प्रार्थना
तोडीता तोडवेना पाश
काम क्रोध मायेचे
बद्ध झाला जीव देवा
देहसाखळीत मौजे ll
नाश पाहवेना देवा
किती जन्म घालवले
उमजता, लोचनात
पश्चात्ताप अश्रू आले ll
तूच सावरवे मजला
जीव तुझ्या चरणांशी
कृपावंता ब्रीद राखी
कर-मस्तक पायांशी ll
बोध जाहला जन्मांचा
सुधरेल आता सारे
पहाटेच्या समयास
सूर्यकिरण पसरे ll
मीच माझा शत्रू होतो
कर्मगती ज्ञात नसता
आता नित्य कर्म देवा
घडो तुजला स्मरता
घडो तुजला स्मरता ll
©® रचनाकार : प्रसन्न आठवले
२९/०६/२०२१
Comments
Post a Comment