Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१६

भोग आणि ईश्वर  ३१६ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

एक प्रश्न मनात येतो की, एखादं स्तोत्र वा मंत्र, विशिष्ट संख्येनेच का म्हणायचा. म्हणजेच ज्याला आवर्तन म्हणतात ते. गेल्या दोन तीन भागात आपण पाहिल्या प्रमाणे, हे स्तोत्र, मंत्र इत्यादी त्या त्या विशिष्ट शक्तींना जागृत करण्यासाठीची कळ किंवा keyword किंवा password स्वरूप आहे. अर्थात त्यायोगे, विशिष्ट शक्तीप्राप्त चैतन्याला, आपण आपल्या कार्यार्थ जागृत करण्यासाठी आवाहित करतो. 

आता एखादं कुलूप उघडायचं असेल तर, आपण सहसा एकवेळा चावी फिरवून कुलूप उघडतो. ही झाली साधी कुलुपं. पण अशीही कुलुपं आता निघाली आहेत,किंवा आधीपासूनच अस्तित्वात आहेत, जी उघडायला चावी दोन, तीन, पाच सात अश्या विशिष्ट संख्येने फिरवावी लागते. त्यानंतरच ते कुलूप उघडलं जातं. हे तत्व फार पूर्वीपासूनच सनातनात अस्तित्वात होतं. 

म्हणजे प्रत्येक विशिष्ट शक्तीसाठी, विशिष्ट मंत्राची विशिष्ट आवर्तनं म्हणणं, ही त्या त्या देवतेला किंवा शक्तीला जागृत करण्यासाठी असलेली कळसंख्या, किंवा pass word संख्या आहे. जसं हल्ली बऱ्याच अँप, विशेषतः बँकिंग अँप, पासवर्ड आणि OTP अशी दुहेरी सुरक्षा प्रणाली वापरतात. हेच तत्व, या सर्व आवर्तन संख्या गणितामध्ये असू शकेल. याव्यतिरिक्त संख्या शास्त्रा नुसार, विशिष्ट ऊर्जा व बल निर्माण व्हायला, विशिष्ट प्रकारे व विशिष्ट संख्येमध्ये, विशिष्ट ध्वनीलयीत, एखाद्या स्वराचा, अक्षराचा, भाषेतील धातूंचा, अक्षरसमूहांचा म्हणजेच शब्दांचा उच्चार जर केला, तर निर्माण होणारी कंपनं व त्या कंपनांचा भार, वातावरण भारित, प्रभावित व संचालित करू शकतो. 

म्हणूनच आपण विशिष्ट लयीत, सुरात, उच्चारात आरत्या, प्रार्थना, स्तोत्र, मंत्र इत्यादी म्हटल्यानंतर, त्याची कंपनं आणि त्यांचा भार,वातावरणात शुद्धता, सात्विकता निर्माण करून, मनाला, मनातील, ऊर्जा व बल यांना, सकारात्मकता प्रदान करतात. म्हणूनच गणपति व नवरात्री उत्सवाच्या काळात मन प्रफुल्लित, ताजतवानं आणि सतेज असतं. त्यामागे हेच कारण व तत्व आहे.  म्हणूनच आपल्याला पूर्वजांनी रोजची पूजाअर्चा, दिवे लागणीला परवचा इत्यादी संस्कार घालून दिले होते. 

रोजची ही पूजाअर्चा, प्रार्थना व परवचा, म्हणजे रोजची आवर्तनं आहेत, ज्यायोगे, काही विशिष्ट शुभशक्ती, त्या त्या वेळेला, जागृत केल्या जातात. याचाच अर्थ, हे लहरी, कंपनं, यांचं कार्य, परिणाम, पद्धत इत्यादींचं शास्त्र पूर्वजांना ज्ञात होतं. आज तर यावर अधिक संशोधन सुरू आहे व काही निष्कर्षसुद्धा नोंदले गेले आहेत. जसं, विशिष्ट स्वरात म्हटलेल्या मंत्र श्लोक, स्तोत्र वा संगीत इत्यादींनी, झाडं, फुलं, फळं इत्यादींवर सकारात्मक परिणाम होऊन, त्यांच्या वाढीत उत्तम परिणाम दिसून येतो. 

आपण तर हे देखील वाचलं आहे की, मानसोपचार पद्धतीत सुद्धा संगीत, स्वर, ताल किंवा वाद्य यांचा उपचारासाठी वापर केला जातो. या सर्वांमागे हेच कंपन व त्यांच्या भाराचं गणित आहे. म्हणूनच किंवा याच तर्काने विशिष्ट शक्तींच्या जागृतीसाठी विशिष्ट लयीत, सुरात विशिष्ट शब्दसमूहांचा वापर केला गेला आहे. तो शब्दसमूह, मंत्र, स्तोत्र यारूपात वापरात आणून प्रचलित करण्यात आला. त्यामुळेच विशिष्ट कार्यार्थ, विशिष्ट शक्तिला जागृत करण्याची पद्धत रूढ झाली. विशिष्ट संख्येने केल्या  जाणाऱ्या या अवर्तनावर आपण उद्या चर्चा पुढे सुरू ठेऊच. पण तोपर्यंत आपली नामाची लय, स्वर आणि नाद साधण्याचा अभ्यास सुरू ठेवूया. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...