Skip to main content

जय महाराष्ट्र !!!🚩🚩🚩

सर्वात प्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!💐💐 

खरतर गत वैभवाच्या शिखरावर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचं कौतुक करायचं की, भविष्यात पुनः एकदा कधीतरी त्या वैभवाप्रत पोहोचू या आशेने शुभेच्छा द्यायच्या हा एक संभ्रमच आहे. कारण सलग पंधरा वर्षे राज्य करूनही राज्याला त्या वैभवाला न पोचवू शकलेले, पाच।वर्षात तुम्ही काय केलंत म्हणत निवडणूक मैदानात उतरले. मतदारांनी त्यांना पूर्ण परास्त करूनसुद्धा जवळजवळ सत्तेत पोहोचलेल्या युतीला शह देत त्यातील एक मोठा पक्ष फोडत त्यांना नाममात्र मुख्यमंत्रीपद देत सर्व सत्तेचं नियंत्रण आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झाले. 

म्हणजे 20% मिळवलेले दोन आणि 20% वाला तिसरा मिळवून आमचं बहुमत असं येनकेनप्रकारेण करून सत्तेत तर पोहोचले. परंतु त्यातील खरा आनंद त्यांनाही नियतीने मिळू दिला नाही. आधी तिजोरी रिकामी असल्याचं नाटक करून झालं. त्यांनतर लगेचच करोनाचं जागतिक संकट आलं. यात सत्तेतील पक्षांची होत असलेली तारांबळ, ताळमेळाचा गोंधळ, अंमलबजावणीतील अनियमितता आणि समन्वयाचा अभाव हा ठायी ठायी जाणवतोय. त्यातही कमजोर नेतृत्व आणि बलशाली सत्ताबाह्य केंद्र यामुळे सत्तेत राहून कोणताच निर्णय धडपणे व स्वतःच्या मर्जीने घेऊ न शकणारे जेरीस आले नाहीत तरच नवल.

त्यातही त्यांना 25 वर्षांची सवय काय तर, भाजपाचे वरिष्ठ नेते येऊन नाकदूऱ्या काढत होते. पण इथे तर चित्र उलट दिसत आहे. यांनाच पंचम जॉर्ज आणि राणी व्हिक्टोरिया यांची मर्जी सांभाळून काम करावं लागतं आहे. किंबहुना त्यांच्या सल्ल्यानेच आदेशांवर फक्त सह्या कराव्या लागत आहेत. हे चित्र काँग्रेसच्या काळातील 70, 80 व  90 च्या दशकातील सर्व होयबा मुख्यमंत्र्यांची आठवण करून देत आहे.

या सर्वात हे त्यांच्या लक्षात येत नाहीये की, ज्या महाराष्ट्राचे पाईक म्हणून त्यांनी पक्ष स्थापन केला त्याच राज्याचं अपरिमीत नुकसान करत आहोत. पक्षाची वाताहत होते आहे ती वेगळीच. पक्षाचं आणि पक्ष कार्यकर्त्यांचं मनोधैर्य दिवसागणिक खच्ची होत आहे ते वेगळंच. परंतु आजतरी त्यांनी डोळ्यावर पट्टी ओढल्यामुळे ह्याचे दृश्य गंभीर परिणाम हे झाल्यावरच त्यांना दिसतील आणि त्यावेळी काळ खूप पुढे निघून गेला असेल. 

या सर्वात भाजपला काहीच गमवायचं नाहीये. उलटपक्षी जेवढे जास्त दिवस हा खेळ चालू राहील तेवढे जास्त ते सत्तेच्या जवळ पोहोचतील हे नक्कीच. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. जसं फडणवीस देखील चुकीच्या मित्रावर विश्वास ठेवल्याचा परिणाम भोगत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची वेळ येते हे शास्त्रवचन आहे. 

असो करोनाच्या रोजच्या वाढत्या प्रकोपाने आधीच हैराण झालेली जनता सत्तेतील हा खेळ निमूटपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यातही पोलीस व वैद्यकीय पथकांवरील हल्ले आणि त्याविरुद्ध काहीही कारवाई न करू शकणारे सत्ताधीश पाहून, काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची होऊ नये हीच सद्इच्छा.

पुन्हा एकदा आशा करूयात की, महाराष्ट्र या आपत्तीवर लवकरात लवकर मात करेल आणि विकासात अग्रेशीत होईल.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

जय महाराष्ट्र !!!!!!

©® लेखन : प्रसन्न आठवले
०१/०५/२०२०
०८:४५

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...