भोग आणि ईश्वर ३२३
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
कालचाच विषय पुढे नेऊया. या जन्मातील स्वभाव वैशिष्ट्ये, वागणुकीतील काही विशिष्ट बाबी, या जर जन्मतः असतील, तर त्यांचा संबंध आधीच्या जन्मांशी असू शकतो. आधीच्या जन्मात (एकाच नव्हे तर मागील अनेक जन्मात) जर काही गोष्टी इच्छे नुसार प्राप्त नसतील झाल्या, तर मनात, विशेषतः सुप्तमनात दडून बसलेल्या, या अतृप्त इच्छा, आत्मा मनोमय कोषासह, पुढे घेऊन जातो. त्यानंतर, पुढील जन्मात तो मूळ स्वभावाचा भाग होतो. यालाच आपण म्हणतो की, स्वभावाला औषध नसतं.
पण या, आधीच्या जन्मांतील गोष्टी वा इच्छा, या जन्मात तृप्त झाल्या, असं समजलो, तरीही, जर तो मूळ स्वभाव झाला असेल, किंवा मूळ व्यक्तिमत्त्वाचा भाग असेल, तर त्या तृप्त होणाऱ्या, इच्छांमध्ये, या जन्मीच्या मायावश व उपभोगवश किंवा भोगवश येत जाणाऱ्या वा आलेल्या आणि अतृप्त राहिलेल्या, इच्छा, वासना इत्यादी , मिसळत जातात आणि सरतेशेवटी जर गोळाबेरीज केली, तर पुन्हा मागील जन्मांच्या स्थितीला आत्मा पोचलेला असतो.
पण या जन्मात त्यामध्ये, अतृप्त इच्छा व वासना यांची भर पडून, बेरीज जास्त झालेली असते. म्हणजे जरी आधीच्या जन्मांतील, इच्छांपैकी काही, जरी तृप्त झाल्या, तरी त्यातील उरलेल्या काही व या जन्मात, त्यामध्ये भर घातलेल्या काही, अशी इच्छांची वाढलेली गणती पुढे नेली जाते. हे चक्रनेमिक्रमाने सुरू राहतं, सर्वांच्या बाबतीत सर्वासमान्यपणे. मग यातून तरून कोण जातं किंवा काहीच उपाय नाही का व हे असंच सुरू राहील का, हा एक विचार नक्कीच मनात येऊ शकतो.
मागे आपण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं उदाहरण बघितलं. तेंव्हा त्यात काही विद्यार्थी, सर्वसाधारण असतात, पण एखाद दुसरा किंवा फार थोडे असतात, जे या इतर विद्यार्थ्यांपेक्षा भिन्न असतात.म्हणजे ते पहिल्या पासून जिद्दीने, नियमित काटेकोर पणे अभ्यास करून, प्राप्त परिस्थितीशी झगडून पुढे जातात. आता ही जिद्द, काटेकोरपणा, नियमितपणा येतो कुठून, किंवा एखाद्याचा स्वभाव खूप वेगळा,एकाग्र, आत्ममग्नी राहण्याचा कसा असतो, हे जरा शोधून पाहू.
आपण पाहतो आहोत की, एखादं व्यक्तित्व किंवा एखाद्याचा स्वभाव हा वेगळा असतो. तो मृदुभाषी, स्वतःमध्येच रत आणि समाजापासून कायम वेगळा राहून आपलं लक्ष, उद्देश इत्यादींशी एकनिष्ठ राहून, ते साध्य करणं, इतकं केंद्रित किंवा focused असतो. हे केंद्रित राहणं कसं व त्यांनाच का जमतं, याचं उत्तर , मागील जन्मात असू शकेल. पाहूया.
असं समजुया की, एखाद्याच्या सर्व इच्छा एखाद्या जन्मात पूर्ण झाल्या आणि तृप्त मनाने व समाधानाने, त्याने, त्या जन्मात, जगाचा निरोप घेतला. म्हणजे पुढील जन्मात ते समाधान, ती तृप्ती जन्मतः प्राप्त होऊन, नवीन जन्मात, जन्मतः त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव समाधानी होऊ शकेल. म्हणजे या जन्मात आपण पहात असलेल्या समाधानी व्यक्ती, मागील जन्मात तृप्त होऊन पुढे आलेल्या असतात. म्हणजे अंती समाधानी असणं हे क्रमप्राप्त ठरतं.
यात अजून एक विचार येतो, तो म्हणजे, जर एखाद्याला या जन्मात, काहीही समाधान मिळालं नसेल किंवा प्राप्त समाधाना पेक्षा, मिळालेलं दुःख, भोग हे जास्त असतील, तर अशी व्यक्ती अंती खंत करत किंवा असमाधानी राहूनच पुढे जाणार. मग अतृप्ती, असमाधान यांसह पुढील जन्माला सुरवात होईल आणि अशी व्यक्ती, त्या पुढच्या जन्मात, आयुष्यभर मोह व लोभग्रस्त राहून, सतत काही मिळवण्याच्या उद्योगात राहील.
आता या सर्वांचा अजून खोलात जाऊन, विस्ताराने विचार करूया. पण आपलं नित्य नाम हे घेत राहून, नित्य भगवतकृपेची प्राप्ती होण्याकडे वाटचाल करत राहू.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment