भोग आणि ईश्वर ३२८
खूप वेळा असं होतं की आपण चांगलं वागून किंवा आपण श्रद्धेने वा तळमळीने काही करूनसुद्धा उपयोग काय. किंवा संसारात आपण एकट्यानेच काही करून काही होणार का किंवा होताना दिसेलच असं नसतं. म्हणजे जोडीतील एखादा करतो आणि दुसरा त्याच्या विरुद्ध वागतो आणि परिणाम शून्यवत किंवा जैसे थे असाच होतो, असं आपल्याला वाटतं. आपण खूप वेळा उद्विग्न होतो किंवा हताश वा निराश होतो.
पण मग यावर उपाय काय किंवा सोडून देऊनच राहायचं का. याचं उत्तर म्हणजे, तेसुद्धा आपल्या आणि सदर व्यक्तीच्या कर्मातील भोगच असावेत किंवा असणार. याचं कारण म्हणजे आपण मागे अनेक लेखांपूर्वी पाहिलेला कर्मफल सिद्धांत. याशिवाय अश्या प्रकारचा कर्मभोग आपल्या नशिबी येऊ शकत नाही .
म्हणजे जोपर्यंत तो भोग नशिबी आहे, तोपर्यंत आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडणार नाही. अश्या काळात तीन कर्मफलं एकत्र कार्यरत असतात. एक सदर व्यक्तीचं, स्वतःच, एक आपलं स्वतःचं, एक joint किंवा एकत्रित भोगलं जाणारं. जे दोघांचं एकत्रित भोगलं जाणार आहे किंवा भोगलं जात आहे, तेच अनिष्ट असू शकेल. पण दोघांची व्यक्तिगत कर्मफलं जी समोर येतात, ती कदाचित सुखावह किंवा सुसह्य असू शकतात.
कारण अनिष्ट कर्मफलांचा भोगण्याचा काळ वा योग हा एकत्रित असेल म्हणूनच आपल्या दोघांचं नशीब एकत्र सांधलं गेलं. यात फक्त नवरा बायको, पालक व अपत्य किंवा भावाबहिणीतच असे योग असतील असंही नाही. तर मित्र मित्र व मैत्रिणी, यांच्याबाबतसुद्धा हे योग येऊ शकतात. यदाकदाचित कोणाचे आधीचे ऋण वा कर्ज शिल्लक असेल, तर तो भोगण्यासाठी सुद्धा ते आत्मे एकत्रित येऊन, आपापला कार्यभाग साधेपर्यंत एकत्रितपणे प्रवास करू शकतात.
आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे कळेल. लोकलच्या प्रवासात आपल्याला अनेकदा असे प्रसंग पाहायला वा अनुभवायला मिळतात. काही काळासाठी डब्यात एकत्र आलेल्या दोन वा अधिक व्यक्ती क्षुल्लक कारणांवरून भांडण सुरू करतात. काही काळ भांडतात आणि बरीच बाचाबाची होऊन, पुन्हा आपापलं स्टेशन आलं की उतरून जातात. म्हणजे तेवढा योग होता तोपर्यंत त्यांनी वाद घातला, भांडणं केली शिव्या दिल्या आणि नन्तर निघून गेले.
यामध्ये असाही प्रकार आपण अनुभवला असेल की, कदाचित काही कारणाने त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन, ते नन्तर चांगले स्नेहीसुद्धा होतात. म्हणजे नन्तर आपल्यालासुद्ध आश्चर्य वाटतं की, हेच दोघं काही क्षणांपूर्वी भांडत होते. म्हणजे तेच दोघे, तोच प्रवास आणि त्याच काही क्षणांच्या वादानंतर त्यांची झालेली दोस्ती. सगळं चक्रीत करून टाकणारं आहे. आता हा प्रवास काही क्षणांचा असेल किंवा लांबचा काही तासांचा असेल किंवा बोटीतील काही दिवस वा महिन्याच्या असेल. पण असा अनुभव अगदी स्वतःचा सुद्धा असू शकेल.
यातून एक गोष्ट लक्षात येते की, असे प्रसंग वा असे तणातणीचे क्षण तितकेच वेळा वा तितकाच काळ असतील, जितका काळ आपल्या कर्मयोगात आपलं आपण स्वतः लिहून ठेवलं आहे. आता वरील प्रसंगात सहसा एखादा थोडा समंजस असेल आणि आपण जास्त नादी लागून, जास्त अडकत जाऊ, हे ध्यानात येणारा असेल तर नक्कीच मधेच शांत राहून, त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करेल.
म्हणजेच ज्याक्षणी याचा विवेक जागृत होऊन, याला वा याच्या मनाला समजावेत, त्या क्षणानंतर, हा विवेकी व्यक्ती शांत होईल. आता इथे एक खूप मोठी गोष्ट आपण जाणली की, प्रारब्धात वादाचा वा भांडणाचा योग होता. त्यानुसार कर्माने, ती व्यक्ती समोर आली,पण जागृत विवेकाने, आपण, त्यावर मात करून, विजय मिळवून, त्या फलाला क्षीण केलं. म्हणजे फल समोर आलं, इथे कर्माचा भाग संपला. पण त्याचा समोर आलेला परिणाम विवेकाने व विचाराने कमी करणे किंवा नष्ट करणं शक्य आहे.
यावर पुढे उद्या चिंतन करूया. पण नामस्मरण निष्ठेने करत रहा.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment