भोग आणि ईश्वर ३२२
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
मनाच्या काळजी, चिंता करण्याच्या प्रवृत्तीला त्या माणसाचा स्वभाव म्हणता येईल.किंवा तो स्वभावाचा एक भाग आहे, असंही आपण म्हणू शकतो. तसं पाहिलं तर, अनेक गोष्टी या मूळ स्वभावाचा भाग आहेत किंवा असतात. काहीजण जन्मतः शांत, सोशिक, सहनशील, स्वभावाच्या असतात. काहीजण कितीही त्रास , कष्ट, भोग असले तरी, आनंदी असतात, दिसतात व वागतात. काही जण पटकन निराश होतात वा घाबरून जातात, तर काहीजण मनाच्या कोषात दडून अबोल असतात.
काहीजण कितीही सुखासीन आयुष्य मिळालं, काही त्रास वा कष्ट झाले नाहीत, तरीही सतत कटकट वा तक्रारी करतच आयुष्य जगतात. हे सर्व मानवी स्वभावाचे विविध मूळ पैलू किंवा मूळ स्वभावाचा भाग आहे. स्वभावाची, यातील काही वैशिष्ट्य ही जन्मतः असतात, तर काही परिस्थितीवश स्वभावात येतात. पण परिस्थिती वश स्वभावात दाखल झालेली वैशिष्ट्य ही परिस्थिती बदलतात, वागण्यातून निघून जातात आणि मूळ स्वभाव व वागणूक आपोआप बाहेर येते. कारण स्व म्हणजे आपण व भाव म्हणजे मनातील विचार व त्यांचं एकत्रित तयार झालेलं मिश्रण.
परिस्थितीमुळे झालेले बदल हे नाटकासारखं असतात. परिस्थिती हा एक पडदा आहे. पडदा उघडताच, नाटका तील भूमिकेप्रमाणे स्वभावात बदल होतो आणि परिस्थिती पुन्हा बदलली म्हणजे पडदा पडला की, ताबडतोब मूळ स्वभाव, पुन्हा परत येतो आणि वागणूक बदलते. त्यांच्या वागणुकीतील हे बदल, आपण सहज ओळखू वा समजू शकतो. वागणूक म्हणजे स्वभावानुसार वा मनातील विचारानुसार प्रसंग, व्यक्ती इत्यादी गोष्टीं बाबत क्रिया वा प्रतिक्रिया व्यक्त करण्याची पद्धत.
स्वभावतील हे गुण वा दोष मूलतः असतात, त्यावेळी त्यांचा आधीच्या जन्मातील कर्म,घटना, प्रसंग किंवा एकूणच आधीच्या जन्मातील आयुष्याक्रमाशी संबंध असतोच असतो. याचा अनुभव वा प्रचिती आपण नऊ महिन्यातील डोहाळे या शब्दाशी जोडू शकतो. एक साधा विचार करा, ज्या गोष्टीचा एखाद्या स्त्री वा मुलीबाबत, आपण विचारसुद्धा करू शकत नाही, अश्या गोष्टी वा वागणूक किंवा मागण्या त्या काळात स्रीच्या स्वभावातून जाणवतात वा डोकावतात. त्याप्रमाणे बरेचवेळा जन्माला येणाऱ्या अपत्याचा स्वभाव व वागणूक असते.
एक प्रसिद्ध उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराज,माता जिजाऊंच्या गर्भात असताना, जिजाऊ मातेला, घोड्यावर बसणं, तलवार दांडपट्टा चालवणं, घोड्या वरून दूरवर रपेट करणं,या गोष्टींची आवड निर्माण झाली. यावरून,त्याचवेळी हे सिद्ध झालं की, एक वीर पराक्रमी सुपुत्र माता जिजाऊ यांच्या पोटी येणार आहे. या डोहाळ्यांप्रणाने, मातेने एका युगप्रवर्तक वीरपुत्राला जन्म देऊन,अखिल हिंदू धर्माला पावन केलं.
स्वभावाची व वागणुकीतील ही चुकीची वैशिष्ट्ये जी जन्मतः असतात. त्यांचा संबंध, आधीच्या जन्मातील, कुठल्यातरी अतृप्तीशी किंवा असमाधानाशी आणि योग्य, शांत व सोशिक पणाची वैशिष्ट्ये हीआधीच्या जन्मातील समाधान वैराग्य, विवेक पूर्ण साधना व त्यासंबंधीचे दीर्घकालीन संस्कार यांच्याशी असतो.
यावर उद्या पुढे चिंतन करू. पण नामाचे याजन्मातील संस्कार, पुढे नेण्यासाठी, त्याचा अभिषेक नित्य मनावर होत राहूदे.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment