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...