Skip to main content

श्रीकृष्ण नीति २

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्ण नीति २

श्रीकृष्णाच्या रूपाचं, स्वरूपाचं , उद्देशयांचं , ध्येयांचं , संबंधांचं  आणि महत्वाच म्हणजे व्यक्तित्वाच आकलन होणं शक्यप्राय नाही. म्हणून काही महत्वाचे पैलूच आपण पाहूया. मुख्य उद्देश त्यातून आजच्या काळाला सुसंगत काही सापडत का आणि ते कितपत आचरण योग्य आहे याचा पण विचार करूया .

वास्तविक कृष्णलीलांची सुरवात ख़र तर त्याच्या जन्माच्याही आधीपासून सुरु झाली होती . कृष्ण जन्माच एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टिमागे कारण मीमांसा आहे. प्रत्येक गोष्टिमागे आधीच्या कोणत्याना कोणत्या तरी गोष्टीचा संदर्भ आहे. प्रत्यक्ष्य श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तिला सुद्धा वालीच्या वधाची पार्श्वभूमी आहे. हा भाग नन्तर विस्ताराने येईलच अन्यथा विचार करा की एक महाकाव्य लिहिल सत्ययुगात वाल्मीकि ऋषिनी आणि दूसर महाकाव्य लिहिल गेलय द्वापरयुगात पण काही संदर्भ आलेत. अजुन एक संदर्भ आहे तो म्हणजे रामायण हे महाकाव्य घड़ण्याआधी लिहिल गेलय कित्येक वर्ष आधी आणि महाभारत हे महाकाव्य सर्व घडून गेल्यावर व्यास मुनिनी लिहून घेतल .

आधीच्या जन्मात देवकीने तप करून स्वयं भगवान विष्णुना प्रसन्न करून घेतल आणि पुत्ररूपात उदरी जन्म घेण्याची इच्छा प्रकट केली . पण हे त्याच  जन्मात शक्य नसल्यामुळे भगवांतानी त्याना पुढील जन्मी म्हणजेच द्वापार युगात श्रीकृष्ण अवतारात देवकीच्या उदरी जन्म घेतला. हाच धागा सूत्र म्हणून धरून पुढे जायच ठरवूया . आणि अनेक गोष्टिंचा संदर्भ आधी शोधून काढू. ज्यायोगे कृष्णाच्या जन्मातिल कर्म रहस्य त्यायोगे  आधी जाणून घेता येईल. कृष्ण चरित्रातील  सर्वात महत्वाची गोष्ट  ती ही की , हा जन्म सर्व समावेशक असल्यामुळे तो प्रत्येक रुपात त्या त्या गुणांचा पुरस्कार करतो .

अश्याच अद्भुत रहस्यानी युक्त श्रीकृष्ण चरित्राचा रहस्य वेध करण्याचा प्रयत्न प्रभुकृपेने करणार आहे . बघुया कस कस होतय ते.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले
१४/०९/२०१७
भाग द्वितीय  समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...