Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका ८ व अंतिम


जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ८ गीत ८ व अंतिम
ज्या क्षणाची ब्रम्हादिक देव, देवेंद्र, नारद , यक्ष , किन्नर, गन्धर्व , समस्त सृष्टि, स्वयम काळ अत्यंत उत्कटतेने प्रतीक्षा करत होते, तो क्षण म्हणजे रामरूप प्रत्यक्ष श्रीमहाविष्णु आणि जानकीरूप स्वयम श्रीमहालक्ष्मी देवी यांच मानवी देहात आल्यानंतर प्रत्यक्ष सामोर येण. सर्व ग्रह जणु शुभ योगात संचार करत होते. नभी असलेली ही स्थिति आणि अवनिरूप माता वसुंधरा हे सर्वजण,  ऐश्या पावन, मंगल, शुभ घडीला पवित्र होऊन , कृतकृत्य नजरेने हा सोहळा लोचनात साठवण्यास आतुर झाले होते. आणि ज्या सोहळयाची सर्व प्रतीक्षा करत होते तो क्षण आला. आता  पर्यन्त सखी, भगिनी यांच्यात मग्न असलेली जानकी आणि बन्धु लक्ष्मण यांच्याशी संवाद साधत असलेले श्रीराम यांची नजरानजर झाली आणि जणु सनई चौघडा वाजावा तसा निनाद झाला. जणूकी शुभशकून जहाला.  मानवी रुपात असलेल्या दोन महापवित्र परमात्म स्वरूप ज्योतिनि एकमेकांना ओळखल आणि चराच रातुन जणु गुंजारव सुरु झाला :
देखुनी श्रीहरी लक्ष्मी रूप ते
काळ ही क्षणिक थांबे सत्वर
भुवर  तेजोमय  अवतरले
देव लोक जमले जणु स्थावर
शक्ति रूप आभा देवीची
व्याघ्र स्वयम वाहन आले
गरुड वाहन श्रीहरिंचे
आकाशातून बघण्या आले
नारद किन्नर स्वर्ग सोडुनि
विदेह नगरी नभोमंडली
सत्ययुगाच्या परिसीमेवर
तेजरूपे दो भुवर जमली
क्षण क्षण जाई जसा जसा
काळ स्तब्ध हो तसा तसा
सारे विश्व जाहले उत्सुक
हरी लक्ष्मी मिलनी दर्शक
गुपीत दडले गुहि काळाच्या
यातून काळालाही सूटणे
ग्रहण सोडवावे म्हणुनी तर
सारे ग्रह आकाशी जमणे
या क्षणिक वाटणाऱ्या नेत्रदीपक सोहळयाचे सर्व साक्षीदार पावन झाले आणि स्वयंवराची सिद्धता जनक राजांच्या राजगृहात, राजमन्दिरात आणि राजसभेत सुरु झाली.
कवन कर्त्याच मनोगत :
सहज आलेला एक विषय प्रभु आणि जानकी यांची प्रथम भेट काव्यमय स्वरुपात मांडावी, एका गीतमालेद्वारे. हे स्वप्न सत्यात उतरल आठ गीतांच्या माण्डणीतुन. यात माझा लिहिता सहभाग असला तरी प्रेरणास्त्रोत स्वयम माझे गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत .
त्यांच्याच प्रेरणेने पुढील गद्य स्वरूपातील लेखमाला
श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर नवरात्रातील नऊ पुष्पे  आणि विजयादशमिला समारोप. श्रीराम जानकी यांच्या कथेत काव्य जाणवल आणि म्हणून गीतमाला लिहिली.  पण श्रीकृष्ण रुक्मिणी कथेत नाट्य आहे म्हणून गद्य लिहिन . तरी सुद्धा मधे मधे गीत असेल पण गद्य मुख्यतः .
 तस्मात सदिच्छा असुद्याव्या पाठीशी आणि मस्तकी आशिर्वाद.
शुभम भवतु
जय श्रीराम
कवन : प्रसन्न आठवले
०९/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...