Skip to main content

श्रीकृष्ण नीति ७

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्ण नीति ७
.
कालच्या भागात श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्यातील साम्य आणि भिन्नता मुद्दाम बघण्याचं खासच कारण आहे .त्रतायुग समाप्तिला श्रीराम अवतार संपला आणि द्वापारयुग समाप्तिला श्रीकृष्ण अवतार संपला. या मधे कितीक हजार वर्ष निघुन गेलेली आहेत . . त्यामुळे त्रेतायुगातील  परिस्थिति आणि द्वापारयुगातील परिस्थिति यात जमीन आकाश इतका फरक पडलाय. त्रेतायुगात मुख्य शत्रु समुद्रापार होता . तर द्वापारयुगात हाच शत्रु प्रत्यक्ष्य घरातच आहे. जस श्रीकृष्णा बाबत कंस-मामा,  , रुक्मी - मेहणा, शिशुपाल-- आतेभाऊ, पांडवांबाबत भीष्म - आजोबा, द्रोणाचार्य - गुरु, कर्ण - सख्खा भाऊ, कौरव सख्खे - चुलत भाऊ , शकुनी - कौरवांचा मामा .

असेच अनेक प्रकारचे घरातीलच शत्रुं असेलेल  वातावरण म्हणजे पूर्ण भिन्न परिस्थिति . म्हणजेच जे आदर्श, जी तत्वे , जी मूल्य  रामायणात  जीवापाड जपली, त्याच मुल्यांच्या पूर्ण विरुद्ध वागाव लागणारा वा वागायला भाग पडणारा  काळ. जूनी मूल्य मोडित काढून नवीन मुल्यांना जन्म देणारा काळ. इथे दोनच शक्यता किंवा वाटा वा निर्णय संभवतात . एक शत्रु घरातील आहे म्हणून सर्वस्वाचा त्याग करून जो भाऊ अथवा नातेवाईक लालसी आहे, तयाला शरण जाऊन त्याच्या अधीन होऊन राहण . तथाकथित मुल्यांची जपणुक करण.  जे पितामह भीष्म यानी  चुकीच्या मुल्यांमधे वा तत्वानमधे अड़कुन केल, आपल्याच प्रतिज्ञेत स्वतःला अडकवून.

पण शत्रु यावरच समाधानी होणार नाही, हेच येणारा काळ दर्शवत होता . कारण त्याची लालसा ही सतत व्रुधिंगत होणारी असणार. षड्रिपु हेच पुढच्या युगांचे मुख्य शत्रु असणार है भगवंतानी जाणल होत. त्याचीच पाऊल भगवंतानी ओळखली होती किंवा असावीत. यातच अजुन एका शक्यतेची बीज दडलेली होती. ती म्हणजे तत्वाच्या, मूल्य जपण्याच्या नावाखाली एक बाजू पूर्ण कमजोर किंवा प्रयत्नहीन होऊ शकते. शकत होती. आणि ही कमजोरी देशाला, समस्त पृथ्वीला घातक ठरू शकते. शकली असती. आणि मग अन्यायाविरुद्ध उभ राहण्याचा प्रश्नच  आला नसता. वर म्हटल्याप्रमाणेच पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य आपापल्या भूमिकेचे बंदी झाले आणि द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी आपली भूमिका सोडुन होणारा अन्याय रोखु शकले नाहीत. तेसुद्धा त्यांची तशी ताकद असताना. याचा परिणाम असा झाला असता की, सतत एकाच नात्याला पडत , नमत घ्यावेच लागल असत. म्हणजे घरीच वाद आहे घरिच मिटवू या सबबीखाली एक बाजू लढण्याची  जिद्द हरवून बसली असती . आणि सर्वस्व गमावून बसली असती. किंबहुना द्युता नन्तरची पांडवांची अगतिकता त्याचाच द्योतक होत. हेच भगवंत जाणुन होते. चिरंतन मुल्यांची जपणुक स्व गमावून होऊ शकत नाही, हेच निर्विवाद .

हे जर सर्वसामान्य घरात घडत तर त्याचे फार परिणाम समाजावर झाले नसते. पण हेच जेंव्हा राजाच्या बाबतीत , राजपरिवाराबाबत घडत तेंव्हा त्याचे खुप दूरगामी परिणाम राज्य, समाज, देश या सर्वानाच भोगावे लागतात. आणि शत्रु प्रबळ होऊन राष्ट्र नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याही पेक्षा धर्म नष्ट होण्याचा धोका. जो खुप घातक ठरू शकतो. हेच भगवंताना दिसल असाव. यांच कारणास्तव   भगवंतानी पुनः अवतार घेऊन , प्राप्त परिस्थितीत धर्म , म्हणजे नीज कर्तव्यासाठी, राष्ट्रासाठी , राजधर्मासाठी, दुर्जन संहारासाठी  स्वतः येऊन व्यावहारिक नीतिमत्तेत राहून, पण प्रसंगी शत्रुच्याच युक्त्या वापरून अंतिम विजय मिळवायचा कसा याचा एक आदर्श परिपाठ घालुन दिलाय.

महाभारतातील श्रीकृष्णाच सम्पूर्ण आयुष्य हे त्याच साठी समर्पित आहे. जिथे मूल्य जपावी लागतील तिथे त्यांचं रक्षण जरूर कराव. पण जिथे जिथे ही मूल्य शत्रुच्या फ़ायद्याची किंबहुना शत्रुला विजय मिळवण्यासाठी उपयोगी पडतील तिथे तिथे त्यांच्यां या कुबड्या फेकून देऊन शत्रुचा निःपात हेच उद्दिष्ट असाव, असल पाहिजे. जिथे जिथे नातं हे सर्वसामान्य जनतेच्या हित राक्षणात बाधा आहे तिथे तिथे  त्यालाही आणि वेळ पडल्यास नातेवाईकाला सुद्धा जमीनदोस्त  करण हे राजांच प्रथम कर्तव्य आहे. याच वागण्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच श्रीकृष्णाच जीवन. आणि हिच श्रीकृष्ण नीति.

वरील सर्व गोष्टीन्च्या तळाशी  जाऊन श्रीकृष्ण नीतीचा उहापोह पुढील भागात करूया .

आज इथेच थांबूया .

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले

१९/०९/२०१७

भाग सप्तम समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...