Skip to main content

भोग आणि ईश्वर १९४

भोग आणि ईश्वर  १९४
 
आनंद हा खरतर चारही बाजूने, किंबहुना अष्टदिशांनी भरून वाहतो आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणी, नवनवीन आहे. विश्वात , नव्हे ब्रह्मांडात सर्वत्र, म्हणजेच प्रत्येक क्षणी कुठेना कुठेतरी पुनर्निर्मिती होतच आहे. म्हणजे कुठंतरी नवीन तारे, ग्रह जन्माला येत असणार, कुठेतरी ब्रह्मांडात नवीन सूर्य व सूर्यमाला तयार होत असणार, वसुंधरेवर प्रत्येक क्षणी नवनवीन झाडं, उगवत असणार, उगवलेली प्रत्येक क्षणी वाढत असणार, नवनवीन पालवी फुटत असणार, वृक्ष बहरत असणार, नवनवीन फुलं, फळं कुठंतरी येतच असणार.

इतकंच कशाला प्रत्येक क्षणी काही हजार नवीन जीव, प्राणी आणि मानव यांच्यामधून जन्माला येत असणार. असं हे अविरत आनंदाचं चक्र अव्याहतपणे चालू असतं आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत सुरूच असणार. यालाच निर्मिती आणि वर्धन अर्थात वाढ होणं म्हणतात. त्रिदेवांच्या युगानुयुगांच्या संकल्पनेप्रमाणे ब्रह्मदेव अखंड निर्मितीमग्न आहेत. म्हणजेच निर्माण वा जीवन सुरू झालं की,  त्यांच्याकडून पुढच्या कार्याचा भार, अर्थातच श्रीविष्णू म्हणजेच जगतपालक वा जगतपिता, यांच्याकडे येतो. 

म्हणजेच प्रत्येक सजीव वा निर्जीवसुद्धा महाविष्णूंच्या श्वासानुरूप या जगतात उदरनिर्वाह करतात. म्हणजेच विश्वातील प्रत्येक जीवाचं अस्तित्व टिकून राहणं हे यांच्या अखत्यारीत येतं. पण म्हणजे प्रत्येक जीव हा अनंतापर्यंत सुरक्षित राहायला पाहिजे आणि तसा तो राहतो. तिथून निघून पुन्हा तो जीव तिथेच पोचण्यापर्यंतचं सर्व क्षेमकुशल साक्षात श्रीमहाविष्णू पाहात असणार, असं आपण नक्कीच समजुया.

पण तरीही जन्म मृत्यू हे होत राहतात. म्हणजे श्रीमहाविष्णू आपलं पालनपोषणाचं काम करत नाहीत असा अर्थ घ्यायचा की काय. छे छे तसं अजिबात नाही. जिथे महापापी असुरांनासुद्धा पातकांच्या राशीच्या राशी ओतत असताना सुद्धा, पुनः पूर्वपदावर येऊन, सुधारण्याची संधी मिळावी, अशी वैश्विक संवेदनशील मन असलेल्या श्रीमहाविष्णूची मनीषा, संकल्पना आणि प्रेरणा आहे, तिथे आपल्यासारख्या पापभिरू जनांना सांभाळणं त्यांच्यासाठी तितकंसं जड नक्कीच नाही. 

त्यांचं ते कार्य अव्याहतपणे, ते करत आहेत आणि राहणार. म्हणजेच सर्वांचं योगक्षेम वाहणं हे ब्रीद असलेले जगतपिता बरेचवेळा असं करत नाहीत की काय, अशी शंका निर्माण होते. म्हणूनच त्याचं उत्तर त्यांनीच अनेकदा देऊन पुन्हा एकदा गीतेच्या प्रसंगी दिलंच आहे. जे जे माझ्या स्मरणात कर्मरत राहून, त्या कर्माचं फलसुद्धा मला समर्पित करतील, म्हणजेच निष्काम कर्मयोग साधतील, त्यांचं योगक्षेम मीच वाहीन. अर्थातच या ब्रीदात त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

म्हणजेच मग सुष्टांना अवहेलना आणि दुष्टांना अभय असं विचित्र चित्र बरेचवेळा का पाहायला मिळतं. त्याचं उत्तर अर्थातच कर्मगतीच्या फेऱ्यात वास्तविकपणे सहज सापडतं. पण जिथे फक्त चक्षुर्वे सत्य मानणारी बुद्धी, या विचाराने बद्ध होते, तेंव्हा मायेचा खेळ सुरू असतो. सर्वात सोपा तर्क किंवा उदाहरण लक्षात घ्या. अनेक वर्षे घोर तप करून वरप्राप्ती केलेले असुर, त्याच वराचा दुरुपयोग करून सामान्य जनतेला आणि धर्माला नख लावतात, तेंव्हासुद्धा, त्या असुरांच्या पापकर्माने त्यांच्या अधोगतीचा शेवट जवळ येत नाही, तो पर्यंत विधाता स्वतःसुद्धा काहीही करू शकत नाही. 

म्हणजेच इतका ताप जगाला होऊनही व इतकी जीवितहानी होऊनही, ज्यावेळी त्याच्या कर्माची गती बोलावले त्याचवेळी, विधाता त्यांना या जगतातून नष्ट करतो, त्याचा स्वनिर्मितीला  संभाळून घेण्यावर , किती गाढा विश्वास व श्रद्धा असेल. मग आपल्यासारख्या सामान्य जनांना तर नक्कीच, आपलं पालकत्व असलेले पिताश्री, संभाळून घेणारच. पण हा योगक्षेम वाहण्याची मर्यादा ही देहातील आत्म्यापर्यंत आहे, देहाबाबत ती एका ठराविक मर्यादेपर्यंत आहे. ज्यावेळी देहाची मर्यादा संपते, तेंव्हा त्या जीवाच्या उद्धारासाठी नवीन देहनिर्मिती करवून घेऊन, तिथे त्या आत्म्याची स्थापना त्या त्या कर्मानुसार, करतो आणि योगक्षेमाची व्यवस्था पुनः सुरू होते. 

विषय मोठा आहे, उद्या पुढे सुरू ठेवू. तोपर्यंत नाम घ्या, जगतपालकाला स्मरत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...