भोग आणि ईश्वर ३१९
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
खरतर हा शक्तीचा जागर, नित्य या जगतात संचार करत आहे. पण त्याचा अधिक प्रभावाने व प्रकर्षाने, या काळात व या नऊ दिवसांच्या पर्वात, जाणवतो. खरतर या काळात तो अधिक प्रभावाने साठवून घेता येतो. आपण एखादा प्रकाशझोत किंवा प्रकाश गोल पहिला असेल कधीतरी, जो गोलाकार फिरत असतो. त्याच्या ३६० अंशातून गोलाकार फिरण्याच्या मार्गात, प्रत्येक जागा ठराविक काळासाठी या प्रकाशातून जाते.
त्याचं गणित वा समीकरण असं आहे की आपल्या पंचांग व वर्षाच्या गणिताप्रमाणे ३० दिवसांचे १२ भाग कल्पून व दर तीन वर्षातून एकदा अधिक मास जोडून, कालगणना पृथ्वीच्या सूर्या भोवती फिरण्याच्या गणिताशी जवळपास जोडण्यात आली आहे. या ३६० दिवसाचे प्रत्येकी ९ दिवसाचे ४० भाग होतात.
त्यातील पहिल्याच चैत्र मासातील पहिला ९ दिवसाचा भाग आपण गुढीपाडवा ते रामनवमी असा धार्मिक, अध्यात्मिक व मानसिक दृष्टीने सकारात्मकता प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणतो. याचा अर्धा भाग म्हणजे ९ , ९ दिवसांचे २० अंश अर्थात १८० दिवस गेले की येतो तो दुसऱ्या अर्धवर्षातील पहिल्या ९ दिवसांना पुन्हा नवरात्री पर्व साजरे करून, पुढील १९ अंशासाठी, पुन्हा एकदा सकारात्मकता मिळवून, चैत्र येईपर्यंतचा काळ, उत्तमरीत्या जाईल याची तरतूद करतो.
म्हणजे या गणिताचा अर्थ असा होतो की, प्रत्येक ९ दिवसांचे पहिल्या अर्ध्यवर्षातील १९ आणि दुसऱ्या अर्ध वर्षातील १९ भाग, असे ३८ भाग उत्तमरीत्या जावेत म्हणून प्रत्येक अर्धवर्षा तील पहिला एक असे ९ दिवसांचे २ नही भाग, विश्वातून येणारी वा प्राप्त होणारी ऊर्जा, ओज साठवून घेतली पाहिजे. या सर्वाचा अर्थ, आपण आधी पाहिल्याप्रमाणे प्रकाशझोत, वर्षातून प्रत्येकी ९ अंशातून दोनवेळा या पृथ्वीवरून फिरत असावा.
ज्यामुळे ह्या प्रकाशझोतातील सकारात्मक तेजकण जमा करून, त्या उत्साहाचा लाभ पुढे उरलेला अर्धावर्षं आपण उपयोगात आणू शकतो. या इतक्या उत्तम गणिती समिकरणाची माहिती, आपल्या पूर्वजांनी, इतक्या आधी संशोधित करून त्याचा उपयोग मानसिक, आत्मिक प्रगती साध्य करून, आत्मोन्नती साधावी, हे या दोन ९ ,९ दिवसांच्या दोन्ही पर्वात त्यांनी अधोरेखित केलं आहे.
आता यापुढे आत्मनेत्र उघडून, या ९,९ दिवसांच्या दोन्ही पर्वात, अर्थात चैत्रातील ९ आणि अश्विनातील ९ दिवस आपण सकारात्मकतेतून वृद्धी व उन्नति याकडे वाटचाल करूया. आपल्या मनोबलाला, आत्मबळाला, आत्म संयमाला प्राप्त करून, प्राप्त केलेली वृद्धीसाठी, या ९ दिवसांच्या पर्वासाठी आपण वर्षातून दोनवेळा तयार राहूया. म्हणून आवर्तन हा शब्द याचसाठी अस्तित्वात आला. कारण हे ९ दिवसाचं आवर्तन प्रत्येक २० अवर्तना नंतर वर्षातून दोनवेळा येणाऱ्या, या शक्तीच्या प्रभावाचा लाभ घेऊया. उद्या पुन्हा चिंतन सुरू ठेवू, तोपर्यंत नामाचं आवर्तन सुरू ठेवूया.
उद्या आपला अवर्तनाचा विषय पुढे नेऊया. पण तोपर्यंत नामाची आवर्तनं सुरूच राहूदे.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment