भोग आणि ईश्वर ५५५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
या नवीन features ना सामावून घेण्यासाठी प्राण्यां मध्ये असलेल्या बऱ्याच मर्यादा, मानव निर्मिती करताना, काढून टाकाव्या लागल्या. याचं एक महत्वाचं वैज्ञानिक सत्य किंवा कारण हे आहे की, जितके सेन्सर्स आणि controls जास्तं तितकं मशीनचं स्केल आणि साइज् कमी करावं लागतं. तंत्रज्ञ मंडळींना याचं अर्थ किंवा हे तत्व लक्षात येईल. याचं तत्वाने जेवढं स्केलं साइझ हे फॅक्टरस वाढवावे लागतात तेवढे कंट्रोल व सेन्सर्स कमी करावे लागतात.
याचं principle नुसार देवाने मानव निर्मिती करताना, प्राण्यांमधील काही नियंत्रण व सेन्सर्स शिथिल केले किंवा काढून टाकले. त्यातील एक म्हणजे मन निर्मिती करताना, भावनांना पूर्ण क्षमतेने व्यक्त करता यावं, या साठी देहाची, देहिक कर्मांची बंधनांची सारी नियंत्रण काढून टाकली. जेणेकरून, मनाचं पूर्ण स्वातंत्र्य, अमर्याद आनंद, उन्मुक्त जीवनाची शैली आणि भावनांची व्यक्तता विनासायास भोगता व उपभोगता यावी. त्याचप्रमाणे, मनातील भाव पूर्ण व्यक्त होऊन, बुद्धी व देह हे त्या भावा नुसार कार्य करून, एकतानाता राहील, याची पूर्ण दक्षता, ईश्वराने घेतली.
पण या सर्व नियंत्रण मुक्त जीवाला कर्माच्या बंधनांची मर्यादा अर्थात सर्वात मोठा सेन्सर विधात्याने उत्तमरीत्या बसवून, या मानवरुपी देहाला एक मोठा नियंत्रक बसवला आहे.काहीही करण्याचं स्वातंत्र्य व कर्माची मोकळीक तर दिली पण, जे करू तेच भोगण्याचा एक मोठा सेन्सर अर्थात संवेदक बसवून, सर्व जीवात श्रेष्ठता देऊनही, वागण्यातील मुक्ततेचा परिणाम, मनाला घालून दिला.
अगतिकता किंवा अपरिहार्यता अशी निर्माण केली की, एका मशीनने केलेलं कर्म त्या किंवा त्या देहानंतर येणाऱ्या दुसऱ्या मशीनला भोगावे लागेल,अशी विचित्र परिस्थिती निर्माण केली. वयात जी खरी मेख किंवा गूढता अशी आहे की, दुसऱ्याचं पाहून, एखादा सुधारेल, ही आशा, विश्वात्मक शक्तीला होती. त्यामुळे, जग आणि जगातील हा मानवरुप प्राणी, काही प्रमाणात स्व नियंत्रणात राहील आणि जगातील इतर सर्व सजीवांना त्यांचं नैसर्गिक आयुष्य सुखाने व नैसर्गिक व्यवस्थे नुसार चालू शकेल.
परंतु मी काही करू शकतो आणि मी केलं की होतं, हा अति आत्मविश्वास आणि याची देही याची डोळा आपला ह्रास अथवा नुकसान होईलच याची खात्री देता येत नसल्यामुळे, मानवी मनाचा बुद्धीचा आणि देहाचा उन्मत्तपणा वाढत गेला. कदाचित हीच असुरी.वृत्ती म्हणून गणली जात असेल. या उंमत्तपणामे मानवाने, अनेक शिखरे लीलया पादाक्रांत केली. वसुंधरेच्या संपत्तीचा वापर, अतिवापर, गैरवापर असे एकावर एक अनेक अपराध, गुन्हे किंवा प्रमाद मानव युगानयुगे करतो आहे, करणार आहे.
या विश्वातील संचालित लहरींचा समतोल राखण्याचं खूप महत्वाचं कार्य, मानवी मनातून प्रसारित होणाऱ्या लहरी करतात. पण या कर्माच्या सिद्धांताचा सरळसरळ अर्थ असा निघतो की, तुझी उन्नती व अधोगती, या दोन्हींची जबाबदारी, व्यक्तिशः, त्या देहातील आत्म्याची आहे आणि असते. कारण वास्तविक अर्थाने, त्या त्या जन्मा तील देहाचा मालक हा, त्या प्रत्येक देहात वसलेला आत्मा, हाच सर्वार्थाने, तो देह, चैतन्य रुपात, चालवत असतो.
पण ईश्वराने तर, प्राणी देहात असलेले वेगवेगळे सेन्सर्स, संवेदक व नियंत्रक, स्केल व साइज वाढवताना आणि मनाची निर्मिती करताना काढून टाकलेत. कारण ईश्वरी संकल्पनेप्रमाणे, सर्वात मोठा नियंत्रक व संवेदक मन या रुपात मानवाला बहाल केला होता. म्हणजे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा जास्त जबाबदार, सुज्ञ आणि जाण असलेला असेल, हा विधात्याचा होरा होता. यावर अजूनही दीर्घ चिंतन अपेक्षित आहे. ते आपण उद्याच्या भागात पाहूया. तोपर्यंत आपण नामारुपातून, त्या ईश्वराला हृदयातील आत्मकेंद्रात साठवण्याचा प्रयत्न करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment